अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १८

“का? मुली म्हणजे तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का?” परी “तुझ्या मुलीच्या वयाची ना? तुझ्या मुलीला अस कोणी बोललं तर? बेड….” “जिभ हासडून हातात देईल तुझ्या.” परी पुढे बोलण्याआधी मित्तल रागात किंचाळले. “का?” परी ही तितक्याच कडक आवाजात बोलली.
मागील भागात.

पोलीसांनी त्यांचा खाक्या दाखवताच परमार पोपटासारखे बोलू लागले. त्यांनीच मित्तलच्या सांगण्यावरून सावंत साहेबांची हत्या केल्याचे कबूल केले. प्रसाद त्यांना भेटायला येण्याची वेळ आणि परमारांनी हे कृत्य करण्याची वेळ सारखीच ठरवण्यात आलेली होती. पण प्रसाद वेळे आधीच आल्याने परमारांनी घाईघाईत त्यांनी वापरलेल हत्यार पटकन फेकून दिल आणि सावंत साहेबांच रक्त घेऊन प्रसादच्या हाताचे ठसे असलेल्या चाकूवर पसरवलं. ते लगेच तिथून पसार झाले होते.

प्रसाद त्याच्या उपकरणाची माहीती घेऊन सांगत साहेबांजवळ पोहोचला असता, त्याला सावंत साहेब रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले दिसले. प्रसादने लागलीच त्याच्या हाताने तो चाकू काढला होता. म्हणून परत त्या चाकुवर प्रसादच्या हाताचे निशाण उमटले गेले.

ते उपकरण ही प्रसादाचं असल्याचं परमारांनी सांगीतलं. इतर बरेच लपवले गलेले गुन्हे परमारांनी उघड केले होते. परमार त्यांनी दिलेल्या जबानीवरून मागे फिरू नये म्हणून मायकलने मॉर्फ केलेला व्हिडिओ त्यांना दाखवला गेला. ज्यात मित्तल साहेब सगळेच गुन्हे परमारांवर लाटताना सांगत असल्याचे परमारांना दिसले. मग परमार ही चांगलेच चिडले आणि जे काही बाकी होत ते ही सांगून मोकळे झाले होते.

ते सगळेच गोळा करून साटम, डीएसपी साहेब जिल्हा प्रमुख म्हणजेच भैरवीची वाट बघत होते. तेवढ्यातच साळवे धावतच त्या दोघांजवळ आले.

आता पुढे.

“साळवे हळु, तुमचं वय काय आणि असे पळता काय?” साटम त्यांना बघून बोलले.

“मित्तलने चांगल्या डिलच्या बदली त्यांची सुटका करण्याची मॅडमला विनंती केली आहे.” साळवे दम खात बोलले. “आणि मॅडम ही त्यांना घेऊन लगेच बाहेर पडल्या.”

तसे साटम आणि डिएसपी साहेब दोघेही तिरस्काराने हसले.

"बघीतलं, पैसा दिसला की इमान विकलं.” साटम नकारार्थी मान हलवत बोलले. “साळवे बसा. एवढी धावपळ करून काही फायदा झाला नाही.” साटम आता चिडून बोलले.

तसे साळवे ही आज्ञाधारक मुलाप्रमाणे बसून पाणी पिऊ लागले. दोन तिन पाण्याचे घोट पिल्यावर ते पुढे बोलले. “साहेब मला सांगा, मयत माणसांची केस सोडवणं सोप की जिवंत?”

“हा काय प्रश्न आहे साळवे?” साटम वैतागून डिएसपी साहेबाकडे बघत बोलले. “जिवंत माणसाची सोपी रे बाबा.” या वाक्यावर डिएसपी साहेबांनी ही मान हलवत. दुजोरा दिला.

“आत्ताच सावंत साहेबांची पाहीली ना?” डिएसपी साहेब ही नकारार्थी मान हलवत बोलले.

“आत्ता एका मयत माणासानेच एवढे टेन्शनमध्ये आलात. मग दुसरा ही मयत झाला तर काय कराल?” साळवे खुर्चीवर आरामात रेलून बसत बोलले.

“म्हणजे?” साटम गोंधळून गेले. त्यावर साळवे तिरकस हसले आणि डीएसपी साहेबांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांच्या चेहर्‍यावरच अजूनच टेन्शन वाढलं. ते बघून साटम अजूनच गोंधळून गेले.

“अहो बघता काय चला लवकर.” डिएसपी साहेब पटकन उठत बोलले. “तिने डिलच्या नावावर आजवर चार एन्काऊंटर केलेले आहेत.”

तसा साटम डोकायाला हात लावत पटकन उठले आणि ते तिघेही घाईघाईतच भैरवीकडे जायला निघाले.

आज सकाळीच परी मित्तलला ठेवलेल्या पोलीसांच्या जेलमध्ये गेली होती. त्याला बघून परीच्या डोळ्यात प्रचंड राग उतरला होता. त्याला मारायला तर तिचे हात खूपच शिवशिवत होते. एकतर तो पोलीस कस्टडीत होता आणि त्याचा एन्काऊंटर करावा असा तो कुख्यात गुन्हेगारही नव्हता. म्हणून तिने त्यावर कसातरी आवर घातला होता. ती मित्तल समोर जाऊन बसली. तिची नजर त्याच्यावर पुर्ण रोखलेली होती.

“आता पटापट कबूल करायचं.” परीने शांतता भंग केली.

“मला माझ्या वकीलासोबत बोलायचं आहे.” मित्तल जरा चिडून बोलले.

“मिळेल ना, वकीलासोबत ही बोलायला मिळेल.” परी “पण जे काही मी आता दाखवेल ते बघून मला नाही वाटतं तुझा वकील तुझी सुटका करून शकेल.”

परीने एक एक पुरावा त्याच्यासमोर ठेवला. तसा मित्तलला घाम फुटायला लागला. त्यातल्या त्यात परमारांनीही त्यांच्या विरुध्द साक्ष दिलेली पाहील्यावर मित्तलला ही परमारांचा खूप राग आला. पण स्वतःवर खूप संयम ठेवुन ते बोलले.

“परमार खोट बोलत आहेत.” मित्तल “मी कधीच त्याला अस करायला सांगीतलं नव्हतं. मी त्याला असं काही करायला बोलण्याचे पुरावा आहे का तुमच्याकडे?”

“तुला अजून ही पुरावा हवा?” परी तिरकस हसत बोलली.

तिला अस हसताना बघून मित्तल जरा घाबरले. पण चेहरा निर्विकार ठेवला.

“तुझी आणि परमारची कॉल रेकॉर्डिंग सुध्दा परमारांनी आम्हाला दिलेली आहे.” परी “त्यात तुझा आवाज स्पष्ट आलेला आहे आणि अजून एक आहे जो वेळ आल्यावर तुला कोर्टातच भेटेल.”

मित्तल आता गप्पच झाले होते. त्यांच्याकडे बोलायला काहीच शिल्लक राहील नव्हतं.

“प्रसाद चांगला बोलला होता ना तुम्हाला” परीने बोलायला सुरवात केली. “की त्याला त्याच्या संशोधनासाठी साथ द्या. तुमच्या कंपनीचा चांगला फायदा करून देईल. पण नाही, तुम्हाला तर जास्तच हाव चढली होती ना. फक्त तुमच्या नावावर करून ते दुसऱ्या देशात विकून पैसा कमवायचा होता.”

“मग ह्यात गैर काय आहे?” मित्तल चिडून बोलले. “बिझनेसमन आहोत, फायदाच बघणार ना.”

“पण त्याला काही मर्यादा.” परी पण तितकच चिडून बोलली. “इथला शेतकरीच जगला नाही तर खाणार काय? फक्त माती.”

मित्तलने चिडून मान फिरवली.

“आणि विद्याला काय बोलला होतास?” परीच्या आवाजात राग उतरला. “तिच्यासारखी मुलगी तुझ्या बेडवर शोभते, असचं काही बोलला ना?”

मित्तल ही रागात बघू लागले.

“का? मुली म्हणजे तुझ्या बापाची प्रॉपर्टी वाटली का?” परी “ती पण तुझ्या मुलीच्या वयाची ना? तुझ्या मुलीला अस कोणी बोललं तर? बेड….”

“जिभ हासडून हातात देईल तुझ्या.” परी पुढे बोलण्याआधी मित्तल रागात किंचाळले.

“का?” परी ही तितक्याच कडक आवाजात बोलली. “तुझ्या मुलीबद्दल बोलली तर राग आला. मग ती पण कोणाची तरी मुलगीच आहे ना? तिच्या बद्दल असं बोलायला लाज नाही वाटली?”

“तुझ्यासाठी एक डिल आहे.” मित्तल परीला रोखून बघत बोलले.

तशी परी परत तिरकस हसली. “डील करायला तुझ्याकडे पैसा तर पाहीजे. तुझे सगळेच अकाऊंट सीझ केले गेले आहेत.”

“पण मला सोडशील तर तु मागशील तितका पैसा तुला देईल.” मित्तलला काही करून तिथून सुटका करून घ्यायची होती. कारण ते आतमध्ये राहुन काहीच करू शकणार नव्हते हे त्यांना समजून चूकलं होत. त्यांना काहीही करून तिथून बाहेर पडणं गरजेच होत.

“अस म्हणतोस?” परी गुढ हसत बोलली. तशी मित्तलने होकारात मान हलवली. “बरं किती पैसा देऊ शकतोस?”

“तु आधी सोड तर मला.” मित्तल ही गूढ हसत बोलले. ‘पैश्यांनी सगळेच विकत घेता येत.’ मित्तल मनातच खूश होत बोलले.

परीने ही विचार केला आणि चौकशीच्या नावाखाली त्याला पोलीस स्टेशनमधुन बाहेर काढून घेऊन गेली. नेमकी साळवेंनी मित्तलला घेऊन जाताना परीला पाहील होत आणि ते तसेच डिएसपी साहेबांच्या ऑफीसकडे निघून गेले.

डिएसपी साहेब, साटम आणि साळवे एका गाडीत बसून पटकन परीच्या मागे जायला निघाले होते. पण ती नेमकी कुठे जाणार होती. तेच त्यांना माहीत नव्हतं. फक्त परीचा मोबाईल ट्रेकींगला टाकून त्या नुसार चालले होते.

पण एकाच रोडला एकदा राऊंड मारून झाल्यानंतर पुन्हा त्याच रोडकडे जाताना बघून साळवे बोलले.

“मित्तलच्या घरी चला.” साळवे

“पण हे लोकेशन तर वेगळच दाखवतं आहे.” साटम

”कस विसरलो मी.” डिएसपी साहेब डोक्याला हात लावत बोलले. “ती एवढ्या सहज थोडीच तिच लोकेशन मागे सोडेल.”

मग तिघांनी एकमेकांकडे पाहील आणि मित्तल साहेबांच्या घराकडे गाडी वळवली. ते तिघेही मित्तल साहेबांच्या घरी पोहोचेपर्यंत परीने मित्तल साहेबांना चांगलच सुजवून ठेवलेल होत. ते पूढे पळायचा प्रयत्न करत होते आणि परी त्यांच्या मागे मागे आरामात चालत त्यांना तुडवत होती.

थोड्याचवेळात डिएसपी साहेब, साटम आणि साळवे तिथे जाऊन पोहोचले. त्या तिघांना आलेल बघून मित्तल साहेब पटकन त्यांच्या मागे जाऊन उभे राहीले. आता परी जरा थांबली होती. या तिघांनी मित्तल साहेबांना पाहील. ते लागलेल्या मुक्या माराने चांगलेच सुजलेले दिसले. सोबत थरथर कापत ही होते.

“मला जेलमध्येच घेऊन चला.” मित्तल साहेब डिएसपी साहेबांना विनंती करत बोलले.

“मॅडम काय आहे हे?” डिएसपी साहेबांना विचारलं.

तोपर्यंत परी मस्त पाणी पित होती. जणू काही घडलचं नव्हतं.

“माझ्यासोबत डिल करत होता.” परी खांदे उडवत बोलली. “मग तेच करत होती. तर हा नुसता पळतोय.”

“अरे अस थोडीच असतं.” मित्तल पुर्ण घाबरून बोलत होते. “सरळ सांगायचं ना की नाही करत म्हणुन.”

“गप ना बाबा.” साळवे मित्तल साहेबांना दटावत बोलले. “की अजून मार खायचा आहे.”

तसे मित्तल शांत बसले.

“आता गप्प गुन्हा कबूल करायचा.” परी चिडून बोलली. “नाहीतर अजून जर वकिलासोबत बोलायचं असेल तर मग तु ज्या दोन अंडरवर्ल्ड गँगला एकमेकांविरुध्द फसवून पैसे काढत होतास ना, ती माहीती त्यांच्यापर्यंत पोहोचवून देईल. मग तु जरी गुन्हयातुन सुटला तरी ते गँगवाले तुला सोडणार नाही. मग काय करायचं ते तुच ठरवं.”

परीने चांगलाच सज्जड दम दिला आणि तिथुन चालली गेली. ते तिघेही अजून मित्तल साहेबांकडे बघत राहीले होते.

“बघताय काय?” मित्तल साहेब “चला घेऊन मला आणि मला हॉस्पिटलला नाही घेऊन गेलात तरी चालेल. फक्त एखादी पेन किलर गोळी आणुन द्या.”

आता मात्र त्या तिघांना जरा हसू फुटलं होत. आजवर राजकारण्यांचा दबाव आणून काम करून घेणारे मित्तल साहेब, त्यांचा आज झालेला भित्रा ससा बघून त्यांना हसायला आलेल होत.

पोलीसांनी मित्तल साहेबांनी, परमारांनी आणि जे आगीत जखमी झाले होते त्या सगळ्यांच पुन्हा स्टेटमेंट घेतलं. उपकरणाची ब्ल्यु प्रिन्ट आधीच प्रसादने शोधून दिलेली होती. ज्या पध्दतीने प्रसादने त्या मशीनचा रिपोर्ट काढून दिला ते बघून ते उपकरण प्रसादच असल्याच आता सिध्द झालेल होत. सरकारी अधीकारी सावंत साहेबांच्या मृत्यूमागे ही परमारांनी मित्तल साहेबांचा हात असल्याच कबूल केल होत.

आता फक्त ती आग कशी लागली? हे अजून पूढे यायचं बाकी होती. एकदा का ते समजलं की प्रसादवर लागलेल्या आरोपातून तो मुक्त होणार होता. त्या उपकरणाने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही बाहेरच्या वायरींग मुळे आग पकडली गेली एवढचं आलेल होत. त्यामुळे ती आग कशी लागली याची माहीती कोणालाही समजूनच येत नव्हती.

केसची तारीख उजाडली. आज प्रसाद ब-याचश्या आरोपातून मुक्त होणार होता. त्यामुळे सरला, विमला आज निवांत होत्या. पण एक गोष्ट खटकत होती की आज सकाळपासून नाही आजोबांचा काही पत्ता होता आणी नाही राजनचा. आजवर आजोबा काही बोलत नव्हते आणि जास्त हॉस्पिटलला आले ही नव्हते. म्हणून सरलांना त्यांच्याबद्दल जरा रागच आला होता. पण कालपासून राजनचा एकही फोन आला नव्हता आणि आज तो आला ही नव्हता. ते बघून सरलांना त्याची काळजी वाटायला लागली होती.

थोड्याचवेळात पोलीसांची जीप प्रसादला घेऊन जायला आली. साईराज ही सकाळीच तिथे आलेला होता. विद्या आणि मायकल ही सोबतच आलेले होते. परी मात्र डायरेक्ट न्यायालयात येणार होती. सोनीया, ऋतुजा, रक्षा, मयंक हे देखील सोबत येणार होते. सगळेच आज खूप आनंदात होते. कारण साईराजने शब्द दिला होता की आज प्रसाद निर्दोष मुक्त होणार. कसं? ते माहीत नव्हतं. पण त्याच्या शब्दावर सगळ्यांनाच विश्वास होता.

तेवढ्यातच साईराज सरलांजवळ आला आणि त्यांचे हात हातात घेतले. सरला त्याच्याकडे प्रश्नार्थक बघू लागल्या.

“मावशी आज जे काही कोर्टात होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमची मानसीक तयारी करा.” साईराज गंभीर होत बोलला. “आज खूप काही गोष्टी बाहेर येतील. ज्या आजवर पडद्यामागे होत्या.”

“असा का बोलत आहेस रे?” सरलांचा चेहरा चिंताग्रस्त झाला.


क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all