अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ६

तिथे तो जास्तवेळ थांबु ही शकला नाही. तो लगेच आतल्या रुममध्ये निघुन गेला होता. सोनीयाने ऋतुजाकडे पाहिले. ऋतुजाने तिला नजरेनेच धीर दिला आणि उद्या बोलु म्हणून सांगीतले.
मागील भागात.

परीचे वडील “चल बेटा निघायचं ना?” परीकडे बघत बोलले.

तशी परी हळुच तिची नजर प्रसादवर टाकुन तिथुन निघाली होती. ऋतुजा, सोनीया, रिया तिला सोडायला गाडीपर्यंत गेल्या होत्या. प्रसादची तर हिम्मतच झाली नव्हती तिला निरोप द्यायची. तो लांबूनच तिची गाडी दिसेनाशी होईपर्यंत तिला बघत राहीला होता. मग सगळेच आप आपल्या जरी परतले होता.

परी तिच्या घरी परतल्यावर आता प्रसादसोबत फोनवर बोलु लागली होती. दोघांनाही भेटायची इच्छा झालीच तर दोघांसाठी मध्य ठरेल अशा ठिकाणी ते भेटत होते. मोठी माणस सध्यातरी या गोष्टीपासून अनभिज्ञ होते. पण बाकी मुलांनी त्यांना चिडवुन हैराण केल होत. फक्त प्रसादच्या आजोबांना ते बरोबर माहीती पडलं होत. अनुभवी नजर ती, तिच्या पासुन लपुन तरी काय राहु शकते? मग एके दिवशी त्यांनी प्रसादला रंगहात पकडल होत. आधीपासून एकमेकांचे क्राईम पार्टनर होते. मग ह्या गोष्टीतही आजमितीस गुपचिळी करुन राहीले होते.

सगळ काही सुरळीत चालु होत. पण सुखाची दिवाळी साजरी केल्यानंतर दुखाःची एक सर येतेच की.

आता पुढे.

एके रात्री प्रसादच्या घरी सगळे साखर झोपेत असताना त्याच्या वडीलांची प्राणज्योत कायमची मालवली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची संधी ही त्यांनी कोणाला दिली नव्हती.

प्रसादची आई, आजोबा आणि बहीण खुपच खचल्या होत्या. अशा वेळेस प्रसादने स्वतःला सावरलेले दाखवत आजोबा आणि दोघींना खुप धीर दिलेला होता. नंतर परीजवळ मात्र त्याने मनसोक्त रडून घेतलेल होत. आयुष्य तर नेहमीप्रमाणेच चालु झाल होत. पण सध्या ते भकास होत. प्रसादच्या कॉलेजची शेवटच्या वर्षाची फी भरायची बाकी होती. तर सोनीयाच एमबीएसाठी ॲडमीशन घ्यायच होत. घरखर्च चालवण्यासाठी ही पैसे अपुरे पडत होते. घराचे लोनचे अजुन दोन वर्षाचे हप्तेही बाकीच होते. त्यात आजोबांचा दवाखान्याचा खर्चही होता. त्यामुळे प्रसाद आता अडचणीत सापडलेला होता. तात्पुरती तर ऋतुजाच्या घरातुन थोडीफार मदत झाली होती. पण ती तरी किती दिवस घेणार होते. घेतली तरी बाकीचे मोठे खर्च आ वाचुन उभेच होते.

सोनीयाने तिच ॲडमीशन एक वर्ष नंतर करण्याची तयारी ही दाखवलेली होती. तीच ते समझदारीच रुप बघुन प्रसाद आणि त्यांच्या आईला छुपच भरुन आलेल होत.

काही दिवसांनी प्रसादचे मामा राजन त्याच्या घरी आलेले होते. प्रसादाच्या आईने त्यांच्यापुढे मदतीसाठी शब्द टाकला होता. त्यामुळे त्यांनी सगळीच मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मग प्रसादला थोडा धीर आलेला होता. त्यांच्या घराची गाडी आता थोडी रुळावर आलेली होती. प्रसादनेही पार्ट टाईम जॉबसाठी विविध कंपन्यामध्ये अर्ज देऊन ठेवलेला होता.

नंतर काही दिवसांनी प्रसाद आनंदातच त्याच्या घरी आलेला होता. त्याला त्याच्या मनाप्रमाणे पॅकेज असणारा जॉब भेटला होता. येतानाच त्याने मिठाईचा बॉक्स आणलेला होता. घरात आल्या आल्या त्याने त्याच्या आईच्या पाया पडुन तिला पेढा चारला होता. नंतर तो लगेच आजोबांजवळ गेला. त्यांनाही थोडासाच तुकडा चारत त्यांच्या पाया पडला होता. ते ही जरा शांत शांतच वाटले त्याला. मग त्याच लक्ष त्याच्या मामाकडे गेल होत. मग त्याने त्यांना पण पेढा चारला होता. नंतर तो सोनीयाला पेढा चारायला गेला. तर तिचे डोळे जरा भरलेले त्याला वाटले. तिच्या तोंडावर आनंदाचा लवलेशही नव्हता. प्रसादला ते जरा वेगळच वाटल होत.

“बरं झाल तुच पेढे घेऊन आलास.” मामा आनंदाने बोलले. “आज दोन दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत.” मामाच्या बोलण्याने प्रसादच लक्ष सोनियाच्या भरलेल्या डोळ्यांवरुन हटलं गेल होत.

“अरे वा! दोन?” प्रसाद हसतच बोलला. “दुसरी कुठली?”

“अरे दादा.” सोनीया मुद्दाम मध्येच बोलली. “आधी देवाला तर ठेव.”

“दिला ना माझ्या देवाला.” प्रसाद त्याच्या आईला मिठी मारत बोलला.

“वेडाच आहे.” प्रसादच्या आईला भरून आलं. “जा आधी देवघरात ठेव.”

प्रसादने देवघरात पेढे ठेवले. सोनीया त्याच्या मागेच होती. तो एकटा कधी भेटेल याची वाट बघत होती.

“काय पाहीजे बोल?” प्रसादने त्याच्या मागे फिरणाऱ्या सोनीयाला बघुन विचारलेच.

“त.. तुला काहीतरी महत्वाच सांगायच आहे.” सोनीया घाबरुन बोलत होती.

“बोल ना मग.” प्रसाद हसतच बोलला.

सोनीया पुढे काही बोलणार तोच प्रसादच्या आईने आवाज दिला.

“भावा-बहिणीच पेढ्यावरुन भांडण झाल असेल तर या बाहेर.” प्रसादची आई हसतच बोलली.

“आलो गं. तु काय तिच्या मागे लागतेस. एकुलती एक तर आहे. तिच्यासोबत नाही भांडणार तर कोणासोबत भांडु.” प्रसादने सोनीयाचे केस ओढले आणि लगेच बाहेरच्य खोलीत आला होता. सोनीया त्याच्या मागेच होतीच. पण सोनीयाने काहीच रिप्लाय केला नाही म्हणून प्रसादला आश्चर्य वाटलं. पण त्याने परत त्याकडे दुर्लक्ष केलेल होत. तेवढ्यात ऋतुजा तिच्या आई वडिलांसोबत प्रसादच्या घरी येऊन पोहोचली होती. इथे ऋतुजाच्या चेहर्‍यावरही बारा वाजले होते. आता मात्र प्रसादच्या मनात शंकेची पाल जरा चुकचुकायला लागली होती.

“सांगा बरं काय बातमी आहे जी आम्हाला घाईतच बोलावले.” ऋतुजाचे वडील त्यांना अजुन काही सांगीतलेलच नव्हतं.

“अहो, दादाने तिच्या मुलीसाठी प्रसादाला मागणी घातली आणि आजच त्याला जॉबपण लागला.” प्रसादच्या आईने ऋतुजाच्या वडीलांना पेढा दिला. तसाच ऋतुजाच्या आईलाही पेढा दिला.

“पायगुण ओ. दुसर काय.” ऋतुजाची आई हसतच बोलल्या. “लक्ष्मीच आली म्हणायची.”

इकडे प्रसादला त्याने काय ऐकलं आहे? याचाच तो अजुनही विचार करत होता. खुपच मोठ्ठा धक्काच बसला होता त्याला. तिथे फक्त सोनीया आणि ऋतुजालाच प्रसादची परिस्थिती कळतं होती. आजोबांनीही जेव्हा हे ऐकल होत. त्यांनाही हा धक्काच होता. त्यांनी सरलांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी गरजेला आपली मदत केली म्हणून आपण ही मदत केली पाहीजे. हे आजोबांचं तत्व सरलांनी त्यांना ऐकुन दाखवलं होत. मग ते ही गप्पा बसले होते.

यामुळे सध्या प्रसादला कोणीही आधार देऊ शकत नव्हतं. या तिघांचा पडलेला चेहर्‍यामागच कारण आता त्याला समजलं होत. पण सध्यातरी त्याने शांत बसणच ठरवलं होत.

तिथे तो जास्तवेळ थांबु ही शकला नाही. तो लगेच आतल्या रुममध्ये निघुन गेला होता. सोनीयाने ऋतुजाकडे पाहिले. ऋतुजाने तिला नजरेनेच धीर दिला आणि उद्या बोलु म्हणून सांगीतले.

थोड्यावेळाने प्रसादची आई त्याच्या रुममध्ये गेली. प्रसाद बेडवर पसरलेला होता. त्याची नजर छताकडे स्थिरावलेली होती. जशी त्याला आई आल्याची जाणीव झाली तसा तो सावरून बसला होता. त्याच्या मागे त्याचे आजोबाही आले होते.

“सॉरी रे बच्चा.” सरलांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

“सॉरी का?” प्रसाद गोंधळला. त्याने एक नजर त्याच्या आजोबांकडे टाकली होती. तर त्यांनी त्यांची नजर फिरवली होती.

“मला माहितीये सर्व.” प्रसादच्या आईने एक पॉज घेतला. “परीबद्दल.”

तसा प्रसाद उडालाच होता.

“आमची केस उगाच नाही पांढरी झाली.” सरला निर्विकार होऊन बोलत होत्या.

“तरी तु मामांना हो म्हणालीस?” प्रसादला हा अजुन एक मोठा धक्काच बसला होता. सगळं माहिती असुनही मामांना लग्नासाठी होकार दिला म्हणुन.

“त्याच शब्दावर तर त्याने मदत केली.” आईने नजर फिरवली.

“म्हणजे माझा व्यवहारच केलात तुम्ही.” प्रसाद आता प्रचंड दुखावला गेला होता. आता त्याला आजोबांच नजर फिरवणं समजुन गेल होत.

“असं का बोलत आहेस राजा?” आईने प्रसादला जवळ घेतलं.

“मला विचारलं का आधी?” प्रसाद चिडुन बोलायला लागला. “मला जॉब तर लागणारच होता ना. त्यात तिच्या पायगुणाचा काय संबंध होता?”

“घराचा हप्ता तोंडावर आलेला होता. तुझी फी, सोनीयाचं ॲडमीशन. घरातला रोजचा वेगळाच खर्च.” आई भावुक झाली. “कुठे कुठे पुरला असतास रे तु?”

“अगं पण..” प्रसाद पुढे बोलणार तोच आई बोलली.

“मी शब्द दिलाय त्याला.” आईने प्रसादसमोर हात जोडले. “मला त्याच्यासमोर मान खाली घालायला लावु नकोस.”

“तुमच्या अशा वागण्याने आम्ही खुश राहु अस वाटतं तुम्हाला? उलट चार-चार आयुष्य, कुटुंब उध्वस्त होतील.” प्रसाद त्याची बाजु पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

“जेव्हा गरज होती. तेव्हा कोणीच उभं राहील नव्हतं रे. तेव्हा तुझे मामाच आपल्या पाठीशी उभे होते एवढं लक्षात ठेव. आपल्याला हवं असेल ते सगळचं आपल्याला भेटतचं अस नाही.” सरला कणखर आवाजात बोलल्या.

“आजोबा.” प्रसादने शेवटची आशा म्हणुन त्यांच्याकडे पाहील.

“एखाद्याने आपल्याला केलेली मदतीची परतफेड करणं हे आपल कर्तव्य असतं.” आजोबा ही कडक आवाजातच बोलले होते. “त्यात कसुर करणं हे आपल्या तत्वात बसत नाही.”

प्रसादला तर आता शब्दच फुटत नव्हते. सोनीयाचाही गोंधळ होत होता की नक्की कोणाची बाजु घ्यावी म्हणुन.

“आईच्या शब्दाला तु आजवर जागला आहेस. यापुढे ही जगशील अशी अपेक्षा करते.” आई प्रसादच्या रुममधुन बाहेर पडली. तसे त्याचे आजोबा ही प्रसादची नजर टाळुन बाहेर गेले होते.

ती रात्र प्रसाद त्याच्या झोपेला मुकला होता. त्या दिवशी जेवण तर कोणालाच गेल नव्हतं. आता त्याला काही करुन परीला भेटायचं होत. ती कॉलेजच्या कामासाठी बाहेर गेलेली होती. परत जाताना ती ऋतुजाच्या घरी थांबुन मग दुसर्‍या दिवशी तिच्या घरी जाणार होती. त्यासाठी अजुन दोन दिवस होते. आत्तापर्यंत ही बातमी बाकी ग्रुपलाही समजली होती. दुसर्‍याच दिवशी ते सगळे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जमले होते.

“तु फक्त बोल रे.” साई चिडुन बोलला. “लग्न मोडण्यात जमा राहील."

“तु कसा राहु शकशील रे तिच्याशिवाय?” विद्या काळजीने बोलली.

“दुसरा काहीतरी मार्ग काढु ना.” अभिनव

मायकल मात्र शांत पणे प्रसादचा चेहरा वाचत होता. त्या सगळ्यांनाच प्रसादची खुपच काळजी लागुन राहीली होती. आजवर तो सगळ्यांनाच मदत करत राहीला होता. तोच आज हतबल झालेला बघुन सगळ्यांच काळीज तुटत होत.

“आईचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा असतो.” एवढचं बोलुन प्रसाद तिथुन चालला गेला होता. सगळेच त्याच्याकडे बघत राहीला होते. आपण काहीच करू शकत नाही याचा राग त्यांना स्वतःवरच येत होता.

कर्तव्य की प्रेम? या विवंचनेत प्रसाद अडकला होता. प्रेम निवडावं तर त्याच्याकडुन कर्तव्याची प्रतारणा होणार होती. जर कर्तव्य निवडतोय तर तो प्रेमाला मुकणार होता आणि दोन्ही पैकी एकाचीच निवड म्हणजे त्याचा जीवच सोडण्यासारखं होत.

प्रसाद नेहमीच्या तलावाच्या ठिकाणी येऊन बसला होता. त्याला जेव्हा जेव्हा मन मोकळ करावसं वाटायचं, तेव्हा तो तिथे जाऊन बसायचा. तलावाच्या काठी असणाऱ्या त्या हिरव्यागार वनराईत त्याच मन रमून जात असायचं. निसर्ग गोष्टच अशी आहे की त्याच्या सानिध्यात गेल की तो आपल्याला त्याच्यात सहज सामावून घेत असतो.

पण त्याच मन आज कशातच लागत नव्हतं. शेवटी त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडला. तसा तो जरा दचकलाच. त्याने मागे वळून पाहिल तर ती उभी होती. जिच्याबरोबर आयुष्य घालवायच होत. आज तिलाच एक ऑप्शन म्हणुन निवडावे लागेल याची त्याला कल्पनाच करवत नव्हती. तिच ते हसण बघुन तो भुतकाळात हरवला होता. हेच ते हसणं होत जिच्या प्रेमात तो पडलेला होता.

“बास रे.” परी हसत बोलली “किती बघशील?”

“किती ही बघीतल तरी कमीच पडत.” आज प्रसाद नेहमीसारखा हसला नव्हता.

परीने प्रसादच्या हातावर हात ठेवला. तिचे डोळे किंचीत ओलावलेले दिसले.

“आयुष्य किती सरप्राईज देत ना?” परी तलावाकडे बघत बोलली.

“हमममम.” प्रसादची नजरही तिकडेच स्थिरावलेली होती.

“आणि सगळेच आपल्या मनासारख होईल असही नसत.’ परीने प्रसादकडे पाहिले.

तिच्या या वाक्यावर प्रसादने चमकुन तिच्याकडे पाहिले. “नक्की काय म्हणायच आहे तुला?” प्रसाद

परीने त्याच्या हातावर तिचा हात ठेवला. “तु घे लग्न करुन.”

“काय?” प्रसाद चिडुन बोलला. “वेडं लागलय का तुला?”

“तस समझ हवं तर.” परी दुर बघत बोलली.

“आपण दुसरा मार्ग काढु ना यातुन?” प्रसाद केविलवाण्या आवाजात बोलला.

परीने भरलेल्या डोळ्यांनी प्रसादला पाहिले. “आपण जेवढी पण स्वप्न पाहिली ना. त्यात आपली फॅमिली होती. पण जर तिच खुश रहाणार नसेल. तर मग या नात्याचा काय फायदा?”

“का सगळेच त्यांची-त्यांची मर्जी माझ्यावर थोपवू राहीले आहेत?” प्रसाद रागात ओरडला.

“कारण, आपल प्रेम स्वार्थी नाहीये रे राजा.” परीने त्याच्या खांद्यावर तिच डोक टेकवल. “प्रेम हे सुख देण्याचाच नाव आहे.”

प्रसाद आता गोंधळला होता. त्याने नक्की काय विषय आहे तो तर सांगीतलाच नव्हता आणि परी तर वेगळीच वागत आहे.

“एक मिनीट.” प्रसाद आता परीला रोखुन बघु लागला. “मी तर तुला काहीच सांगीतल पण नव्हतं.”

“ऋतुजा.” परी

“तरी असा निर्णय एकटीनेच का घेतलास?” प्रसाद अजुनही चिडुनच बोलत होता.

“तुला माझ्यावर विश्वास नाहीये?” परी स्वतःच्या भावनांना आवर घालत बोलत होती.

“माझ्या प्रश्नाच हे उत्तर नाहीये.” परीच्या प्रश्नावर प्रसाद आता जरा नरमाईने बोलला होता.

“यापुढे तुझा प्रत्येक प्रश्न माझ्यावर अविश्वास असल्याच मी समजेल.” परीला आता तिच्या भावनांवर आवर घालण कठिण होत चाललं होतं.

“परी.” प्रसादच्या डोळ्यात अश्रूंनी असहकार केला. ती असं का वागत आहे? हेच त्याला कळत नव्हतं.

परी सकाळी अकराच्या सुमारास ऋतुजाच्या घरी पोहोचली होती. प्रसादला भेटायची तिला खुप घाई झाली होती. ती जशी ऋतुजाकडे आली होती तस ऋतुजा तिला तिच्या रुममधे घेऊन जाऊ लागली होती. ऋतुजाची आई पण ऋतुजाच अस वागणं बघुन गोंधळली होती. तेवढ्यातच प्रसादची आई देखील ऋतुजाच्या घरी आली होती. तिने परीला येताना पाहिल होत. प्रसादही बाहेर गेलेला होता. ऋतुजाचे वडीलही कामावर गेलेले होते.

“काय ओ? अशा घाई-घाईत आल्या?” ऋतुजाची आई प्रसादच्या आईला विचारत होती.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरु नका.

🎭 Series Post

View all