अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ७

हवालदार बोलल्यासरशी साळवेंनी परीकडे पाहील आणि तिला बघतच राहीले होते. तिला कुठेतरी पाहिल्यासारखं त्यांना वाटत होत.
मागील भागात.

"तुला माझ्यावर विश्वास नाहीये?” परी स्वतःच्या भावनांना आवर घालत बोलत होती.

“माझ्या प्रश्नाच हे उत्तर नाहीये.” प्रसाद

“यापुढे तुझा प्रत्येक प्रश्न माझ्यावर अविश्वास असल्याच मी समजेल.” परी आता तिच्या भावनांवर आवर घालण कठिण होत चाललं होतं.

“परी” प्रसादच्या डोळ्यात अश्रूंनी असहकार केला. ती असं का वागत आहे. हेच त्याला कळत नव्हतं.

परी सकाळी अकराच्या सुमारास ऋतुजाच्या घरी पोहोचली होती. प्रसादला भेटायची तिला खुप घाई झाली होती. ती जशी ऋतुजाकडे आली होती तस ऋतुजा तिला तिच्या रुममधे घेऊन जाऊ लागली होती. ऋतुजाची आई पण ऋतुजाच वागण बघुन गोंधळली होती. तेवढ्यातच प्रसादची आई ऋतुजाच्या घरी आली होती. तिने परीला येताना पाहिल होत. प्रसादही बाहेर गेलेला होता. ऋतुजाचे वडीलही कामावर गेलेले होते.

“काय ओ? अशा घाई-घाईत आल्या?” ऋतुजाची आई प्रसादच्या आईला विचारत होती.

आता पुढे.

सगळ्यांची नजर सरलावर रोखली गेली होती.

“माझ्या मुलाची मी भीक मागायला आली आहे.” प्रसादची आई परीकडे बघत बोलल्या. त्यांचे डोळे खुपच भरलेले होते.

या वाक्यावर ऋतुजाची आई आणि परी दोघी गोंधळलेल्या होत्या. प्रसादची आई परीजवळ आली. ऋतुजला जी भिती वाटतं होती तेच आता घडतं होत. तिला आता काय करावं? तेच सुचतं नव्हतं.

“मला माहीत आहे की तुमच प्रेम आहे एकमेकांवर. पण माझ्या भावाने माझ्याकडुन शब्द घेतला होता. तिच्या मुलीशी लग्न लावुन दिल तरचं मदत करेल म्हणुन. शब्द तर दिला पण तो तुझ्यात इतका अडकला आहे की तो घरात निट वागतच नाहीये.” प्रसादची आई एका दमात बोलुन मोकळी झाली होती.

परी अजुनही सरलांनी बोललेल्या वाक्याचा अर्थ लावत होती. ती त्यांच्याकडे बघत राहीली होती.

“अहो काय केलत तुम्ही?” ऋतुजाची आई आता चिडुनच बोलल्या होत्या. “सगळं काही माहीती असुनही असा शब्द दिलाच कशाला?” ऋतुजाची आई आता जरा नरमुन बोलल्या. “माझ्या भावाची मुलगी आहे म्हणुन मी नाही सांगत. पण तुमच्या या शब्दाने किती आयुष्य उध्वस्त होतील कळतयं का तुम्हाला?”

“कळतयं ओ. पण मला दुसरा उपायच दिसला नव्हता.” प्रसादची आई हतबल दिसत होती. परी तर अजुन शॉक मध्येच होती.

“बोलल्या असत्या तर आपण काहीतरी उपाय काढलाच असता ना?” ऋतुजाची आई पण आता हळवी झाली होती. त्यांना दोघांच प्रेम चांगलच जाणवलेलं होत आणि आता अस अचानक तिच ह्रदय तुटताना बघुन त्यांच्याही ह्रदयाच पाणी-पाणी होत होत.

“प्लिज परी.” प्रसादच्या आईने आता परीसमोर हात जोडले होते.

“अहो, असे हात नका जोडु.” परीला त्यांनी हात जोडलेले पाहुन ऑकवर्ड वाटायला लागल होत. तिच्या अश्रूंनी कधीच तिच्या पापण्यांची वेस ओलांडली होती.

“फक्त शब्द दिलाय म्हणुन नाही. पण खुप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. प्रसादच्या वेळेस तर त्याच्या बाबांना नोकरी पण नव्हती. तेव्हा तो वेळेआधीच जन्माला आलेला होता. त्यावेळेसचा हॉस्पिटलचा सगळाच खर्च त्याने केला होता. प्रसादला मरणाच्या दारातुन त्याने परत आणलं आहे.”

प्रसादची आई त्या आठवणींमुळे रडायलाच लागल्या होत्या. ऋतुजाची आई त्यांचेही अश्रु वाहत होते. परीच्या मनाची कल्पना करुनच ऋतुजाला स्वतःला सावरत कठिण झाल होत. ती आता परीच्या बाजुला येऊन उभी राहीली होती.

थोडावेळ असाच गेला. भावनांचा पुर जरा ओसरला होता. परीने तिचे डोळे पुसले आणि ती प्रसादच्या आईजवळ गेली.

“ठिक आहे.” परीला आता प्रत्येक शब्द बोलण कठिण होत होत. “मी मुक्त करेल त्याला माझ्यापासून. पण….”

“पण काय?” परी बोलता बोलता थांबली म्हणुन सरलांनी तिला विचारलं होत.

“मी तर त्याला माझ्यापासुन मुक्त करेल. पण त्यानंतर त्याच्या डोळ्यात एकजरी अश्रु आला ना. तर मी कोणालाच सोडणार नाही.” परीच्या आवाजात आता प्रचंड राग उतरला होता. तिचा आवाज पुर्ण घरात घुमला होता.

क्षणभर तर बाकी दोघी तर भांबावूनच गेल्या होत्या. तिच्या बाजुला आलेली ऋतुजा ही दोन पावल मागेच सरकली होती.

परी सगळ्यांवर कडक नजर टाकुन आतल्या खोलीत निघुन गेलेली होती. तर बाकी जणी अजुनही परीच्या वाक्यावर शॉकमध्ये होत्या.

दोन मिनीटांनी सरलांनी स्वतःला सावरल आणि ऋतुजाच्या आईची नजर टाळुन त्या त्यांच्या घरी निघुन गेल्या होत्या.

थोड्यावेळाने परी तिच सजळचं आवरुन खाली आलेली होती. ती आज थांबणार होती. पण आता तिला तिथे रहावं अस वाटतच नव्हतं.

“काय गं? थांबणार होतीस ना?” परीला तिच्या बॅगसोबतच आलेल बघुन ऋतुजाची आई लगबगीने पुढे आली होती.

“सॉरी आत्या. पण सध्यातरी मला इथे रहावसं वाटणार नाही.” परी निर्विकार होऊन बोलत होती. “परत येईल की नाही ते ही सांगता येणार नाही.”

तिच्या वाक्यावर ऋतुजाने तिला घट्ट मिठी मारली होती. मग रिया ही तिला बिलगली होती. “इथे झालेली गोष्ट कोणीही प्रसादला सांगणार नाही.” परी दोघींना बघत बोलली.

“आम्हाला पण भेटायला नाही येणार?” रिया मुसमुसत बोलली.

“आत्ताच नाही सांगु शकत. पण तुम्ही तर येणारच ना गावाला.” परी उसन हसली. “मी आलीच थोड्याचवेळात.” एवढं बोलुन परी घराबाहेर पडली होती. मग ति प्रसादने बोलावलेल्या ठिकाणी पोहोचलेली होती.

“वचन दे मला. तु आनंदाने राहशील?” परीने प्रसादसमोर हात केला.

“माझ्याशिवाय तु राहु शकशील?” प्रसाद ओलावलेल्या डोळ्यांनी तिला विचारत होता.

“तु तुझ्या आईला सोडुन राहु शकशील? तुझ्यामुळे तुझी आई हतबल झालेली चालेल तुला?” परी प्रसादच्या डोळ्यात डोळे घालुन बोलली.

तशी प्रसादने नकारार्थी मान हलवली.

“बघुया ना. नशीबात असेल तर आपण नक्की भेटु.” परीने हलकीच स्माईल दिली.

“मला पुण्याला संधी भेटली आहे.” परी “तिकडेच चालली मी. येईल की नाही ते आता नाही सांगु शकणार.”

प्रसादने परीला घट्ट मिठी मारली. दोघांचे अश्रु एकमेकांत विरुन चालले होते. मग परी हळुच त्याच्या मिठीतून बाहेर आली.

“गाडीची वेळ झालीये.” परी “यापुढे माझ्यासाठीच का असेना पण आनंदाने जगशील.” परीने प्रसादच्या डोळ्यातले अश्रु पुसले. प्रसादनेही जड ह्रदयाने होकारात मान हलवली. तशी परी उठुन जाऊ लागली.

तिची निरोपाची पावले खुपच जड झालेली होती. तिची प्रसादकडे मागे वळून बघायची हिम्मतही झाली नाही. परी नजरेआड होईपर्यंत प्रसाद तिला बघत राहीला होता. बराच वेळ तो तिथेच बसुन राहीला. शेवटी आईला उगाच काळजी लागुन राहील म्हणून तो ही हळुहळु घराकडे चालला गेला.

परी भुतकाळाच्या विचारात असतानाच तिच्या खांद्यावर एक हात पडला. तशी ती भुतकाळातुन बाहेर आली होती. तिने वळुन पाहील तर विद्या होती. तिचेही डोळे जरा ओलावलेले होते.

“नशीबात असेल तर भेटु, असं बोलली होती मी त्याला.” परी भकास हसत बोलली. “पण अशी भेट होईल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं.”

विद्याने तिला मिठीत घेतलं होत. तिच्यापाठी मायकल पण उभा असलेला तिला दिसला.

“म्हणजे सगळ्यांनाच मेसेज गेले वाटतं.” परी तिचे डोळे पुसत बोलली.

थोडावेळ ते तिघेही तिथेच बसुन जुन्या आठवणीत रमले होते. संध्याकाळ झाल्यावर मग ते तिघेही हॉस्पिटलकडे जायला निघाले होते.

हॉस्पिटलमध्ये तिघांना आलेल बघुन सरला परत स्वतःचे अश्रु सावरून बसल्या होत्या. आता तर तिथे आजोबाही आलेले होते. ऋतुजा ही तिथेच होती. तर विमला आणि सोनीया घरी गेलेले होते.

परी जाऊन प्रसादजवळ बसली. तिने हलकेच त्याचा हात हातात घेतला. साध्या इंजेक्शनलाही घाबरणा-या प्रसादच्या हाताला सुया टोचलेल्या बघुन परीचे डोळे परत भरुन आले होते.

थोडा वेळ असाच शांततेत गेला होता. प्रसादला ठेवलेल्या रुमच्या बाहेर एक पोलीस हवालदार ही तैनात ठेवलेला होता. संध्याकाळची आता रात्र झाली होती. सोनीया आता जेवणाचा डबा घेऊन आली होती.

सरलांनी तो डब्बा बघीतला आणि गोंधळून गेल्या होत्या. कारण तिने फक्त एकच माणसापुरतीच जेवण आणलेल होत.

“हे काय गं सोनी?” सरलांनी प्रश्नार्थक पाहील.

“ते परीताईने सांगीतलं होत.” सोनीया परीकडे बघुन बोलली.

“बाकी सगळ्यांनी घरी जावा.” परी प्रसादवरुन नजर न हटवता बोलली.

“अगं पण…” सरला पुढे बोलणारच होत्या की परीने त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला. मग त्या बोलायच्या थांबल्या.

“खुप दगदग झाली आहे तुझी.” आजोबा सरलांकडे बघत बोलले. “चल घरी जाऊन आराम कर.” आजोबा अजुनही शांततेत बोलत होते.

एवढं सगळ घडूनही हा माणुस इतका शांत कसा राहु शकतो? हा प्रश्न सरलांना पडला होता.

“मायकल.” परीने आवाज दिला. तसा मायकल जवळ आला होता. “यांना घरी घेऊन जा.”

तसे सगळेच मुकाट्याने घरी जायला निघाले होते. कारण ती असेपर्यंत प्रसादच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्रीच होती.

दिवसभराची ड्युटी संपवून तिथे असलेला हवालदार आता जायला निघाला होता. त्याच्या जागी आता नाईट ड्युटीवाला हवालदार येऊन थांबला होता. त्याने आत येऊन पाहीलं तर परी अजुनही प्रसादजवळ बसलेली होती.

“ओ मॅडम बस झाल आता.” तो हवालदार जरा आवाज चढवतचं बोलला. “भेटायची वेळ संपली. निघा आता.”

तस परीने त्याच्यावरही रागीट कटाक्ष टाकला होता. तो हवालदार परत काहीतरी बोलणार तोच हेड कॉन्स्टेबल साळवे येऊन पोहोचले होते. तिथल्या पोलीस स्टेशनचे सर्वात अनुभवी हवालदार. वयाने आणि बुध्दीमत्तेने तितकेच हुशार. फक्त पुढे शिकता आल नव्हतं. म्हणुन हेड कॉन्स्टेबल या पदापर्यंतच त्यांचा ड्युटीचा प्रवास थांबलेला होता.

“काही प्रगती?” साळवेंनी त्या हवालदाराला विचारलं.

“कसलं काय? झोपुनच आहे अजुन.” हवालदार तोंड वाकडं करत बोलला. “त्यात ही पोरगी पण इथुन जाईना. माझ्याकडेच रागात बघत आहे.”

हवालदार बोलल्यासरशी साळवेंनी परीकडे पाहील आणि तिला बघतच राहीले होते. तिला कुठेतरी पाहिल्यासारखं त्यांना वाटत होत.

परी घराकडे फ्रेश होऊन येताना साध्या पंजाबी ड्रेसमध्ये आली होती. त्यामुळे साळवेला लवकर तिची ओळख पटत नव्हती. पण त्याला तिची नजर बघुन थोडी थोडी शंका यायला लागली होती. काहीच आठवत नसल्याने शेवटी त्यांनी दुर्लक्ष केल.

“असु दे.” साळवे “पेशटं जवळ कोणीतरी हवं. असही तो कुठेच जाणार नाहीये.”

एवढं बोलुन साळवे तिथुन साटमला फोन लावत निघुन गेले होते. इकडे परीच्या चेहऱ्यावर मात्र साळवेला ओळखलेल्या खुणा स्पष्ट दिसल्या होत्या. तिने जाणुनबुजुन तिचा पुर्ण चेहरा साळवेकडे केलेला नव्हता.

दोन दिवसांनी सकाळीच्या वेळेस प्रसादला हळुहळु शुध्द येत होती. सरला लगेच प्रसाद जवळ गेल्या. त्याच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवु लागल्या होत्या. सोनीयाला ही त्याला बघुन परत भरुन आल होत. विमला आणि ऋतुजा दोघींनीही देवाला हात जोडले होते. आज ऋतुजाचे वडीलही तिथे आलेले होते. प्रसादने त्याची नजर रुमभर फिरवली आणि त्याला ती दिसली. तिला बघुन त्याच्या चेहर्‍यावर हलकेच स्मित उमटलं होत. तिच्याच बाजुला विद्या आणि मायकलला बघुन त्याला खुप आनंद वाटला होता. त्याच्या चेहर्‍यावरुन तो स्पष्ट दिसत होता. आजोबांच्या चेहर्‍यावर आज सुटकेचे भाव दिसले होते. त्यांनीही मनोमन देवाला हात जोडले होते.

इकडे डॉक्टरांनी पोलीसांना प्रसादला शुध्द आल्याचे कळवले होते. ते समजताच इन्स्पेक्टर साटम लागलीच हॉस्पीटलला पोहोचले होते. त्यांनी सरलासकट सगळ्यांनाच प्रसादच्या रूममबाहेर काढले होते. हेड कॉन्स्टेबल साळवे ही आलेले होते. ते आता ही परीकडे बघतच प्रसादच्या रुममध्ये गेले होते.

आतमध्ये गेल्यावर साटम यांनी डायरेक्ट प्रश्न विचारायलाच सुरवात केली होती. जेणेकरुन त्यांच्यावर आलेल प्रेशर चार्जशीट फाईल करुन थोड कमी होणार होत.

“इन्स्पेक्टर साहेब.” डॉक्टरांनी साटमला अडवलं. “त्याला फक्त शुध्द आली आहे. अजुन काही विचारुन त्याला प्रेशर देऊ नका. नाहीतर कोमात जाईल तो.”

“इथे माझ्यावर किती प्रेशर आहे माहीती आहे का?” साटम वैतागुन बोलले.

“पण पेशटंची परिस्थिती कोर्टात समजली तर तुमच्या फाईल केलेल्या चार्जशीटला काहीच अर्थ राहणार नाही.” डॉक्टर साटमला समजावुन बघत होते.

प्रसाद पुर्ण शुध्दीत आला होता. फक्त शरीराची हालचाल करायला त्याला त्रास होत होता.

“हा काय पुर्ण शुध्दीत आला.” साटम डॉक्टरकडे बघत बोलले. “तुम्ही फक्त वाचता, लिहीता आल्याच आणि शुध्दीत असल्याच सर्टिफिकेट रेडी करा. बाकी मी बघुन घेईल.”

“काय बोलत आहात?” डॉक्टर गोंधळून बोलले.

“तो पुर्ण शुध्दीत तर आला आहे ना?” साटम बोलले तस डॉक्टरने मान हलवली होती. “मग तुम्ही तयार करा बाकी मी बघुन घेईल.”

मग डॉक्टरही निघुन गेले होते. इन्स्पेक्टर साटमने काही कागद प्रसादसमोर ठेवली आणि त्यावर सही करायला सांगीतली. प्रसादनेही काहीच न विचारता त्यावर सही केली होती. तस साटमच्या चेहऱ्यावर हसु उमटलं होत.

क्रमशः

कसा वाटला आजचा भाग? कमेंट करुन सांगायला विसरु नका.

स्पर्धा टालु असल्याने कथेचा भाग पोस्ट करायला वेळ लागत आहे.

🎭 Series Post

View all