सकाळी-सकाळी डोअरबेल वाजली. मालतीबाई उठून दरवाजा उघडायला गेल्या. दारात बघतात तर त्यांची मुलगी रीना ! हातात सामान घेऊन उभी होती. आज पुन्हा एकटीच माहेरी येऊन धडकली होती. तिला ओळखून मालतीबाईंना खास आश्चर्य वाटलं नाही.
"नक्की काहीतरी करूनच आली असेल," त्या मनातच म्हणाल्या आणि बाजूला सरकल्या. रीना आत आली, सामान कोपऱ्यात ठेवून थेट सोफ्यावर धपकन बसली.
अजून पाचच महिने झाले होते तिचं लग्न होऊन. नवरा वरुण इंजिनिअर. घरी आई-वडील, आणि एक बहीण — एवढंच छोटं कुटुंब. सासूबाई एकदम साध्या होत्या, घर कामात मदत करायच्या. नणंद पण वहिनी वहिनी करत तिच्या मागेच असायची. कोणतीही जबाबदारी तिच्या एकटीवर टाकलेली नव्हती.
पण तरीही रीना कायम सासरच्या माणसांबद्दल तक्रारी करतच होती .
मालतीबाई विचारायला फोन लावायच्या तेव्हा तक्रारींचीच रांग— हे काम दिलं, ते बोलले, मला असं करायला सांगितलं, तसं करायला सांगितलं…
मालतीबाईंना कधीच वाटत नव्हतं की या तक्रारी खरंच योग्य आहेत. सगळं मुद्दा होता— जरा जास्त अपेक्षांचा.
मालतीबाईंना कधीच वाटत नव्हतं की या तक्रारी खरंच योग्य आहेत. सगळं मुद्दा होता— जरा जास्त अपेक्षांचा.
तिला नेहमीच वाटायचं— मुलीसारखं वागवत नाहीत, मुलीला नियम वेगळे, सूनेला नियम वेगळे.
म्हणून ती वरुणशी सतत भांडत होती.वरुण समजूतदार होता म्हणून जास्त गोष्टी वाढवत नव्हता आणि कधी कधी तिला माहेरी सोडूनही यायचा.
म्हणून ती वरुणशी सतत भांडत होती.वरुण समजूतदार होता म्हणून जास्त गोष्टी वाढवत नव्हता आणि कधी कधी तिला माहेरी सोडूनही यायचा.
पण तोही कायमचा उपाय नव्हता.
लग्नाच्या आठ दिवसानंतरच ती तक्रारींचे गाठोडे घेऊन आली होती.
"आई,कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो. माझी नणंद तर अगदी साधं तयार झाली होती. पण मला किती दागदागिने, साडी वगैरे घालायला लावले. मी म्हटलंही— साधी साडी नेसते. पण सासूबाई म्हणाल्या—" नातेवाईक आहेत, काय म्हणतील!
बरोबर साधी साडी घे.दर्शनानंतर बदलून घे."
बरोबर साधी साडी घे.दर्शनानंतर बदलून घे."
मालतीबाईंनी त्यावेळीच तिचं तोंड बंद केलं होतं—
"अगं ते तर चांगलंच आहे. नणंदेसारखीच नेसण्या-वागण्यात काय तुलना?
लोकांसमोर तू नीट राहायलाच पाहिजे. आणि ते नंतरला साडी बरोबर घ्यायला पण म्हंटल्या ना."
"अगं ते तर चांगलंच आहे. नणंदेसारखीच नेसण्या-वागण्यात काय तुलना?
लोकांसमोर तू नीट राहायलाच पाहिजे. आणि ते नंतरला साडी बरोबर घ्यायला पण म्हंटल्या ना."
आजही नक्की तसंच काहीतरी करून आली असावी. म्हणूनच मालतीबाई आधी काही न बोलता स्वयंपाकघरात गेल्या. स्वतःसाठी आणि मुलीसाठी चहा घेऊन आल्या. चहा बघताच रीना हसली—
"किमान आज तरी शांतपणे चहा मिळाला ."
"का? सासरी चहा मिळत नाही का? संपूर्ण स्वयंपाकघर तुझ्याकडेच आहे ना," मालतीबाई म्हणाल्या.
"स्वयंपाकघर माझं आहे, पण शांती नाही!" रीना चिडून म्हणाली.
"काहीतरी झालाय वाटतं आज सकाळी?"
"हो आई ! तु तर माझ्या सासूसारखीच . माझ्यातच नेहमी चूका शोधते.!"
"बरं बरं, सांग काय झालं?"
"काय सांगू! माझ्या सासरचे खोटं बोलले होते. लग्नाआधी म्हणाले— सूनेला मुलगी सारखं ठेवू. पण आता सगळी कामं माझ्याकडे. स्वतःच्या मुलीला वेगळे नियम, मला वेगळे!"
मालतीबाई हळूच म्हणाल्या, "कामाचं कारण घेऊन घर सोडून येतेस?"
"नाही आई, यावेळी कामामुळे नाही. काल वरुणच्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो. मीही नणंदेसारखाच साधा सूट घातला होता. पण तिथं पोहोचताच सासूबाईंचा चेहरा उतरला. घरी आल्यावर ओरडल्या — नव्या सुनेने असे साधे कपडे घालायचे नसतात. मानमर्यादा सांभाळली पाहिजे.
नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणाला— आई बरोबरच म्हणतीये."
नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणाला— आई बरोबरच म्हणतीये."
"ओह!!तर ही गोष्ट आहे?"
"आता सांग आई , हे बरोबर आहे का? मुलगी सूट घालून गेली तर किती छान. पण मी घातला म्हणून ओरडा! बस्स! म्हणून मी आलीये."
मालतीबाई शांतपणे म्हणाल्या—
"बाळा , खरं सांगू? सून आणि मुलगी एकसारख्या कधीच नसतात. दोघींची जागा वेगळी असते, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तुझी सासू तुला मुलगी म्हणेल, पण त्यांच्याकडून मुलीसारखी बेफिकिरीची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
जसं जावयाला कधीच खर्या अर्थानं मुलगा समजत नाही, तसंच सुनेलाही अगदी मुलगी बनवत नाही. घरात येऊन घर सांभाळणारी व्यक्ती म्हणजे सून. ती परकी नसते, पण मुलीसारखी मोकळीही नसते.
आणि हे ही लक्षात ठेव— तुझ्या सासूने सार्वजनिक ठिकाणी नाही बोललं, घरी येऊन शांतपणे सांगितलं. हेच मोठं आहे.तू त्यांच्या घराची सून आहे, तुझ्याकडून थोड्या अपेक्षा ठेवणारंच ना."
रीना शांत झाली. आईचं म्हणणं तिच्या मनाला लागत होतं. थोड्याच वेळात तिने परत सासरी जाण्याचा निर्णय घेतला.
"मुलगी आणि सून यात तुलना नाही; दोघींची जागा वेगळी आणि महत्त्वही वेगळंच असतं."
समाप्त.
©निकिता पाठक जोग
