Login

अपेक्षांचे ओझे   भाग २

-


अपेक्षांचे ओझे   भाग २


©® आरती पाटील - घाडीगावकर

जलद लेखन स्पर्धा


रितेश नोटीस ला उत्तर आणि प्रांजल ला धडा शिकवण्यासाठी वकिलांकडे जातो आणि सर्व घटना सांगून नोटीस दाखवतो.

वकील, " तुम्ही सर्व सांगितलत पण तुमच्या पत्नीला डिवोर्स का हवा आहे ते नाही सांगितलत. "

रितेश, " ते मला सुद्धा माहित नाहीये. नोटीस मध्ये फक्त समान वागणूक नाही मिळत असं लिहिलं आहे."

वकील, " कारण तर नीट माहित हवं. कारण त्यांनी फक्त डिवोर्स हवा आहे आणि त्या बदल्यात कोणतीही पोटगी वगैरे नकोय असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आधी त्यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे विचारून घ्या. कारण त्याशिवाय कोर्टात आपल्याला बचाव करायला काही मिळणार नाही. "

रितेश घरी आला आणि घरी येऊन त्याने घरी वकिलांचं बोलणं सर्वाना सांगितलं.

रितेश ची आई, " म्हणजे आता आपण तिच्या नाक धुर्या काढायला जायचं का? ' काय गं बाई? काय झालं? आमचं काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून?'"

रितेश ला सुद्धा आईच बोलणं ऐकून प्रांजल चा अजूनच राग येत होता. पण तिला भेटणं आणि बोलणं गरजेचं होत कारण कोर्टात तिने काही बोलल्यावर त्यावर उत्तर तयार ठेवायचं होत. तेवढ्या रितेशला बँकेचा मेसेज आला. त्याचा घराचा या महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने त्याला त्यावर पॅनलटी लागली होती.

इतके दिवस प्रांजल घरचा हप्ता भरत होती. ती घरच्या हप्त्याची रक्कम रितेश ला ट्रान्सफर करत होती यावेळी प्रांजलने पैसे न पाठवल्याने हे घडलं होतं. आता मात्र रितेशला टेन्शन येऊ लागलं होतं.

रितेशने खूप विचार करून प्रांजल च्या वडिलांना फोन केला.
रितेश, " बाबा, तुमचं प्रांजलशी काही बोलणं झालं का ? "

प्रांजलचे बाबा, " हो रितेश झालं माझं तिच्याशी बोलणं. ती म्हणतेय तसं देऊन टाक तिला घटस्फोट. "

प्रांजलच्या वडिलांच बोलून ऐकून रितेश ला धक्का बसला. त्याला वाटलं होतं. प्रांजलचे वडील तिला समजावतील आणि त्याची माफी मागत त्याला प्रांजलला परत नांदवायला ने म्हणून सांगतील. पण सर्व उलटच घडत होतं.

रितेश चिडून म्हणाला, " मला कारण समजल्या शिवाय मी घटस्फोट देणार नाही. त्यामुळे मध्यस्ती घेऊन भेटा आणि सर्व मांडा. त्याशिवाय मी कोर्टात सुद्धा येणार नाही. कसा डिवोर्स होतो बघतोच मी. " असं बोलत रितेश ने कॉल कट केला.

इकडे बाबांनी प्रांजल ला फोन करून सर्व कल्पना दिली. त्याप्रमाणे प्रांजलने दोन्ही घरच्या कॉमन नातेवाईक असलेल्या मोठ्या मंडळींना मध्यस्ती म्हणून रितेशच्या घरीच भेटायला बोलावले. २ दिवसांनी भेट ठरली.

क्रमश :

( नक्की काय असेल प्रांजलच म्हणणं ? पाहुयात पुढील भागात. )


0

🎭 Series Post

View all