अपेक्षांचे ओझे अंतिम
©® आरती पाटील - घाडीगावकर
जलद लेखन स्पर्धा
प्रांजल पुढे म्हणते, " मी आय. टी मध्ये असल्यामुळे मला कामाचं प्रेशर जास्त असत. रितेश सुद्धा त्याच क्षेत्रात आहे त्यामुळे त्याला माहित आहेतच. अगदी रात्री सुद्धा काम करतो आम्ही. सासूबाई चं म्हणणं की कामावर जायच्या आधी सर्व करून जा. मी घरी बाई लावायचा प्रयत्न केला तर यांना घरी बाई चालत नाही. तेही अड्जस्ट करत मी काम करत होते. घरच सर्व करून, ऑफिस सांभाळायचं. शिवाय सर्व गोष्टी सर्वांच्या हातात द्यायच्या. रितेश ला म्हणाले की आईना सांग, आपण एक बाई कामाला ठेऊ. मी घरच- दारच करून खूप थकते. हवं तर मी पैसे देते बाईला. त्यावर रितेश चिडला आणि मला ऐकवू लागला. तू मला जाणीव करून देतेस का? तू माझ्यापेक्षा जास्त कमावते याची ? यावरून वाद केला. त्यामुळे बाई विषय बंद झाला.
घर घ्यायच्या आधी जान्हवी चं लग्न ठरलं आणि त्यासाठी रितेशने मोठं पर्सनल लोन उचललं. त्यानंतर तिच लग्न मोडलं. मग तेच पैसे तिच्या ऍडमिशन साठी लावले. घर घ्यायचं म्हणून रितेशने पुन्हा लोन घेतलं. आणि त्याचे हप्ते मी भरावे ही अपेक्षा. "
रमाबाई रागाने म्हणाल्या, " नवरा बायको कडून अपेक्षा करणार नाही का? "
प्रांजल, " बरोबर आहे नवऱ्याने कर्ज घेतलं तर बायकोने फेडायला हवं. पण त्या प्रॉपर्टी वर माझं सुद्धा नाव लाव असं म्हणाले तर तुझा माझ्यावर विश्वास नाही का? असा प्रश्न ? नवरा - बायको आहोत ना आम्ही ? मग त्यावर माझं नाव का लावला नाही ? तरीही ठीक आहे. घरचे हप्ते मी भरणार, किराणा मी भरणार, लाईट बिल मी भरणार, इंटरनेट बिल मी भरणार. ऑफिस मधून राबराब राबून मी येणार त्यानंतर मलाच ओरडणार की एवढा उशीर कसा होतो ? अजून चहा बाकी आहे आमचा. आधी चहा टाक आणि मग स्वयंपाक ला लाग. रितेश त्याच्या फोन मध्ये डोकं घालून बसणार. तरी चालवून घेत होते मी.
रिया च्या वेळेस दिवस गेले तेव्हा 9 व्या महिन्यापर्यंत काम केलं मी कारण नंतर तिच्या सोबत वेळ घालवता यावा. या दिवसामध्ये ही घर कामात कोणी मदत केली नाही. कोणाला मदत मागितली तर ठरलेलं उत्तर असायचं,' तू पहिली नाहीस जी आई होणार आहेस. '
रिया झाल्यावर सुद्धा तिच परीस्थितीती. रात्रीची रडायची रिया तर रितेश बाहेर जाऊन झोपायचा. मी रात्री जागून सुद्धा सकाळी लवकर उठून सर्वांच्या हातात चहा - नाश्ता द्यावा ही अपेक्षा. कामाला बाई लावायची नाही, रियाला कोणी सांभाळणार नाही. तिला सांभाळून घरकाम करायचं, ऑफिस चं काम घरून करायचं. मी माणूस आहे हेच सर्वजण विसरले. रितेश च्या घराचे हप्ते भराचे म्हणून मी नोकरी सोडू शकत नाही. सासूबाई ना सुन म्हणजे पायपुसणं वाटते. आपण काही करायला गेलो की ' म्हणून कमी शिकलेली बघ असं सांगत होते.' हे वाक्य हमखास बोलणारच.
रियाचा सर्व खर्च मीच करायचा. रितेश कडे बघत ती म्हणाली," तू स्वतः आठवून सांग रियाच्या जन्मापासून आता पर्यंत काय खर्च केलास तू ? डायपर घेतलेस ? मेडिसिन ? डॉक्टर ? कपडे ? नक्की काय केलास सांग ?
आता सर्वांच्या अपेक्षाचं ओझं वाहता वाहता मी खूप थकले. या पुढे असंच सूरु राहणार मग मीच संपून जाईन. आणि मला माझ्या रिया साठी जगायचं आहे. मी जिवंत असताना तिच्याकडे कोणी बघत नाही. मी मेल्यावर तिचे किती हाल होतील. आणि या सर्वांचं सर्व मलाच करायचं असेल तर का मी यांच्यासोबत राहू ?
मी अजून जास्त काही नाही करू शकत. त्यापेक्षा मला सरळ घटस्फोट द्या. आणि कमी शिकलेली सुन करून आणा. सर्व सुखी. मी त्या दिवशी घर सोडून गेले ते माहेरी नाही गेले.माहेरी माझ्यामुळे कशाला कोणाला त्रास? आधीच एक छोटा फ्लॅट पाहून ठेवला होता. माझ्यासाठी आणि रिया साठी पुरे आहे. त्यासाठी छोटंसं लोन मी काढलं. आता मी माझ्या घराचे हप्ते भरेन. रियाला सांभाळायला एक बाई ठेवली आहे. तिचं थोडं जेवण बनवते. मला घरून नीट काम पण करता येत. डोक्याला कोणाचं टेन्शन नाही. आणि आता परत मला या नरकात यायचं नाही.
हल्ली लोक मुलींना नावं ठेवतात. लग्न म्हणजे बाजार केला आहे वगैरे. पण खरं सांगू माझा अनुभव मला सांगतो. खरंच आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्या किंवा कमी शिकेल्या मुलाशी लग्न करू नये. पुरुषी अहंकार सारखा दुखावत राहतो त्यांचा आणि त्यामुळे त्रास होतो. सर्वच केस मध्ये असेल असा नाही पण जास्त केस मध्ये हाच अनुभव आहे. "
प्रांजल सासरच्या सर्व लोकांसमोर हात जोडते आणि म्हणते, " खरंच नाही अपेक्षा पूर्ण करू शकत मी तुमच्या. त्यामुळे लवकरात लवकर मला यातून मुक्त करा. "
प्रांजलचं बोलणं ऐकून मध्यस्ती रितेश आणि त्यांच्या घरच्याकडे पाहून विचारतात, " जे प्रांजलच्या बाबतीत केलं ते जान्हवीच्या बाबतीत घडलं असत तर ? "
मध्यस्तीचा प्रश्न ऐकून सर्वांच्या माना खाली गेल्या.
मध्यस्ती, " प्रांजल च्या म्हणण्याप्रमाणे तिला घटस्फोट लवकर द्या. कारण खरंच सर्वांच्या सर्व अपेक्षा पूर्ण कोणालाच करता येत नाहीत. "
मध्यस्तीचा प्रश्न ऐकून सर्वांच्या माना खाली गेल्या.
मध्यस्ती, " प्रांजल च्या म्हणण्याप्रमाणे तिला घटस्फोट लवकर द्या. कारण खरंच सर्वांच्या सर्व अपेक्षा पूर्ण कोणालाच करता येत नाहीत. "
प्रांजल पुढे निर्धाराने बोलते, " जर घटस्फोट द्यायला त्रास दिलात तर घटस्फोट मी देणार नाहीच, नांदायला सुद्धा येणार नाही आणि पहिलं लग्न झालेलं आहे आणि घटस्फोट सुद्धा झाला नाही म्हणून रितेशला दुसरं लग्न सुद्धा करू देणार नाही. आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. कोर्टात वेळेवर हजर रहा नाही तर पुढे जे होईल त्यासाठी तयार रहा." असा इशारा देत प्रांजल आपल्या वडिलांना घेऊन निघून गेली.
रितेश आणि त्याच्या घरचे सुन्न होऊन बसले. कारण आता रितेश् वर कर्जाचा डोंगर होता. पगार तोकडा. बहीणच आधी लग्न मोडलेलं, त्यात भावाचं लग्न मोडलं म्हणजे लग्न ठरणं अजून मुश्किल. आणि घरकाम करून पिट्ट्या पडणार तो वेगळा. रितेशला पुन्हा एवढा पगार घेणारी बायको मिळणं देखील कठीणच.
प्रांजलने अपेक्षाच डोई जड झालेलं ओझं दूर भिरकावलं आणि तणाव मुक्त जीवन जगायला सिद्ध झाली.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा