स्पर्धा - जलद कथा मालिका
शीर्षक - आपलं झालं थोडं अन् व्याह्यानी धाडलं घोडं भाग 1
तेजस्विनी - नोकरी वरून यायला घरी निघाली. त्यात रिक्षाचा संप. बसला खूपच गर्दी उभी राहिली. नंतर स्टॉप वरून चालत कशी बशी घरी आली.
पाणी प्यायला घेतलं आता खूर्चीत बसून पित असताना घड्याळाकडे लक्ष गेले. पोळ्याच्या मावशी आज येणार नाही आठवले.
इतक्यात पाणी आले.पाणी आठ दिवसांनी येणार म्हणजे भरपूर प्रमाणात भरावं लागतं आणि हंडा, कळशी घासून भरायला तयार झाली.
इतक्यात नवरा राम आला. फारच भूक लागली म्हणाला
तेजस्विनीला पाणी भरायला रामने मदत केली आणि लवकर पिठलं कर म्हणाला.
पाणी पुर्ण भरून झाले
तेजस्विनीने कणिक मळून घ्यायला सुरूवात केली. राम कपडे बदलून आला.
इतक्यात क्रिकेट क्लास वरून खेळून भुकेला झालेला उत्कर्ष आला.. आई भूक लागली पटकन दे म्हणाला.
तेजस्विनी - आधी स्वच्छ हात,पाय, धुवून घे.कपडे बदल तोपर्यंत करते आहे.
तेजस्विनीने सूसकारा सोडत पिठलं केले. कणिक मळून ठेवलेली होती पोळ्या करायला घेतल्यावर उत्कर्ष आला. त्याला एक मिनिट दम नव्हता
उत्कर्ष -आई मला पिठलं नको मला नाही आवडत मला पोळ्या कुस्करून गुळ लावून काला दे
तेजस्विनी -अरे हो....जरा श्वास घे. पाणी पी. बैस... देतेच.
उत्कर्ष - लवकर दे... देना..
तेजस्विनीने गरम गरम पोळी चटका बसत असताना बारीक कुस्करून गुळ चिरून काला केला. उत्कर्ष नी लगेच ताट तिच्या हातून घेतले.
राम -अगं झाले आहे का पिठले.
तेजस्विनी - आहो चालू आहे. मी काय मशिन आहे का? मीपण दमून भागून आलें मी पण माणूस आहे.
शालिनी - ( तेजस्विनीच्या सासूबाई ) झाली लगेच भणभण सुरू .... करायला लागले की.एकदिवस बाई नाही तर.....केल तर काय झाले.तू स्त्री आहे.... तूझे कर्तव्यच आहे .. तूझे कामच आहे .... इन्शुलिन घ्यायची वेळ झाली माझी..
तेजस्विनी - हो..
श्रीकृष्ण- (तेजस्विनीचे सासरे) - ती सून कधी वेळ पाळते आपल्या इन्शुलिन घ्यायची. काय खरं आहे तिचं.. थंडी आहे.ढिल्ली आहे नुसती.... ठिगळी आहे.
सासूबाई - कुत्सितपणे हसल्या आणि नेहमीचीच म्हण म्हणाल्या. देखणा दिवा अन् भिंतीला ठेवा....
तेजस्विनीने ऐकून न ऐकल्या सारखे केले. तेजस्विनीने पिठलं कढई बाहेर डायनिंग टेबलवर आणली. झाल्या तितक्या पोळ्या आणल्या.ताट, पाणी घेतलं सगळ्यांना पानं घेतलें हांका मारल्या काही पोळ्या करायला आत गेली.
इतक्यात कराटेच्या क्लास वरून तेजस्विनीची मुलगी सुकन्या आली. तिला येऊन बिलगली आई ....
तेजस्विनीला पुर्ण जगात प्रेम मिळत असेल तर ते या परी कडून आणि परीला प्रेम आई कडून दोघी एकमेकींच्या काळजी घ्यायलाच.दोघीच विश्व छान होतं
तेजस्विनीचे सासरे ,सासूबाई , नवरा राम जेवायला बसले. तेजस्विनी गरम गरम पोळ्या करून आणत होती.. तेजस्विनीने सुकन्याला जेवायला बस्स. आग्रह केला. ती आई सोबत बसते म्हणून थांबली.
इतक्यात तेजस्विनीचा लहान दिर आला.
सासूबाई - बाई माझा निलू दमून भागून आला. त्याला ताट, पाणी आण ग तेजा..निलू हात,पाय धुवून घे चल गरम गरम जेवायला.
निलू - काय आहे आज वहिनी स्पेशल मेन्यू?
सासूबाई - हा .....नुसतेच पिठलं अन् पोळी ....
निलू - हात , पाय धुवून कपडे बदलून आला जेवायला बसला.
सगळ्याची. जेवण होतं आली. तेजस्विनीच्या पोळ्या होत आल्या.
आता जेवायला बसणार.सगळे घेऊन आली सुकन्या, तेजस्विनी, लहान दिर बसले.
तेजस्विनी एक घास तोंडात घेतला आणि फोन वाजला उत्कर्ष नी फोन आणून दिला
तिकडून रिपोर्टिंग हेड म्हणाले उद्या मिटींगसाठी पहाटे हेड ऑफिसला जावे लागणार आहे.
ऑफिस मधून गाडी आणि ड्रायव्हर पहाटे चारला घरी येतील प्रवास लांबचा प्रवास आहे. दोन -तीन दिवस लागतात ते घरी कल्पना देऊन ठेवा.
मागची आवरा-सावरी रात्री करून तेजस्विनी झोपायला गेली . तर दोन्ही पोरं झोपली रामला उद्या मिटींंग पहाटे निघावे लागणार सांगत असतांनाच राम हो हो करता करता झोपला
तेजस्विनीने बॅग भरली
क्रमशः
सौ.भाग्यश्री चाटी सांबरे
१८.१.२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा