Login

आपल झालं थोड भाग २ अंतिम

Apl Zal Thod
स्पर्धा - जलद कथा मालिका

शीर्षक - आपल झाल थोड .. व्याह्यानी धाडलं घोडं ....
भाग २ अंतिम


तेजस्विनी - पहाटे उठून आवरून ऑफिस कार मधून निघाली.

राम -अच्छा. बाय..


तेजस्विनी - ,माहेर नसल्याने ती अशी कुठेही जातं नव्हती. आई आणि बाबा तिच्या लग्नानंतर देवाघरी गेले.भाऊ नाही.माहेर नाही. आता तिसऱ्यांदा चुकून प्रेग्नंट राहिली होती पण पाडले तिसरे नकोच म्हणून तोही अशक्तपणा काही भरून आला नाही असे तिला जाणवत होते.तिचे मायेनं करणार कोण?

. तेजस्विनी --मिटींग साठी लागणाऱ्या गोष्टीच डोक्यात आठवतं होती. इतक्यात फोन वाजला.

तेजस्विनी - हॅलो सर गुड मॉर्निंग..

सर - व्हेरी गूड मॉर्निंग .... झाली का तयारी तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावे लागणार आहे.

तेजस्विनी -मनातल्या मनात ऐनवेळेस सांगत आहेत.
मग गाडीतच सुरू झाले पॉइंट काढणे प्रेझेंटेशन .. प्रवास लांबचा होता. सगळे तयार केले.जरा निवांत बसत नाही. इतक्यात रामचा फोन


राम - कुठपर्यंत पोहचली आहे . कधी येणार परत काही काळजी, चिंता आहे का तुला ? चोरांची परीक्षा युनिट टेस्ट चार दिवसांवर आली. काय करून यायचे . कशाला गेली टूर वर नाही म्हणायचे.

तेजस्विनी - नोकरी करायची आहे. तुमच्यासाठी मी कर्ज काढले त्याचे हफ्ते कसे फेडणार?

राम - झालं बोलून दाखवते. तू फोन ठेव काही कामाची नाही तू....


तेजस्विनीने फोन ठेवला. काय करावे, काय बोलावं कळेना.. तेजस्विनीच्या मनात विचार आला. कोणासाठी कितीही, काहीही करा. कुणाला काही नसतं. वाळूत मुतल फेस ना पाणी .... सासरच्यांना कौतुक तर नसतेच. कुणी करतंय पाय खाली ओढायचे ... जरा. कारची काच खाली करून बाहेर बघत होती. तिने तोंडावर गार वारे घेत आपल्या मनात खंबीरपणा आणून प्रेझेंटेशन चांगले करायचे ठरवले आणि रामच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.

सासूबाईच्या फोन वर फोन केला. उत्कर्ष कडे द्या म्हणाली. उत्कर्षला समजावण्याचा प्रयत्न केला परीक्षा युनिट टेस्ट जवळ आली. चांगले समजावून घे. ट्युशन सरांना विचार. आय एम. पी .. प्रश्न पक्के कर सायन्स आणि मॅथ आणि इंग्रजी घे ट्युशन सरांना सांग. फोन ठेवला.

शाळेच्या गॄपवर आलेला टाईम टेबल ट्युशन सरांना व्हॉट्स अप केला. उत्कर्ष कडून करून घ्या तेजस्विनीने विनवणी केली.


ऑफिस मधले राजकारण त्याचा भाग टूर तिच्या वर , मुद्दामच ऐनवेळी प्रेझेंटेशन देणं. मुद्दामच लांबचा टूर ऐनवेळी सांगणे. हे तिला कळतं होते. प्रेझेंटेशन चांगले करून याचेच सोने करायचेच तिने ठरवले. परिस्थिती आपल्याला पक्के बनवते. हेच समजून घेणे तिनं मनात ठरवले.

एकाचवेळी एवढया गोष्टी हॅंडल करत आयुष्य जगणारी तेजस्विनी मनातल्या मनात प्रेझेंटेशन चांगले करूच.... करायचे....विचार करून जरा डोळे बंद करून कार मध्ये जरा पडावं म्हणून पडली गाडीतच बसून

मिटिंग ठिकाणी पोहचली तेजस्वीनीने तयार केले तसे प्रेझेंटेशन चांगले झाले. गाडीत बसून प्रवासात काढलेले मुद्दे प्रभावीपणे तेजस्वनीने आत्मविश्वासाने मांडल.. प्रेझेंटेशन छान जमले होते. . मिटिंग पार पडली आणि जेवण झाली . मोठ्या सरांनी तोंडभरून कौतुक केले .

इतक्यात रामचा फोन वाजला. तेजस्वीनीने आनंदाने सांगायला लागली. सगळे .. रामचा मुड वेगळाच वाटला. तू घरी ये मग बोलू म्हणाला फोन ठेवला.


चार दिवसापासूनचा टूर चांगला झाला . आता घरी जाण्याची वेळ आली ' कार मध्ये तेजस्वीनीच्या मनातल्या विचारांची आणि गाडीची चक्रे फिरू लागली . चार दिवस आराम मिळाला घरच्या कामातून जणू काही माहेरपण मिळाले. बाहेरच्या कामात आनंद घेऊम कष्ट केले तरी न दमणारी वाटली. करीअर करायचे . आपले अस्तित्व सिद्ध - करून दाखवायचे. आपल्या आई वडिलांना जिथे कुठे आहे तिथे अभिमान वाटला पाहिजे. असा निश्चय केला.


घरी यायला उशीर झाला रात्र झाली. आठ वाजले सगळे जेवण करून हॉल मध्ये बसले होते. सगळे गप्पा मारत बसले होते. तेजस्वीनी आली.

राम - तेजस्वीनीला आल्या आल्या त्यांनी सांगितले की उत्कर्षची आता दहावी जवळ आली. आता तू नोकरी सोडून दे पूर्ण वेळ मुलांचे शिक्षण आणि गृहिणी म्हणून काम करत जा.


तेजस्विनी - कर्ज कसे फेडायचे? पुढे खर्च वाढणार कसे करायचे? माझे करिअर? मी पायांवर उभी आहे हा माझा महत्वाचा मुद्दा,...


राम - मुलांचे शिक्षण, घरची कामे?

तेजस्विनी - सगळे त्याग स्त्रीनेच का करायचे? बायको ला गॄहित धरलं जातं.


तेजस्विनीचा फोन वाजला - हॅलो. तिकडून कळाले प्रेझेंटेशन चांगले झाले. त्यामुळे प्रमोशन मिळाले आहे.अभिनंदन....


तेजस्विनी - धन्यवाद फोन आवरता घेत ठेवला.काय बोलावे तिला कळतं नव्हते पण रामला तिने फोन वर सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या

आणि तेजस्विनीची अवस्था झाली आपले झालं थोडं अन् व्याह्यानी धाडलं घोडं अशी झाली..


समाप्त

- सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
C.R 31. 1. 2024

वाचकांना विनंती आपला अभिप्राय अवश्य द्या


🎭 Series Post

View all