रुसलेल्या बहिणीसाठी भावाचा माफीनामा!
दि. २१ डिसेंबर २०२३
प्रिय बारके,
सस्नेह नमस्कार,
सस्नेह नमस्कार,
कशी आहेस गं? आता लगेच पुन्हा रागवू नकोस. तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी तू बारकीच(लहान) राहणार आहेस. मला माहीत आहे की, खूप दिवस झाले तुझ्याशी बोलणे झालेले नाही. त्यादिवशी तू घरी आलेलीस तेव्हा मी कामाच्या तणावात असल्याने तुझ्यावर रागावलो.
मला तेव्हा खरचं तुझ्यावर चिडायचे नव्हते गं, पण चुकून झाले. त्यानंतर तू तुझ्या सासरी लगेच निघून गेलीस. तू खूप दुखावली असशील ना कारण मी असा चिडून बोलेल असे तुला अपेक्षित नव्हते.
तुझा राग योग्य आहे पण काय आहे ना तुझ्या ह्या वेड्या भावाला एकच बहीण आहे आणि त्यात तू आधी पासूनच हुशार आहेस. मला समजून घे. तू बोलत नाहीस. मेसेज करावा तर मला ब्लॉक केलेस. फोन केला तर आईला सांगितले की तुला त्रास नको द्यायला असे बोलतेस.
मी चुकलो आणि ह्यासाठीच मी पत्र लिहीत आहे. बघ हे पत्र त्या मेसेज सारखे डिलीट पण होणार नाही.
मी तुला लवकरच घ्यायला येणार आहे. तुझ्याशिवाय मला कोणी समजून घेत नाही. बाबा पण आता त्यादिवसांपासून माझ्याशी बोलत नाहीत.
तू मला माफ करशील आणि पुन्हा माहेरी थोडे दिवस राहायला येशील अशी मी अपेक्षा करतो.
कळावे लोभ असावा ही विनंती.
तुझाच दादा,
येडोबा राव
येडोबा राव
© विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा