मागील भागात आपण पाहिले की अर्चना आणि संजना दोघींचाही मेघनाच्या मृत्युमुळे फायदा होणार असतो. आता बघू पुढे काय होते ते.
" त्या माणसाने तुम्हाला चुकीचे सांगितले होते.. मेघनाने पार्थचे पुस्तक त्याचे नाव खोडून यासाठी दिले होते कारण तिला त्या पुस्तकाचे योग्य मूल्यमापन करून घ्यायचे होते. तिच्या नावावर ती कथा कशीही चालली असती. आणि पार्थचे नाव टाकले असते तर चान्सेस होते की नवोदित म्हणून त्याची कथा बघितली सुद्धा गेली नसती. पण पार्थची तिच्यावरची भक्ती, श्रद्धा बघून तिला भावनिक आधार मिळायचा. म्हणून तिच्यापरीने त्याच्यासाठी जे जे करता येईल ते करायचा ती प्रयत्न करत होती. त्याला लेखक म्हणून स्वतःची ओळख मिळावी म्हणून ती प्रयत्न करत होती." हे ऐकून संजनाची मान खाली गेली. पार्थच्या चेहर्यावरचा रंग उडाला.
" म्हणजे मॅडम खरंच?"
" हो.. खरेतर इतरवेळेस दाखवताना तुझी भक्ती अबाधित होती. पण जेव्हा तुझी कादंबरी प्रकाशकाकडे गेली आहे असे ऐकलेस तेव्हा मात्र तुझा धीर सुटला. त्या आपल्याला फसवत आहेत हा विचार तुझ्या मनात एवढा रूजला की काय खरे काय खोटे याचा विचारही तुला करावासा वाटला नाही.. मग मेघनामॅडमच्याच एका कथेत त्यांनी पुस्तकातून केलेल्या खुनाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. परिणामतः घरात आजीसाठी आणलेल्या झोपेच्या गोळ्यांची पावडर करून ती पुस्तकांच्या पानावर चोपडायचे.. मग झाले काम. पार्थने दिलेले पुस्तक मेघनामॅडम वाचणार नाही. ही तर अशक्यप्राय गोष्ट. हो ना पार्थ?" प्रशांतचे हे शब्द पार्थच्या जिव्हारी लागले. आपण काय केले आहे याची जाणीव होऊन तो रडायला लागला.
" मी असे नव्हते करायला हवे होते.." पार्थ एकच वाक्य परत परत बोलत होता.
" इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्ही म्हणालात की पार्थने पुस्तकावर गोळ्यांची पावडर लावली, मगाशी म्हणालात की अर्चनाने पुस्तकांचे कुरिअर पाठवले. इव्हन या संजनाने सुद्धा. मग खुनी आहे तरी कोण?" अनमोलने विचारले.
" या सगळ्यात तुम्ही स्वतःला आणि अश्विनी मॅडमना कसे बाजूला ठेवू शकता? सगळ्यात जास्त संधी तर तुम्हाला होती. आवराआवर करताना एखादे पुस्तक बाहेर आणायचे आणि त्याला विष लावून परत आत ठेवायचे. कितीसा वेळ लागतो? बरोबर ना? खरेतर आज इथे जेवढेजण उपस्थित आहेत. ते सगळेच्या सगळे खुनी आहेत." प्रशांत पुढे बोलणार तोच बाहेरून राघव एकाला पकडून आत घेऊन आला.
" सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बंगल्याच्या बाहेर लक्ष ठेवून होतो. हा दोनदा तीनदा जाताना दिसला. मी बोलायला गेलो तर पळून जाऊ लागला. आम्ही लगेच पकडलं याला."
" सोडा मला.. एका सभ्य नागरिकाला पकडणे तुम्हाला शोभत नाही." तो चिडून बोलला.
" हे आमचे नवीन शेजारी आहेत.. विक्रम. यांना का पकडले आहे?" अनमोलने आश्चर्याने विचारले.
" हे तुमचे शेजारीच मेघनाचे शारिरीक खुनी आहेत." प्रशांत शांतपणे बोलला.
" क्काय???" जमलेल्या सगळ्यांच्या तोंडून एकाचवेळेस शब्द बाहेर पडला.
" काय पुरावा आहे माझ्या विरूद्ध?" विक्रमने गुर्मीत विचारले.
" पुरावा? राघव आधी याला बांधून ठेव. हवे तेवढे पुरावे दाखवतो याला. तर मिस्टर विक्रम कसे असते, गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही एकतरी चूक करतोच. तीच चूक तू ही इथे केलीस." विक्रम रागाने प्रशांतकडे बघू लागला. आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला.
" नुकताच इथे रहायला आलास ना? तुला मेघनाच्या सगळ्याच गोष्टी कशा माहित असणार? तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट.. मेघनाच्या घरात सगळीकडेच सीसी टिव्ही कॅमेरे लावले आहेत. आणि स्टडी रूममध्ये तर दोन आहेत. चुकीने किंवा अपघाताने एक बंद झाला तरी दुसरीकडे चित्रिकरण व्यवस्थित चालू रहावे म्हणून कदाचित." प्रशांतने अनमोलकडे बघितले.
त्याने मान हलवली.
त्याने मान हलवली.
" मध्यंतरी मेघनाच्या काही कथा चोरीला गेल्या होत्या. तेव्हाच तिने दोन कॅमेरे लावून घेतले. ज्यामुळे तिच्या कथांची चोरी पुन्हा होऊ नये."
" तर विक्रम, तुला फक्त एक कॅमेरा दिसला. जो तू चलाखीने बंद केलास. पण दुसरा छुपा कॅमेरा तुला माहितीच नव्हता. ज्याने तुझे चित्रिकरण बरोबर केले आहे. अजून एक तुला माहित नसलेली गोष्ट. मेघना डायरी लिहायची. तिला तुझा सहवास अजिबात आवडत नव्हता. तू जवळ जरी आलास तरी तिला मृत्युगंध जाणवायचा. त्यामुळे ती तुझ्यापासून दूर रहायला बघायची." प्रशांत बोलत होता.
" यातून मी खून केला आहे, हे सिद्ध होते?" विक्रमने कुत्सित हसत विचारले. "कोर्टात दोन मिनिटात केस बंद होऊन जाईल." तो पुढे बोलला.
" हो ना.. बरोबर आहे तुझे.. ही अशी केस कोर्टात उभी राहिली तर दोन मिनिटात बंद होईल. पण जेव्हा तू आणलेले आर्सेनिक हातमोजे घालून त्या पुस्तकाला लावल्याचा व्हिडिओ समोर येईल, तेव्हा तुला फाशी नक्कीच होऊ शकते नाही का?"
कोण आहे हा विक्रम? आणि का मारले असावे मेघनाला वाचायला विसरू नका पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा