" देवा अजून किती परीक्षा बघणार आहेस,माझा मुलगा जो एक वर्ष झाल काहीच बोलत नाही आता तू माझ्या मुलीलाही या अवस्थेत आणून टाकलस.मी काय करू माझी दोन्ही मुलं ज्या अवस्थेत आहेत त्यांना मी अस नाही पाहू शकत ,तुला माझं जे करायचं आहे ते कर पण माझ्या दोन्ही मुलांना बर कर !" शालिनी वरती बघून देवाला प्रार्थना करत रडत होती.आणि अनिश ची आठवण आली तशी ती कावरी बावरी होऊन त्याला शोधू लागली.
तिला अस कुणाला तरी शोधताना ती व्यक्ती जी अनिश आणि आशू सोबत आली होती.ती अजून हि तिथेच होती.ती व्यक्ती शालिनीला विचारली.की,तुम्ही कोणाला शोधत आहात.तर तिने माझा मुलगा होता,तिथे आहे ती माझी मुलगी आहे म्हणून सांगितल्यावर त्या व्यक्तीने तिला बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेला जिथे अनिश होता.
तो ही आता स्टेबल झाला होता.दीदीच्या काळजीने तो उठून जाताच होता.तेवढ्यात शालिनी तिथे आली.आपल्या आईला बघून तो " मम्मी दीदी कशी आहे." अनिश विचारत होता.
त्याचा इतक्या दिवसातून आवाज ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रु आलेले होते.शालिनी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होत्या.आपल्या मुलाच्या तोंडून इतक्या दिवसांनी आवाज ऐकून त्यांना खूप आनंद झाला होता.त्यांनी देवाचे आभार मानले.
" तू आराम कर ती बरी आहे." शालिनी त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या.
" नाही तू चल आपण दीदी कडे जाऊ मला बघायचं आहे तिला चल तू ?" अस म्हणून तो शालिनीला घेऊन आशू होती तिथे गेला.
तिला बेशुद्ध होऊन खूप वेळ झाला होता.तरीही ती अजून शुद्धीत आली नव्हती.
अनिश तिच्या जवळ जाऊन बसला तिला अस निपचित पडलेलं बघून त्याला खूप वाईट वाटल.
" दीदी आता तू पण माझ्यावर रागवलीस का? तनु पण माझ्यावर रागवून मला एकट्याला सोडून निघून गेली.तू ही जाणार का मला तुझी खुप गरज आहे,प्लीज माझ्यासाठी डोळे उघड प्लीज दीदी !" अस म्हणून तो तिचा हात धरुन रडू लागला.त्याच्या आवाजाने आशुला जाग आली,तिने हळूच आपले डोळे उघडले,तसे हे दोघेही खूप खुश झाले.
एक वर्षाच्या आगोदर अनिश आणि तनु एकमेकांवर खूप प्रेम करत होते.दोघे लग्न ही करणार होते.पण नियतीच्या मनात काही तरी वेगळच होत.एक दिवशी दोघेही सोबत बाहेर फिरायला गेल्यावर तिचा खूप मोठा अपघात झाला,जात ती गेली.तो अपघात अनिशच्या समोर घडल्याने त्याचा खूप मोठा धक्का त्याला बसला होतं ज्यात त्याची वाचा गेली होती.
आज आशू सोबत ही तेच झालं म्हणून त्याच्यामुळे त्याची वाच्या परत आली.पण तो तनुला वाचवू शकला नाही याच गिल्ट त्याच्या मनात होत,पण आज त्याने आपल्या बहिणीला वाचवलेल समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
भलेही आज तनु त्याच्या सोबत नाही पण त्याच्या आठवणींत,त्याच्या सहवासात ती आजही जिवंत आहे,त्याच प्रेम अमर आहे,एक अशी प्रेम कहाणी जी अपूर्ण असूनही पूर्ण आहे,सदैव ते दोघेही एकमेकांच्या आठवणीत जिवंत आहेत.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा