अपशगुनी....
नुकतेच लग्न होऊन पुनम सासरी आली,,नवीन नवलाई सगळं काही स्वप्नाच्या पलिकडले होते,जे हवे ते अगदी सहज तिला मिळत होते...आणि सहा महिन्यातच आनंदाची बातमी आली,आता पुनम ला दिवस गेले होते...सगळं वातावरण आनंदी आनंदगडे झाले होते,,सासूबाई देखील जाम खुश झाल्या होत्या,...
नऊ महिने कधी संपले कळले देखील नाही आणि घरात एका चिमुकल्या बाळाचे आगमन झाले होते,बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं बाळाला... बाळ एका वर्षाचा पूर्ण झाला ...थाटामाटात पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला...सगळे कसे आनंदमय होते....आणि एके दिवशी पूनम च्या नवऱ्या ची तब्येत अचानक बिघडली..त्याला लगबगीने इस्पितळात नेण्यात आले...
परंतु नेल्या नेल्या च त्याचा मृत्यू झाला होता,..घरच्यांची रडारड सुरू होती,पुनम मात्र एका कोपऱ्यात उभी राहून पतिकडे एकटक पाहत होती,तिला भयंकर दुःख झाले होते...आणि तिचा बांध फुटला व ती रडत होती...रडता रडता पतीच्या जवळ गेली तोच सासूबाई ने तिचा हात लगेच बाजूला करत म्हणाली..तू हात लावायचा नाहीस माझ्या मुलाला ,फक्त तुझ्यामुळे तो गेलाय...माझ्या मुलाकडे लक्ष द्यायला तुला वेळ तरी कुठे होता?तू पक्की पांढऱ्या पायाची आहे..अपशागुनी कुठली ..असे म्हणून सासूबाई ने तिला तिच्या नवऱ्याच्या प्रेताला हात ही लावू दिला नाही...
यात पुनम ची काहीच चूक नसून तिला अपशागुणी चा शिक्कामोर्तब मिळाला होता,,ही भली मोठी शोकांतिका उदरात घेऊन ती डोंगरा येवढे दुःख मनात साठून आपल्या बाळाला घेऊन माहेरी आली...
.................................................................
माहेरी आई भाऊ आणि भावजय होते,,आई खूपच मायाळू.. मुलीचं दुःख तिला समजत होते,,आईची माया ही निराळीच आपल्या पोरी च्या नशिबी असे का घडले असावे आणि आता भविष्यात तिचे व तिच्या बाळाचे काय होईल??याची सारखी चिंता आईला वाटत होती...
आईने मुली ची कळ घेतली की तिकडे सुनेला जाम राग यायचा...असेच दिवस चालले होते,आणि एके दिवशी आईने जगाचा निरोप घेतला आणि पुन्हा पुनम च्या वाटेला दुःख आले....भावाने तर हद्द पार केली आणि पुनम ला म्हटले ,. आधी नवऱ्या ला खाल्ल आणि आता आईला,खरंच तुझी सासू म्हणते ते खरंच आहे...तू आहेस च अपशागूनी...हे ऐकताच पूनामच्या पाया खालची जमीन सरकली,व ती तिथून निघाली.....
आपल्या बाळाला घेऊन ती निघाली तिला काहीच माहीत नव्हते कुठे जायचे?काय करावे?पण बाळाचा विचार करत ती फक्त चालत होती,शेवटी नशिबावर तिने सोडून दिले होते,कदाचित तिला इतर लोक जे अपक्षगुनी म्हणतात त्यावर तिचा विश्वास बसत चालला होता...
वाटेतच तिची बाल मैत्रीण विभा भेटली तिने सर्व हकीकत विभाला सांगितली,विभा मनमिळाऊ स्वभावाची असल्यामुळे तिने लगेच पूनमला तिच्या घरी आणले,पुनम कडे देखील दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे ती आली...
.................................................................
विभाकडे ती अन् तिचा पती दोघेच होते,लग्न होऊन बरीच वर्षे पूर्ण झाली होती परंतु अजून विभा ला काही मुलबाळ नव्हते,..आता मात्र पुनम अन् पुनम चा मुलगा दोघेही विभाकडेच राहत होते,पूनमला तसे च राहणे योग्य वाटत नव्हते म्हणून तिने काहीतरी काम करावे असे ठरविले,,तर ती विभाच्या घरातील सर्व कामे करीत असे,अगदी वीभाच्या पतीचे देखील,,..
पुनम दिसायला छान, कमी वयातच दुःख तिच्या नशिबी आले होते,,पण आता थोडेफार दिवस बरे चालले होते,तरीदेखील ती समाधानी नव्हती,..तिने पूर्णतः स्वतःला कामा व मुलामध्ये व्यस्त केले होते,..पण कसलीतरी भीती तिच्या मनात सारखं घर करत होती....
विभाचा नवरा पुनम ला सारखं निहाळत होता,सारखे तिच्या बघण हे काही पूनमला पटत नव्हते..तिला वाटले विभाकडे विषय काढावा,पण मग ती ही आपल्याला च दोष देईल,या विचाराने तिने स्वतःची समस्या विभाकडे मांडली नाही...बघता बघता एक दिवस चक्क वीभाचा नवरा पुनम च्या रूम मध्ये आला अन् तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता...कसेबसे तिने स्वतःला सावरले अन् लगेच वीभाला सर्व हकीकत सांगितली...
परंतु विभाचे उत्तर ऐकल्या नंतर तिला विश्वास बसला नाही की ....तिला स्वताच्या घरात राहू देण्या साठी त्यांचा खूप मोठा स्वार्थ होता...आणि स्वार्थ असा की,विभा मध्ये आई होण्याची पात्रता नव्हती..तरी देखील त्यांना स्वतःचे मुलं हवे होते,आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून पुनम ला स्वताच्या घरी राहू दिले जेणेकरून पुनम अन् विभाच्यां नवऱ्या कडून त्यांना स्वतःचे मूल मिळेल...परंतु हे ऐकल्यानंतर पुनम ला विभा चा भयंकर राग येतो व तात्काळ ती अन् तिचा मुलगा तिथून निघून जातात....
आता मात्र तिला कोणवरच विश्वास राहिला नव्हता,अन् आता जे ही करायचे ते फक्त आणि फक्त स्वतःला च करावे लागेल...इतरांची मदत घेणे म्हणजेच स्वतःला आगीत ढकलणे होय...हे सर्व तिच्या लक्षात आले होते
.................................................................
मुलाला घेऊन ती वणवण भटकत होती,मिळेल ते काम करत मुलाचा सांभाळ करत होती,,..सर्व दुःख सहन करतांना तिला असे वाटत पण होते की खरोखर च आपण अपक्षगुणी आहोत...लोक म्हणतात तेच खरं...असे विचार सारखे तिच्या डोक्यात घर करत होते...केव्हा केव्हा तिला हे जग सोडून द्यावे असे देखील वाटायचे पण मग मुलाचा चेहरा दिसायचा अन् आपण मेल्यानंतर याचे काय होईल या विचाराने ती खूप व्याकुळ व्हायची...
प्रत्येक दुःख ला सावरत ती जीवन जगत होती,तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे असे मनोमन ठरवत होती,...जेमतेम शिकलेली पुनम नशिबाला झुंज देत दिवस काढत होती,..त्यात मुलाची गैरसोय पण काय करणार परिस्तिथी तशी होती...आता तिने ठाम निर्णय घेतला होता की काहीही करून मुलाचे भवितव्य सुधारावे,,..मनात जिद्द व चिकाटी होतीच सकारात्मक विचार ठेऊन ती प्रयत्न करत होती...
कितीही कठीण दिवस आले तरी हार म्हणायची नाही असे तिने ठरविले होते,,कसेतरी दिवस काढणारी पुनम एक दिवस शेतातील काम करीत असताना तिथे तिच्या सोबतीला असलेल्या बायांच्या मदतीने ,एका मोठ्या घरी स्वयंपाकाचे काम मिळविते,..पुनम च्या हाताला फारच चव म्हणून त्या घरचे सर्व तिच्यावर खूप खुश होतात,पण तिने स्वतःच्या मनात अपशगुणी
असल्याचे चित्र निर्माण केले होते त्यामुळे हे देखील काम काही ना काही कारणामुळे सुटेल की काय,असा प्रश्न सारखा तिला पडायचा....
पण ती जिथे स्वयंपाक करत होती तिथले लोक फारच चांगले होते,त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले व आणखी ओळखीच्या घरी काम दिले,,पुन्हा ज्या नवीन ठिकाणी तिला काम मिळाले होते तिथले मालक एका मोठ्या हॉटेल चे मालिक होते,,त्यांनी थेट तिला हॉटेल मध्ये वेगवेगळ्या डिशेस बनविण्यासाठी ठेवले,अन् बघता बघता सर्वांनी तिच्या डिशेस मध्ये आवड देखील दाखविली,,असे बरेच दिवस त्या मालकाला लाभ होत गेला,अन् एके दिवशी त्यांनी तिला त्या हॉटेल ची 50%पार्टनर केले....
पुनम खूप खुश होती,तिला आता हक्काचे घर,मुलाचे भविष्य सर्वकाही आनंदात दिसत होते,शेवटी आपण अपशगुनि नसल्याचा टॅग तिने मिटविला होता,,आणि आपल्या मुलाला आता कसलीच अडचण जाणार नाही याची शास्वती तिला मिळाली होती....
म्हणतात ना आपल्यावर वाईट दिवस आले की आपलेच लोक पाठ फिरवितात परंतु जर चांगले दिवस आले की लगेच येतात,तसेच पुनम च्या बाबतीत घडले,तिचे चांगले दिवस आले तर सासूबाई आणि तिचा भाऊ व भावजय तिला भेटायला आले आणि आपल्या घरी चाल म्हणाले पण तिने त्यांना सरळ नकार दिला...सासूबाई चे हाल होत असल्यामुळे त्यांना स्वताच्या जवळ ठेवले आणि भावाला देखील मी तुला वेळप्रसंगी मदत करणार असे सांगितले...
तुटलेली नाते पुन्हा तिने मिळविली होती,मुलाला कसलाच दुःख होऊ नये फक्त हा च विचार ती करत जगत होती,मुलाचे भविष्य सुरक्षित आहे याचे तिला खूप समाधान वाटत होते...आणि ती तिचा मुलगा व सोबतीला सासूबाई सर्व आनंदाने जगत होते,,सासूबाईंना ही आता कळले होते की आपली सून अपशागुनि नाही म्हणून त्यांनी पुनम ची माफी मागितली व तू च माझी लेख म्हणून तिच्या डोक्यावर हात फिरविला...
नाही हो सासूबाई तुम्ही आता माझी सासूबाई नसून आई च आहात असे म्हणून तिने सासूबाईंना आलिंगन घातले.....
** समाप्त **
Ashwini Galwe Pund
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा