अपशकुन सुनबाईचा नसतो
अदिती आणि युवराज दोघे ही मोठ्या कंपनीत कामाला असतात, दोघे ही MBA असतात .ती स्वतः युवराज इतकीच शिकलेली असल्यामुळे दोघाच्या पगारत ,standard मध्ये काहीही फरक नसतो .
पण त्याच्या काही सवयी अदितीला आवडत नसतात ,त्यावरून बऱ्याचदा वाद होत असतात त्यांच्या मध्ये. नखे काढली की संध्याकाळीच काढणार, काही laptop वर खूप वेळ type केले की बोट मोडणार, अश्या किती तरी सवयी, मग वाढवणार ,मग ते अंधश्रद्धा म्हणून ती त्याला ऐकवणार, मग अश्यात तो ही भडकणार,काय लावलंय सगळे जुन्या विचाराचे पाढे.
संगती सोबती राहून राहून तिला ही सवय झाली होती,एका सवयीची ती म्हणजे office मध्ये जास्त काम झाले,tension आले की अदिती ही बोटे मोडायला शिकली होती, मग कधी कधी घरी ही तेच करायची,शेवटी ती सवयच झालेली,त्याला ती तरी काय करणार बिचारी.
मग युवराज कधी बघत असेल तेव्हा तो हसून म्हणायचा, " हे हे, आता कशी माझी बायको शोभतेस ग माझे राणी, "
तीही तिकडून," मग काय वाण नाही पण गुण तर लागणारच ना, अरे हो पण कधी ह्या गोष्टी आईंना कळल्या तर काय होईल रे, म्हणतील दोघे ही अपशकुन करत आहात "
तो म्हणाला, " मला तुझ्या बाबत माहीत नाही पण मला माझी आई कधीच नाव ठेवणार तर नाही,पण रागवणार ही नाही challenge लावतो "
ती, "हो रे तू तुझ्या आईचा बाबड्याच आहेस ना,बिघडलेला, मग तुला कशी बोलणार त्या, सून कशी सोपी असते, रागावले तरी ऐकून घेण्यापलीकडे काय करणार ती ,हो ना !!"
त्यादिवशी हे दोघे त्यांच्या गावी राहायला म्हणून गेले होते
चांगली 4 दिवसाची सुट्टी काढून .सासू आणि सासरे दोघे ही खूश होते, की चार दिवस राहतील दोघे तर घर भरल्यासारखे वाटेल. आल्याआल्या आईने मुलाची पापी घेतली त्याला ओवाळले,भाकर तुकडा ओवाळला, आणि सुनेला मात्र डोक्यावर पदर नाही म्हणून दोन शब्द ऐकवले, टिकली छोटी आहे ,त्याखाली कुंकू नाही ,चप्पल एकावर एक ठेवून घरात आली म्हणून सासू रागावली. अदितीने तरी निमूट पणे ऐकून घेतले ,सासू म्हणत हाती," किती सगळ्या गोष्टी तुला वारंवार सांगाव्या लागतात ग तुम्हा पोरींना, जरा वळण नाही. अग ह्या सगळ्या गोष्टी अपशगुण आहे हे ही कळत नाही का " !!

अदिती नेहमी सासरी आली की ,एका आदर्श सुने सारखीच वावरत, नेहमी साडी घालुन असत, मोठी टिकली, जसे असेल तसे जेवण, हातात बांगड्या, कुठेच बडेजाव पणा नसायचा,सासूला आवडेल तसे,कारण इनमिन चार दिवस राहायचे तर असते मग का मन दुखऊन जायचे. पण तिला माहीत होते सासू अंधश्रद्धा पाळणाऱ्या आहेत, म्हणून जरा जपूनच असत.
एक दिवस, अदिती अशीच कपडे धुवून आणि घरातील भांडे घासून दमली होती आणि नेहमीच्या सवयी प्रमाणे तिने बोटे मोडली,तिक्यात सासू ने पाहिले, आणि ओरडली, "हे काय तिन्ही सांजेच्या वेळी बोटे मोडतेस, लक्ष्मी येण्याच्या वेळी अपशकुन केलास ,तुला जरा ही भान नाही " ,
सासूचे हे तरिसट बोलणे ,आदीतीचे सासरे ऐकत होते, ते सहन झाले नाही म्हणून ते लगेच मध्ये बोलले, " तिला काय सतत रागवतेस तू, सुकून अपशकुन कोणी जाणून बुजून करत नसते, आज ती दिवशी भर ,घर आवरत होती, सगळे भांडे तिनेच स्वच्छ केले, धुणे ही तिनेच धुतले ,आणि तू तिला दमलीस का ग ,असे विचारण्या ऐवजी तिलाच अपशकुन केला म्हणतेस, जरा मुलाकडे ही बघ, तो तर माझ्या जवळ बसून हजारदा बोटे मोडत बसला होता, तो का नाही दिसला तुला अपशकुन करताना, ते तरी बर आहे ,अदिती बोलत नाही ,माघारी जर ती बोलली तर काय राहील तुझे , तिचे विचार इतके खालच्या पातळीचे नाहीत ,परत असे बोलायच्या आधी विचार करत जा , सून ही आपली मुलगीच असते, ती शकुनच करत असते ,लक्ष्मी असते जी भरभराट करत असते घराची ."
इतके बोलल्यावर सासू नरमली, तिला चूक कळली पण माफी मागायची हिम्मत नव्हती, तरी अदिती सासू कडे गेली आणि म्हणाली , " आई तुम्हीच बरोबर आहेत, मीच हे समजून घ्यायला हवे होते, ज्या गोष्टी मलाच आवडत नाहीत त्या नकळत मी ह्यांच्या कडून शिकत गेले "
©® कृपया कथा आवडल्यास ती नावासहीत share करावी. कथेतील विषय किंवा कथा चोरी झाल्यास त्यावर साहित्य चोरी कायद्या अन्वेय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथेतील मांडणी आणि विचार हे लेखिकेचे स्वतःचे आहेत.
©® कृपया कथा आवडल्यास ती नावासहीत share करावी. कथेतील विषय किंवा कथा चोरी झाल्यास त्यावर साहित्य चोरी कायद्या अन्वेय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथेतील मांडणी आणि विचार हे लेखिकेचे स्वतःचे आहेत.
©®अनुराधा अंधाळे पालवे