“गारवा …..वाऱ्यावर भिरभिरभिर पारवा …नवावनवा …प्रिये…गाण्यात गुंग झालेल्या मनवाच्या कानात दरवाजाची पुन्हा पुन्हा वाजणारी कर्णकर्कश बेल पडली ..आणि ती स्वप्नातून सत्यात आली.पटकन गाणं बंद करुन ती दरवाजा उघडायला गेली.दरवाजात ओलाचिंब झालेला तिचा नवरा मनिष उभा होता.अगं …केव्हाची बेल वाजवतोय ..ऐकू येत नाही का तुला? “अरे ..सॅारी ते किचन मध्ये होते त्यामुळे ऐकू नाही आलं”..रोजचचं झालंय हे असं म्हणत तो आत गेला.
मनवा आणि मनिषच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली होती..मोठा लेक आयआयटी इंजिनिअरिंग करुन नुकताच नागपूरला एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला होता तर धाकटा मेडिकलला शिकत होता.इतकी वर्ष नोकरी आणि संसार सांभाळताना मनवाची तारेवरची कसरत होत होती पण आता ती दोघंच असल्याने थोडासा मोकळा वेळ मिळत होता तिला.सोशल मिडीयाच्या मैदानात ती नव्यानेच उतरली होती..आवडत होतं तिला ही हे सगळं… रात्री सगळं आवरून ती बेड वर पहुडली तर मनिष केव्हाच झोपला होता.तिने सवयीने मोबाईल हातात घेतला तर WhatsApp वर तिला नोटिफिकेशन दिसलं..कुठल्या तरी ग्रुपमध्ये तिला ॲड केलं होतं .मोबाईल ची लाईट चेहऱ्यावर पडताच मनिष चिडला..तशी ती बाहेर हॉल मध्ये आली.
“आदर्श विद्यालय १९९६ बॅच”..ग्रुपचं नाव बघताच ती आनंदून गेली.अवघ्या ४० जणांचा वर्ग होता त्यांचा ..ग्रुपमध्ये किमान २० जणं तरी दिसत होती..तिने अधीरतेने नावं वाचायला सुरुवात केली आणि एक नाव दिसताच तिचा श्वास थांबला जणू..पराग देशपांडे.. नाव वाचता वाचताच डोळे अश्रूंनी डबडबले..तिचे आणि ती थेट पोचली तिच्या शाळेत..लांबसडक केसांच्या दोन वेण्या ,चाफेकळी नाक..बोलके डोळे असलेली षोडषा मनू ..अर्थात मनवा सरनोबत. सौंदर्याबरोबरच बुद्धीचंही वरदान होतं तिला आणि कलागुण तर ठासून भरले होते तिच्यात..घरीदारी सगळ्यांची लाडकी होतीच पण शाळेतही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या गळ्यातला ताईत होती ती.पराग तिचा बालमित्र..अगदी पहिलीच्या वर्गापासूनचा ..दोघांची अगदी घट्ट मैत्री..पण हल्ली पराग तिच्याशी तुटक वागायला लागला होता.तिला टाळू लागला होता,,तिनेही मग जवळीक साधायचं सोडून दिलं.दोघांमध्ये एक सूक्ष्म अढी निर्माण झाली….पण दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं कारण ती एकमेकांच्या प्रेमात पडली होती.परागला याची जाणीव आधीच झाली असावी आणि म्हणूनच अपराधीपणाच्या भावनेतून तो मनवाला टाळत होता. पण हळूहळू मनवाला ही जाणीव झाली की ती ही परागच्या प्रेमात पडली आहे.परागशिवाय आपलं आयुष्य असूच शकत नाही अगदी या निष्कर्षाप्रत येऊन पोचली होती.
दहावीचं वर्ष संपता संपता दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम कबूल केलं आणि त्यांच्या प्रेमप्रवासाला सुरुवात झाली..दोघेही परिस्थिती ने सधन होते..घरची माणसं सुशिक्षित होती त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर येणारच नाही असंच त्यांना वाटत होतं.कॅालेजची दोन वर्ष बघता बघता संपून गेली…खूप मोरपंखी दिवस होते ते मनवासाठी ..तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला पराग…मित्रमैत्रिणींची चेष्टा मस्करी सगळं कसं स्वप्नवतं वाटणारं.परागच्या आणि तिच्या सुखी सहजीवनाची स्वप्नं पहात ती कित्येक रात्री टक्क जागी असायची.१२ वी नंतर पराग ने मेडिकलला ॲडमिशन घेतलं आणि तो मुंबईला निघून गेला..मनवा ने जवळच्या च गावात डि.एड .ला ॲडमिशन घेतली.त्या काळात मोबाईल नव्हतेच ..फोनही नव्हता आणि पत्र पाठवायचं तर घरी कळेल या भितीने ते ही करता येत नव्हतं..पण पराग गावी आला की ती भेटायची ..भरभरून बोलायची..दोन वर्षात ती डि.एड. झाली..नोकरीला लागली .परागचं मात्र शिक्षण चालू होतं..आणि एक अनपेक्षित वळण आलं मनवाच्या आयुष्यात.तिचे बाबा आजारी पडले..कर्करोगाने त्यांना विळखा घातला..मनवाच्या लग्नाचा ध्यास घेतला त्यांनी आणि मनवा मात्र कात्रीत सापडली.परागशी संपर्क होत नव्हता..बाबांचा आजार वाढत होता..शेवटी बांबाच्या इच्छेने ती एका शुभममूहुर्तावर सौ.मनवा मनिष इनामदार झाली..तिथपासून आज पंचवीस वर्ष..पराग तिला कधीच भेटला नाही…”मनवा ..ऊठ अगं इथे का झोपलीस?” मनीष तिला हलवत होता. ती जागी झाली…मनिषला सॅारी म्हणत निघून गेली आत..सगळं आटोपून शाळेत गेली.संध्याकाळी लवकरच घरी आली…छान फ्रेश होऊन तिने मोबाईल उघडला तर ग्रुप वर गेट टुगेदर ची चर्चा चालू होती.तिनेही ठरवलं आपण जाऊच …ठरल्या प्रमाणे ती पोहोचली शाळेत गेट टुगेदरला ..शाळा बदलली होती ..पण मनाला तशीच हुरहूर लावत होती.सगळे जमले होते..पण तो दिसत नव्हता.. आणि अचानक त्याचं आगमन झालं..एक निष्णात सर्जन डॅा.पराग देशपांडे ..मनवा गोठून गेली बसल्या जागेवर.. तो मात्र निर्विकार..कशी आहेस मनू?..त्याचा प्रश्न आणि तिचे न संपणारे हुंदके..
तिच्या अश्रूंनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती..दाटून आलेलं मळभ साफ झालं होतं..शेवटी निघताना कुणाचा तरी मोबाईल वाजला…”हम बेवफा हरगीज न थे…पर हम वफा कर न सके….

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा