Login

अपूर्ण प्रेमकहाणी भाग 1

प्रेम नशिबाने मिळत असत.
" अनिश किती दिवस असाच बसणार आहेस,या सगळ्यातून तू कधी बाहेर येणार !" त्याची बहीण अश्विनी त्याला विचारत होती.तिच्या आवाजाने त्याने फक्त तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं.त्याच्या डोळ्यातील पाणी ओघळून अलगत जमिनीवर पडल.


त्याला इतकं असह्य आणि इमोशनल झालेलं तिने कधीच बघितलं नव्हत.पण त्या एका घटनेने त्याच होत्याच नव्हत झालं आणि तिचा भाऊ या जगत असून ही नसल्यासारखा वागत होता.


" अनिश मी तुझ्याशी बोलतेय प्लीज बोल ना रे काहीतरी ! तुला अस बघून मला किती त्रास होत असेल याची जाणीव आहे का तुला ? प्लीज मला एकदा दीदी म्हणून हाक मार तुझा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत.प्लीज बोल ना रे अनु ! " आश्विनी रडत रडत त्याच्याशी बोलत होती.तो मात्र परत शून्यात नजर लावून बसला होता.जणू त्याच्या मेंदू पर्यंत तिचा आवाजच पोहचत नव्हता.


अश्विनी तशीच निराश होऊन त्याच्या रूम मधून बाहेर गेली.


" काय झालं आशू काही बोलला का तो ? " तिची आई खूप आतुरतेने आणि आशेने तिला विचारत होती.


" नाही ग ! मम्मी तो काहीच बोलत नाही,आता काय करायचं आपण मला त्याची ही अस्वस्था बघवत नाही." आशू आपल्या आईच्या खुशीत जाऊन रडत होती. दोघींच्याही भावना अनावर झाल्या होत्या.दोघीही एकमेकांना कवटाळून रडत होत्या.


थोड्या वेळाने त्यांच्या भावनाचा पुर ओसरल्यावर त्या दोघीही शांत झाल्या.


" मम्मी आपण त्याला डॉक्टर कडे घेऊन जाऊया का ?परत एकदा ट्रीटमेंट चालू करू." आशू


" आशू तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी काय सांगितल आहे,तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच देत नाहीत तर त्याची ट्रीटमेंट तरी ते कशी करणार आणि रिस्पॉन्स दिला नाही तर बरा कसा होणार ." तिची मम्मी काळजीने बोलत होती.


" मग आता काय करायचं आपण त्याला त्या धक्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायलाच हवं." आशू पण टेन्शन मध्ये बोलत होती.


" आता सगळ बाप्पा वरच आहे तोच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढेल." तिची आई शालिनी वरती बघून बाप्पाला प्रार्थना करत होती.


" आई जरा मी मंदिरात जाऊन येते मला खूप अस्वस्थ वाटत आहे ,मी अनुला पण घेऊन जाते." आशू


" बरं बघ तो येतोय का ? आला तर घेऊन जा !" शालिनी अस म्हणून किचन मध्ये गेल्या.


आशू परत अनिशच्या रूम मधे गेली.त्याच्याशी बोलून ती त्याला जबरदस्ती उठून त्याला ती मंदिरात घेऊन गेली.