दोघेही मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतल.दर्शन घेऊन ते दोघेही बाहेर आले बाहेर आल्यावर ती त्याला तिथेच थांबवून बाजूच्या दुकानातून काही समान खरेदी करून आणायला गेली होती.समान खरेदी करून येताना एक भरधाव वेगाने गाडी तिच्या दिशेने येत होती.
अनिश तिकडेच बघत बसला होता.त्या गाडीच्या आवाजाने तो त्या दिशेला बघत होता तर ती गाडी आश्र्विनीच्या दिशेला येत होती.तो एकदा त्या गाडी कडे एकदा आशुकडे बघत होता.
ती गाडी जस जशी आशू जवळ येत होती. तसं तसं तो पॅनिक होऊ लागला ,आणि जशी ती गाडी तिच्या जवळ आली तसा तो जोरात ओरडला.
" दीदी sss" त्याचा आवाज इतका मोठा होता की,आजूबाजूचे सगळे लोक त्याच्याकडे काय झालं म्हणून बघत होते.आशू पण तो इतक्या मोठ्याने ओरडल्याने त्याच्याकडे बघत होती.ती त्याचा इतक्या दिवसांनी आवाज ऐकून सुन्न होऊन त्याच्याकडेच बघत होती.तिला आजुबाजूच भानच नव्हत.तो अगदी जीव तोडून ओरडत होता.पण तिच्या कानात सध्या त्याचाच आवाज घुमत होता.तेवढ्यात ती गाडी येऊन तिला धडकली आणि ती खाली पडली ,त्या गाडीचा ब्रेक जोराने दाबल्याने त्याचा कर्कश आवाज आला आणि गाडी थांबली.
" दीदी sss" अस म्हणून अनिश तिच्या जवळ गेला.तिला डोक्याला हाता, पायाला मार लागल्याने त्यातून रक्त येत होत.ते बघून तो खूपच घाबरला.आजूबाजूला माणसांची गर्दी होऊ लागली.त्यातील एक दोन माणसांनी त्याची मदत केली.तिला गाडीतून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.
तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेतल.तिच्यावर उपचार सुरू झाले.तिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध झाली होती.तिला शुद्ध येण्यासाठी वेळ लागणार होता.
तिच्या कडे बघून तो खूप रडत होता.तिची अवस्था बघून त्याच्या नजरेसमोर तो सगळा घटनाक्रम उभा होता.त्याला तो दिवस आठवला की,आताही अंगावर काटा येत होता.त्या दिवसाची आठवण आली ,ते आठवून तो खूप पॅनिक झाला होता.त्याची अवस्था बघता त्याला त्या व्यक्तीने डॉक्टरांना बोलवून त्याच्यावर ही उपचार करायला सांगितले.
त्या व्यक्तीने अनिशच्या हातात जो आश्र्विनीचा फोन होता , तो घेऊन त्यावर त्याने लास्ट कॉल कोणाला केला आहे हे बघून त्याने तिच्या घरी फोन करून सांगितलं.
शालिनिला तर ते ऐकून धक्काच बसला होता,ती तिथेच खाली बसली.पण परिस्थितीच भान आल्यावर ती लगेच हॉस्पिटल मध्ये गेली.
हॉस्पीटल मध्ये गेल्यावर तिने रिसेप्शन वर चौकशी करून आशू होती.तिथे गेली.तिला अश्या अवस्थेत बघून शालिनी रडू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा