Login

अपूर्ण प्रेमकहाणी भाग -2

उर्वशी आणी अथर्वची अपूर्ण प्रेम ...
अपूर्ण प्रेमकहाणी ( भाग -2 )



उर्वशी घरी आली. 

उर्वशी आली का?  उर्वशीची आई  म्हणतात.

हो आई,  मस्त कडक चहा   ठेवणा,    बाबा कुठे आहे? अजून आले नाही का?, आता  दुकानात  खूप  वेळ बसतात.  उर्वशी म्हणते. 

तुझ्या लग्नाला  पैसे लागतील ना,  म्हणून ते  जास्त वेळ दुकानात  बसतात.  उर्वशीची आई  म्हणतात.

मी जॉब करेल, मग लग्न करेल, उर्वशी म्हणते.

आधी कॉलेज पूर्ण  होऊ दे,   मग   आपण बघू,  जा फ्रेश   होऊन ये,  उर्वशीची आई  म्हणतात.

उर्वशी रूममध्ये जाते,  चेंज  करते.  बाथरूम मध्ये जाते.  फ्रेश  होते.  

तो  पर्यत तिची आई चहा  घेऊन येते.  उर्वशी आणी तिची आई चहा  घेते. 

उर्वशी  थोडावेळ आई सोबत  बोलते.   अभ्यासाला  बसते. 

अथर्व घरी जातो.   त्यांची आई वाट  बघत  असते. 
अथर्व  रूममध्ये  जातो.  फ्रेश  होतो.  त्यांची  त्याला  आई त्याला चहा  आणून  देते.  तो  चहा  पितो.   आई  सोबत  बोलतो.

आई  मी आणी उर्वशी  डान्स करणार आहे.  त्यांची प्रॅक्टिस  करायची आहे.  गाणे शोधायचे आहे.   अथर्व  म्हणतो 

तुला कोणती दुसरी मैत्रीण नाही का?  सारखं उर्वशी...  उर्वशी  करत  असतो.  अथर्वची आई म्हणतात. 

त्यांना  उर्वशी आवडत नव्हती. त्याला  मॉर्डन सून हवी आहे. उर्वशी खूप साधी  मुलगी आहे. आणी  श्रीमत पण हवी आहे.   उर्वशीच्या बाबांकडे फक्त  दुकान आहे.  त्याच्यावर  त्यांचे घर  चालते.

आई उर्वशी  खूप  चांगली आहे.  सगळ्यांना  मदत करते.  हुशार  आहे. अथर्व  म्हणतो.

अथर्वची आई नोक  मुरडतात. त्यांच्या रूममध्ये निघून  जातात.

आईला उर्वशी का आवडत नाही?  उर्वशी किती चांगली आहे.  अथर्व म्हणतो.

अथर्वला  उर्वशी का आवडते?  त्यांच्या  दुसऱ्या मैत्रिणी किती चांगल्या आहे.   टीना  किती छान आहे.  किती मस्त  आंटी  म्हणते. उर्वशी आल्यावर काकू...  काकू  म्हणते.    अथर्वची आई म्हणते.

अथर्व काही गाणी शोधत होता. त्याला आवडलेली गाणी तो लगेच उर्वशीला पाठवत होता.
पण उर्वशीने अजून मोबाईल पाहिलाच नव्हता.

ती बाबांच्या किराणा दुकानात गेली होती. दुकानात खूप गर्दी होती, त्यामुळे तिला मोबाईल पाहायला वेळच मिळाला नाही.

खूप  उशिरा  झाला होता,  रात्र होऊन गेली होती. 

बाबा आता घरी चला,   खूप  उशीर झाला आहे. आपण आता घरी जाऊ,  उर्वशी म्हणते.

तिच्या बाबांनी पण  मुलीचे ऐकले.  दुकाना बाहेरील वस्तू आत घेतल्या.  दुकानाला लॉक लावले.  दोघे पण  घरी जायला  निघाले. 

उर्वशीची आई  वाट  बघत होती. 

उर्वशीची  आणी तिचे बाबा घरी आले. 

उर्वशीच्या आईने पाणी आणून दिले. 

त्यांनी पाणी घेतले,  फ्रेश  होण्यासाठी  गेले.

उर्वशीच्या आईने जेवण गरम केले. 
जेवण  हॉल मध्ये आणले.  तिघे पण  जेवायला बसले.
गप्पा करत त्यांचे जेवण झाले.


क्रमश...


तुम्हांला कथा आवडत असले तर  लाईक आणी कमेंट करा.