Login

अपूर्ण प्रेमकहाणी भाग -3

उर्वशी अथर्वची अपूर्ण प्रेम...
अपूर्ण प्रेमकहाणी ( भाग -3 )


उर्वशीने  मोबाईल बघितला.  गाणं आवडले  ते  डाउनलोड  करून घेतले. मोबाईल ठेवून देते. आणी झोपून  जाते..

अथर्व सकाळी लवकर उठला. सूर्याच्या किरणांनी हळूहळू खोलीत उजेड भरला होता. तो हळूहळू आपले आवरतो आणि रूममधून बाहेर पडला.

किचनमध्ये त्याची आई व्यस्त होती. तिने हसत हाक मारली,
“अथर्व, बाळा, नाश्ता तयार आहे. ये जरा!”

अथर्वने आपले केस थोडे विस्कटून हसत उत्तर दिले,
“गुडमॉर्निंग, आई!”

आई त्याला मिठीत घेत हसली,
“गुडमॉर्निंग, बाळा. चला, नाश्ता करून घेऊया. आज तुला खास भुर्जी बनवला आहे   तुला आवडते ना!”

अथर्व टेबलकडे चालत असताना चविष्ट वासाने त्याला मोहून टाकले. तो म्हणाला,
“वा! आई, हे वास खूप छान येतोय. मी आधीच भुर्जी खाऊन खुश झालो असतो!”

आई हसली आणि म्हणाली,
“तू खाऊन खुश होशील, पण आधी हात धुवायला विसरू नकोस!”

अथर्व हात धुऊन परत आला, आणि आईने प्लेटमध्ये भुर्जी टाकली. तो भुर्जी खाताना आईला बघत म्हणाला,
“आई, तुझा भुर्जीचा जादूच काही वेगळाच आहे!”

आई हसून म्हणाली,
“मग काय, रोज सकाळी जादू सुरू ठेवूया का?”

अथर्व हसला आणि म्हणाला,
“हो, हो! पण पुढच्या आठवड्यात मी तुमच्या जादूची किंमत वाढवेन – मी तुमच्यासाठी नाश्ता करून घेईन!”

आई आश्चर्यचकित आणि हसत म्हणाली,
“अरे बाळा, मग आपल्या घरात खूप मजा होईल!”

सकाळच्या या गोड गप्पा-गोष्टींनी दोघांच्या दिवसाला सुरुवात आणखी आनंदी केली.


उर्वशीला तिच्या आईने सकाळी उठवले. उर्वशी हळूहळू उठली आणि आई किचनमध्ये निघून गेली. उर्वशीने लगेच आपले आवरायला सुरुवात केली कारण तिला कॉलेजला जायचे होते.

तयार होऊन उर्वशी बाहेर आली. आई नाश्ता घेऊन आली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. उर्वशीने नाश्ता करून घेतला.

बाबा देखील तयार झाले होते; त्यांना दुकानात जायचे होते.

उर्वशी कॉलेजला निघाली. तिच्या मनात एक गोड उत्साह होता, कारण आज तिला अथर्व भेटणार होता.

“आपल्याला आता उर्वशीसाठी योग्य मुलगा बघायला पाहिजे,” उर्वशीची आई म्हणाली.

“तिचे कॉलेजचे थोडे महिने उरले आहेत. ते होऊ द्या, मग तिच्या लग्नाचा विचार करू,” उर्वशीचे बाबा म्हणाले.

“चालेल,” उर्वशीची आई हसत म्हणाली.

“मी आता दुकानात जातो,” उर्वशीचे बाबा म्हणाले आणि शर्ट घालून निघाले.

आईने नाश्ता करून घेतला आणि भांडी उचलून किचनमध्ये निघून गेली.

उर्वशी कॉलेजला पोहचली आणि अथर्वदेखील तिथे आला होता. त्यांनी आधी लेक्चर पूर्ण केले आणि नंतर ठरल्याप्रमाणे कॉलेजच्या हॉलमध्ये भेट घेतली. उर्वशी आणि अथर्व आपली डान्स प्रॅक्टिस करत होते, तर बाकीचे विद्यार्थी नाटकाची तयारी करत होते.

अशा गोड आणि उत्साही वातावरणात त्यांचा दिवस सुरेखपणे जात होता. उद्याचा प्रोग्राम लक्षात ठेवून त्यांनी आजची डान्स आणि नाटकाची तयारी पूर्ण केली होती.



क्रमश...


तुम्हांला कथा आवडत असले तर  लाईक आणी कमेंट करा.