अपूर्ण प्रेमकहाणी भाग 4
आज कॉलेजमध्ये मोठा प्रोग्राम होता. हॉलभर विद्यार्थी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि पाहुणे जमलेले होते. सर्वांचे उत्साहाचे हसरे चेहरे दिसत होते.
स्वागतासाठी एक मुलगी स्टेजवर आली. ती हसत हसत पाहुण्यांचे फुलांचे गुलदस्ते देत स्वागत म्हणाली. पाहुणे थोडे बोलून आपल्या जागेवर बसले.
मुलगी उत्साहाने म्हणाली,
“आता वेळ आहे प्रोग्राम सुरु करण्याची! गणपती बाप्पाच्या गाण्याने प्रोग्रामची सुरूवात होणार आहे. चला, उर्वशी आणि अथर्वसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा !”
“आता वेळ आहे प्रोग्राम सुरु करण्याची! गणपती बाप्पाच्या गाण्याने प्रोग्रामची सुरूवात होणार आहे. चला, उर्वशी आणि अथर्वसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा !”
उर्वशी आणि अथर्व स्टेजवर आले. त्यांच्या डान्सने हॉलमध्ये जादूच निर्माण झाली. प्रत्येक हालचाल, प्रत्येक स्मितहास्य, प्रत्येक स्टेप इतके परफेक्ट होते की सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. टाळ्या आणि “वन्समोर! वन्समोर!” म्हणण्याचा आवाज दगदगला.
उर्वशी आणि अथर्व एका मिनिटासाठी एकमेकांकडे पाहिले आणि हलके हसू भरले. त्यांची नजरेची मजा पाहून शेजारी असलेले मित्रमैत्रिणी गुपचूप हसले.
प्रोग्राममध्ये बरेच विद्यार्थी आणि गट सादरीकरण करत होते—टीना, सोनी, राजू, विनोद यांचे नाटक झाल्यानंतर शेवटी उर्वशी आणि अथर्वचा डान्स आला. हा डान्स इतका सुंदर आणि सुसंगत होता की सर्व हॉलभर टाळ्यांचा गजर झाला.
थोडा ब्रेक झाला. निकाल जाहीर झाला आणि उर्वशी-अथर्वच्या डान्ससाठी पाहिले बक्षीस मिळाले. नाटक साठी पण पाहिले बक्षीस मिळाले, मित्रमैत्रिणी खूप खुश झाले आणि कॅन्टीनमध्ये थोडे सेलिब्रेशन केले.
अखेर सर्वजण आनंदाने घरी निघाले, आणि उर्वशी आणि अथर्वच्या चेहऱ्यावर आजच्या प्रोग्रामची गोड आठवण चमकत होती.
उर्वशी आणि अथर्व कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकत्र बसले होते. वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. अथर्वने धाडस एकवटून हळू आवाजात उर्वशीला प्रपोज केलं. उर्वशी काही क्षण शांत राहिली, मग हलकेच हसून “हो” म्हणाली.
दोघंही खूप आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि डोळ्यांतील चमक सगळं सांगत होती.
“अथर्व, आता आपल्या परीक्षा आहेत. नीट अभ्यास करायला हवा,” उर्वशी काळजीने म्हणाली.
“हो, नक्की! अभ्यासात कसलीही तडजोड नाही,” अथर्वही मान डोलावत म्हणाला.
नंतर दोघंही गप्पा मारत वेळ घालवत बसले. त्यांचे बोलण्यात हलकंसं हास्य, भविष्यासाठी स्वप्नं आणि एकमेकांसोबतची गोड नाती दिसत होती.
दरम्यान, उर्वशीचे बाबा दुकानात बसलेले होते. त्यांचा जुना मित्र राम त्यांना भेटायला आला.
“कसं चाललंय?” राम विचारतो
“छान चाललंय. आता फक्त मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं, हीच इच्छा आहे,” उर्वशीचे बाबा हसत म्हणाले.
राम थोडं हसून म्हणाला,
“माझा मुलगा धीरज आहे ना, तो चांगला शिकलेला आहे. आत्ता छान नोकरीलाही लागला आहे. मला तुझी उर्वशी सून म्हणून खूप आवडेल. ह्याचसाठी आलोय.”
“माझा मुलगा धीरज आहे ना, तो चांगला शिकलेला आहे. आत्ता छान नोकरीलाही लागला आहे. मला तुझी उर्वशी सून म्हणून खूप आवडेल. ह्याचसाठी आलोय.”
हे ऐकून उर्वशीचे बाबा आनंदित झाले.
“खरं बोलतोस का तू? मला तर खूप बरं वाटेल. फक्त तिचं शेवटचं वर्ष आहे, आता परीक्षा झाल्या की मी तिच्याशी बोलतो,” ते म्हणाले.
“खरं बोलतोस का तू? मला तर खूप बरं वाटेल. फक्त तिचं शेवटचं वर्ष आहे, आता परीक्षा झाल्या की मी तिच्याशी बोलतो,” ते म्हणाले.
रामनेही हसत मान्य केलं,
“हो, धीरजला सुद्धा थोडं सेटल होऊ दे. मग आपण या दोघांचं लग्न धूमधडाक्यात करू.”
“हो, धीरजला सुद्धा थोडं सेटल होऊ दे. मग आपण या दोघांचं लग्न धूमधडाक्यात करू.”
दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. नंतर राम घरी निघून गेला.
थोड्याच वेळात उर्वशीची आई दुकानात आली. बाबांनी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. हे ऐकून उर्वशीची आई खूप खुश झाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले.
क्रमश...
तुम्हांला कथा आवडत असले तर लाईक आणी कमेंट करा.
दिपाली चौधरी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा