अपूर्ण रेषा भाग - २ (अंतिम भाग)
निकाल जाहीर होण्याच्या वेळेस सगळे विद्यार्थी एका मोठ्या सभागृहात बसले होते. स्टेजवर नामांकित कलाकार, पत्रकार आणि मोठमोठे प्रायोजक बसले होते.
आरवच्या हाताचे तळवे घामाने ओले झाले होते.
“मी फक्त टॉप १० मध्ये आलो तरी पुरेसं आहे…” स्वतःलाच तो सांगत होता.
स्पर्धेचा निकाल जाहीर होत होता, १०वे, ९वे, ८वे…
आरवचं नाव नव्हतं.
आरवचं नाव नव्हतं.
त्याला वाटलं, “चालायचंच. इतक्यातच हार मानून चालणार नाही.” पदके संपत आली. फक्त पहिले तीन पुरस्कार उरले.
तिसरं पारितोषिक, नाव जाहीर झालं. आरव नाही.
दुसरं पारितोषिक,आरव नाही.
दुसरं पारितोषिक,आरव नाही.
आता संपूर्ण हॉल शांत झाला. आरवचे डोळे खाली गेले. “कदाचित माझं चित्र खूप साधं वाटलं असेल.”
स्टेजवरील मुख्य परीक्षक मायक्रोफोनसमोर उभे राहिले.
त्यांनी हसून जाहीर केलं, “या वर्षीचं पहिलं पारितोषिक जातं…महाराष्ट्रातील नाशिकच्या देवलाली कॅम्पमधील,
आरव जोशीला!”
त्यांनी हसून जाहीर केलं, “या वर्षीचं पहिलं पारितोषिक जातं…महाराष्ट्रातील नाशिकच्या देवलाली कॅम्पमधील,
आरव जोशीला!”
हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आरवच्या डोळ्यातून पाणी आलं. तो विश्वासच ठेवू शकत नव्हता. तो स्टेजकडे चालत होता, पण चालताना त्याच्या मनात फक्त आईचं एक वाक्य घुमत होतं, “अपूर्ण रेषा पूर्ण करायची ताकद तुझ्यात आहे.”
स्टेजवर पोहोचल्यावर एक ज्येष्ठ कलाकार त्याला म्हणाले, “तुझं चित्र बाकी कोणत्याही चित्रासारखं नव्हतं. तू चूक झाकली नाहीस… तू तिला सुंदर बनवलंस. हेच खरे कलाकाराचे लक्षण.”
ते पुढे म्हणाले, “लोकांना वाटतं परफेक्शन म्हणजे सगळं बरोबर असणं. पण खरे परफेक्शन म्हणजे चुकांना स्वीकारून त्यातून नवं काहीतरी तयार करणं.”
आरवचे हात थरथरत होते. त्याने पुरस्कार घेतला आणि संपूर्ण सभागृह त्याच्या सन्मानात उभं राहिलं.
आरवचा प्रवास इथंच संपत नव्हता… पुरस्कारानंतर त्याची मुलाखत सुरू झाली. पत्रकारांनी विचारलं,
“तू एक हाताने एवढं सुंदर कसं काढलंस?”
“तू एक हाताने एवढं सुंदर कसं काढलंस?”
आरव शांतपणे म्हणाला, “एक हात कमी होता… पण माझा ध्यास, माझं मन, आणि माझी इच्छा, हे तिघे पूर्ण होते.”
ही वाक्ये सोशल मीडियावर पसरली. आरव व्हायरल झाला. देशभरातून त्याला चित्रकलेच्या वर्कशॉपसाठी निमंत्रण येऊ लागलं. काही महिन्यांनी त्याचं पहिलं आर्ट एग्झिबिशन मुंबईत लागलं, “अपूर्ण रेषा”. लोक त्याचे चित्र पाहून स्तिमित झाले.
त्याच्या प्रत्येक चित्रात एकच संदेश असायचा,
“तुटलं म्हणून थांबू नकोस. अपूर्ण आहे म्हणून त्या ठिकाणी सौंदर्य शोध.”
“तुटलं म्हणून थांबू नकोस. अपूर्ण आहे म्हणून त्या ठिकाणी सौंदर्य शोध.”
एका दिवशी त्याच्याकडे एक बाई आली, तिचा १० वर्षांचा मुलगा एका अपघातात हात गमावला होता.
ती म्हणाली, “माझा मुलगा पुन्हा कधीही चित्र काढणार नाही म्हणतो. तो खूप घाबरलेला आहे. कृपया त्याच्याशी बोला.”
ती म्हणाली, “माझा मुलगा पुन्हा कधीही चित्र काढणार नाही म्हणतो. तो खूप घाबरलेला आहे. कृपया त्याच्याशी बोला.”
आरव त्या मुलाजवळ बसला, त्याला आपलं जुनं चित्र दाखवलं… तेच, अपूर्ण मुलगा आणि सूर्यकिरण.
“तुला माहितीये,” आरव म्हणाला, “हे चित्र मी एका हाताने काढलं आहे. आणि त्यात जो काळा डाग पडला होता… त्यानेच ते सुंदर बनवलं.”
मुलाने पहिल्यांदाच हसून विचारलं, “मीही काढू शकतो का?”
आरवने त्याला पेन्सिल दिली, “तुझ्या रेषा जिथे थांबतील, तिथून तुझा प्रकाश सुरू होईल.”
त्या मुलाने चित्र काढायला सुरुवात केली… आणि त्या क्षणी आरवला जाणवलं, “हा माझा खरा पुरस्कार आहे.”
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा