" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद कथालेखन ( संघ कामिनी )
अपूर्णतेचा कलंक
©® भालचंद्र नरेंद्र देव
भाग ५
समोर एक छोटेसे; पण सुरेख घर दिसत होते. खिडकीतून प्रकाश आत येत होता आणि बाजूच्या कोपऱ्यात एक लहान मुलगी रंगीत खडूंनी चित्र रंगवत होती. श्रुती हळुवारपणे तिच्या केसांतून हात फिरवून हसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता एक शांतता होती, जी कित्येक महिन्यांच्या संघर्षातून सापडलेली होती.
मागील काही महिन्यांत श्रुतीचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. ती आता 'स्त्री आत्मभान केंद्रा'मध्ये सल्लागार म्हणून काम करत होती. तिच्यासारख्या अनेक महिलांना ती मार्गदर्शन करत होती, ज्यांनी आयुष्यात वेदना, चुकीचे दोष आणि अपमान सहन केले होते.
ती आता आई देखील होती, एका गोंडस लहान मुलीची. जी तिला ‘आई’ म्हणून बिलगून राहायची. एकल पालक असून देखील तिने एका लहान पाच वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले होते. ती आई झाली होती. फक्त शरीराने नव्हे, तर तिच्या काळजातील प्रेमाने आणि त्या लहान मुलीच्या विश्वासाने!
एका संध्याकाळी जेव्हा श्रुती कार्यालयातून नुकतीच घरी आलेली होती, तेव्हा दारावर टकटक झाली. दरवाजा उघडल्यावर आकाश समोर उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते. डोळ्यांत पश्चात्ताप आणि हातात एक छोटी बॅग होती.
“श्रुती मी चुकलो. खूप चुकलो. माझे सगळे काही हरवले आहे आणि आज मला कळतंय, तू माझ्यासाठी काय होतीस ते. माझ्या आईला देखील आता पश्चात्ताप होत आहे. ती तुझी माफी मागायला तयार आहे.”
श्रुती काही क्षण गप्प राहिली. ती त्याच्याकडे पाहत होती; पण तिच्या चेहऱ्यावरून काहीही कळत नव्हते. तिच्या नजरेत द्वेषही नव्हता आणि प्रेमही नव्हते. एखाद्या अज्ञात माणसाबरोबर बोलणे चालू आहे असे ती वागत होती.
आकाश पुढे म्हणाला,
“मला पुन्हा एक संधी देशील? आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का?”
“मला पुन्हा एक संधी देशील? आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का?”
त्या क्षणी फक्त एक श्रुती नाही, तर तिला तिच्या नवीन कार्यालयात भेटलेल्या शेकडो श्रुती तिच्या तोंडून बोलत होत्या.
तिने हळू आवाजात; पण ठाम शब्दांत उत्तर दिले,
“आकाश, लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचे एकत्र राहणे नव्हे. ते एक विश्वासाचे, समतेचे आणि सत्याचे बंधन असते. मी ते बंधन जपले; पण तू लोकांच्या भीतीपोटी मला एका नैराश्याच्या गर्तेत टाकून दिले होतेस. आज तू परत आलास, हे खरंच तुझे धैर्य आहे; पण मी आता पुन्हा मागे जाऊ शकत नाही.”

आकाशचा चेहरा उतरला. तो काहीच बोलला नाही.
ती पुढे म्हणाली,
“मी आता कोणाची 'अपूर्ण पत्नी' नाही, मी 'वांझ' नाही. मी एक 'पूर्ण स्त्री' आहे जी आज आपल्या स्वतःच्या नावाने, आत्मसन्मानाने आणि प्रेमाने जगत आहे. मी आता कधीही देवाची पूजा करू शकते, दिवा लावू शकते; पण आता तो दिवा म्हणजे वंशासाठी नाही, तो ‘आशेसाठी’, ‘सत्यासाठी’ आणि ‘स्वाभिमानासाठी’ आहे! आई होणे ही फक्त शरीराची गोष्ट नसते, ती मनाची आणि प्रेमाची देखील असते.”

आकाश शांतपणे परत निघून गेला. तो त्याचा पराभव नव्हता, तो तिचा विजयही नव्हता. तो फक्त एका चुकलेल्या प्रवासाचा शेवट होता. श्रुती घरात आली. तिची मुलगी तिच्या गळ्यात बिलगली. तिने समोरचा दिवा पेटवला, न नवसासाठी, न देवासाठी; तो होता त्या सर्व स्त्रियांसाठी, ज्या अजूनही स्वतःच्या आवाजासाठी घरात बसून लढायचा प्रयत्न करत होत्या.
समाप्त
© भालचंद्र नरेंद्र देव ( संघ कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा