मागून मिताचा आवाज त्याला कानी पडताच, तो घाबरून गेला.
"ह्या चोरीच्या पैशांनी तु त्यांना सांभाळणार आहेस का?"
"नाही ग मिता. मी हे पैसे देवळातल्या दानपेटीत टाकण्याचा विचार करत होतो."
झाल्या प्रकारची त्याने मिताची माफी मागितली. मिताने देखील मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि पुन्हा आई वडीलांसोबत आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा सल्ला दिला. तितक्यात देवळाजवळ एक वृद्ध अंध जोडपे एकमेकांना आधार देत चालत आले आणि पोटाची खळगी भरण्यासाठी तिथे येऊन त्यांच्याकडे असलेले दिवाळीनिमित्त दिवे विकू लागले. त्यांच्या पत्नी ने साडीचा पदर स्वतःच्या डोक्यावर घेऊन दुसरे डोकं त्यांचा डोक्यावर ठेवून ते त्यांच उन्हापासून रक्षण करत होत्या. इतक्या कडक उन्हात देखील ते त्यांच्या सुरेल आवाजात गाणं गात एका कड्याला बसले होते.
आभाळ फाटलेले, टाका कुठे भरू मी ?
आता कसे करु मी ?
आधार ना निवारा आता दिशांत चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरु मी ?
का कोण जाणे त्यांचा आवाज ऐकून गण्याला तो आवाज परिचयाचा वाटला तो वळला आणि त्या दोघांत तो आपल्या आई वडीलांना पाहू लागला. गण्याने एकवार देवाकडे पाहिले आणि त्यांच्याकडे जाऊन त्याच्याजवळ होते नव्हते सगळे पैसे त्या जोडप्याला देऊन सगळे दिवे विकत घेतले आणि त्यांचा हात स्वतःच्या डोक्यावर घेत आशीर्वाद घेतला.
आता कसे करु मी ?
आधार ना निवारा आता दिशांत चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरु मी ?
का कोण जाणे त्यांचा आवाज ऐकून गण्याला तो आवाज परिचयाचा वाटला तो वळला आणि त्या दोघांत तो आपल्या आई वडीलांना पाहू लागला. गण्याने एकवार देवाकडे पाहिले आणि त्यांच्याकडे जाऊन त्याच्याजवळ होते नव्हते सगळे पैसे त्या जोडप्याला देऊन सगळे दिवे विकत घेतले आणि त्यांचा हात स्वतःच्या डोक्यावर घेत आशीर्वाद घेतला.
"मिता बघ तु आता. मी जाईल त्यांच्याजवळ पण कष्टाची कमाई घेऊनच." मिताला मनोमन खरच प्रसन्न वाटलं. ती त्याला घरी घेऊन आली. मुलं अजूनही संजू सोबत बसली होती. इतके सारे दिवे पाहून सगळे खुप खुश झाले.
"आता प्रश्न हा आहे की, इतक्या सगळ्या दिव्यांच करायचं तरी काय?" गण्या त्या दिव्यांकडे पाहत म्हणाला.
"आपण एक काम करू हे दिवे सगळ्यात वाटून घेऊ आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकुया." मिता म्हणाली.
"पण ताई हे दिवे किती साधे आहेत. असे दिवे लवकर कोणी घेईल का..?" सगळे विचारात पडले. तितक्यात संजू ला काहीतरी आठवलं.
"असं असेल तर तायडे तु मला बघ चित्रकलेचं साहित्य आणलेस त्यातले रंग वापरून सगळे दिवे छान रंगवू." संजुची ही युक्ती सगळ्यांनाच आवडली होती. सगळ्यांच्या मनात उत्साह भरला.
"पण दिवाळी तर किती जवळ आलीय. हे इतके सगळे दिवे होतील का रंगवून दिवाळीच्या आधी?" त्यांच्यापैकी एकाने विचारले.
"का नाही होणार. दिवा लहान जरी असला तरी मिट्ट काळोखाला न घाबरता त्याच्या छोट्याशा ज्योतीने अंधाराला प्रकाशमय करण्याची ताकद असते त्याच्यात, तर तुम्ही का नाही करू शकत का?" असं म्हणत मिताने सगळ्यांना विश्वास दिला आणि सगळे कामाला जुंपले. दिवसभर मिता, संजू आणि थोडे जण त्या दिव्यांना रंगवू लागले आणि गण्या आणि बाकी सगळे त्यांना विकायला बाजारात घेऊन गेले. खरच त्यांच कष्ट फळाला आलं आणि सगळ्यांनी मिळालेल्या पैशातून दिवाळी साजरी केली. सगळी मुलं खुप खुश होती. हे पाहून मिता आणि गण्या देखील मनापासून आनंदी होते. आता त्यांनी तिथेच न थांबता वेगवेगळ्या गोष्टी विकायला सुरुवात केली होती आणि हळूहळू त्यात जम बसत होता. मिता आणि गण्या मिळून सगळ्या मुलांच्या आई वडीलांना त्यांना ह्या वर्षी सरकारी शाळेत प्रवेश करून देण्यासाठी विनवणी करून आले. सोबतच मिताने सगळ्या मुलींची आणि गण्याने मुलांची जबाबदारी घेतली.
गण्याने असेच काही दिवस मेहनत करून काही पैसे गाठीशी जमवले आणि त्यातून त्याने आई ला साडी आणि वडीलांना शर्ट घेऊन आपल्या घरी जायला निघाला. सगळ्यांनी त्याला निरोप देत लवकर आई वडीलांना इथे घेऊन येण्यासाठी सांगितलं. गण्याला इतकी वर्ष झाली म्हणून त्याला थोडफार आठवत होत. कसाबसा तो त्या ठिकाणी पोहचला. तो राहायचा तिथला सगळा परिसर बदलला होता. तिथे मोठमोठ्या उंच इमारती झाल्या होत्या. त्याला कळेना तो नक्की बरोबर ठिकाणी पोहचला आहे की नाही. तितक्यात मागे त्याला जुनी पानाची टपरी दिसली. तिथले काका आता वृद्ध झाले होते. त्याने तिथल्या जागेची माणसांची नावे घेत विचारपूस केली तसे त्या काकांनी त्याला ओळखले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
ज्या दिवशी तो पैसे चोरून पळून आला त्याने ती पर्स तिथेच टाकली होती. ज्या बाईची ती पर्स होती ती पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी तपास करत असताना तिला तिची ती पर्स दिसली आणि त्या बाईने खुप आरडाओरड करत चोरीच्या आरोपात गण्याच्या आई वडीलांना पोलिसांनी कोठडीत टाकले. काही महिन्यांनी ते घरी परतले तर त्यांच्या इथल्या झोपड्या बिल्डरने कधीच पाडून त्यावर इमारतीचं बांधकाम चालू केलं होत. आता जावं कुठे म्हणून ते दारोदारी गाणं गात भटकत असतात. हे सगळं ऐकताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. गण्याला खुप मोठा पश्चाताप होत होता. त्याच्या वागण्याची लाज वाटत होती. तो त्यांना कसा सामोर जाईल ह्याचाच विचार करत असताना पाठून आवाज आला.
आभाळ फाटलेले, टाका कुठे भरू मी ?
आता कसे करु मी ?
आधार ना निवारा आता दिशांत चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरु मी ?
आता कसे करु मी ?
आधार ना निवारा आता दिशांत चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरु मी ?
- समाप्त
अक्षता कुरडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा