अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७०
मागील भागाचा सारांश: रश्मी ऋतुजाला रोहन बद्दल सांगत होती, पण तिने जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. रश्मीला ऋतुजाचा राग आला होता. पार्किंग मध्ये रोहनची भेट ऋतुजा व रश्मी सोबत झाली, त्यावेळी त्याचं आणि रश्मीचं कामावरुन बोलणं झालं. ऋतुजाने याबद्दल रश्मीला विचारलं, तर ती काही न सांगता निघून गेली. ऋतुजाच्या घरी कपड्यांची खरेदी करण्यासाठी सुलभा मावशी, मनोहर काका व पियू आले होते.
आता बघूया पुढे….
"दीदी, तुझं लग्न आहे आणि तू शॉपिंग साठी अजिबात एक्सायटेड नाहीयेस. बाकीच्या मुलींना शॉपिंग म्हटलं की किती आवडतं. तुझ्या लग्नात, प्रत्येक कार्यक्रमात काय घालायचं? याची तयारी मी कधीपासून करुन ठेवली आहे. तू अशी का आहेस?" पियूने ऋतुजाला विचारले.
"पियू, मीही त्यासाठी एक्सायटेड आहेच. फरक एवढाच आहे की, मी तो उत्साह सगळ्यांसमोर दाखवत नाही. मध्यंतरी अभिराजचा जिवलग मित्र एक्सपायर झाल्याने शॉपिंगचा विषय मागे पडला होता. आज रात्री त्याच्या सोबत त्या विषयावर मी बोलून घेते." ऋतुजाने सांगितले.
ऋतुजा पियू सोबत बोलत असतानाच तिला अभिराजचा फोन आला.
"बघ याला शंभर वर्षे आयुष्य आहे." अभिराजचं नाव स्क्रीनवर बघून ऋतुजा म्हणाली.
"तू जिजूंसोबत फोनवर बोल. मी जाते. मी काही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही." पियू ऋतुजाच्या रूममधून बाहेर पडताना म्हणाली.
"हं बोल अभी, काय म्हणतोस?" ऋतुजा म्हणाली.
"आज आमच्या मॅडमचा आवाज खूपच लो आहे. ऑफिसमध्ये थकलेल्या दिसत आहात." अभिराज म्हणाला.
"हो, आज काम थोडं हेक्टिक होतं. तू सहज फोन केला होतास का?" ऋतुजाने विचारले.
"हो, तुझा आवाज ऐकावा वाटला, म्हणून फोन केला. तुझा आवाज ऐकल्यावर माझं मन प्रसन्न होतं. काही म्हण ऋतू, पण तुझ्या आवाजात एक प्रकारची वेगळीच जादू आहे. मला हे कळत नाही की, तुझा चेहरा गोड आहे की तुझा आवाज? मी नक्की तुझ्या प्रेमात का पडलो? मला नेमकं तुझं काय आवडतं? हेच कळत नाहीये." अभिराज म्हणाला.
"अभी, तुझी नौटंकी बंद कर आणि फोन कशाला केला होता? ते सांग." ऋतुजा म्हणाली.
"मी तुझं कौतुक करतो आहे. माझं प्रेम व्यक्त करत आहे, तर तू याला नौटंकी म्हणत आहेस. माझी काही किंमतच नाही बाबा. माझं तर असं कौतुक कोणीच करत नाही." अभिराज म्हणाला.
"अभी, तू आत्ता कुठे आहेस? आणि आज ही कोणती बेअरिंग पकडली आहेस? नॉर्मल बोलणार नाहीयेस का?" ऋतुजाने विचारले.
"मी हे सगळ घरी असल्यावर बोलेल का? बाहेरच आहे. अजून घरी जायचं आहे." अभिराजने उत्तर दिले.
"आज ऑफिसमध्ये इतका वेळ थांबला होता का?" ऋतुजा म्हणाली.
"नाही. उलट आज मी ऑफिस मधून लवकर निघालो होतो. आपल्या फ्लॅटचं काम कुठंवर आलंय, हे बघायला साईटवर गेलो होतो." अभिराज म्हणाला.
"अच्छा, मग पजेशन किती दिवसात मिळेल? काही अंदाज." ऋतुजा म्हणाली.
"मेजर वर्क सगळंच झालंय. मायनर फिनिशिंग बाकी आहे. मी तुला याचसाठी फोन केला होता की, उद्या आपण दोघे फ्लॅट बघायला जाऊयात. इंटेरिअर, फर्निचरचं दोघे मिळून ठरवूयात. तू फ्लॅट बघायला अजून एकदाही आली नाहीये." अभिराजने सांगितले.
"अभी, मला फ्लॅट बघायला यायला नक्कीच आवडेल. पण त्याआधी मला एक सांग, लग्नाच्या शॉपिंगचं काय करायचं आहे? आई-बाबा माझ्या नावाने ओरडत आहेत. आज घरी सुलभा मावशी, मनोहर काका, पियू आले आहेत. उद्या त्यांच्या कपड्यांची खरेदी करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. उद्या अर्पिता वहिनीला सुट्टी असेल, सो तीही जॉईन होईल." ऋतुजा म्हणाली.
यावर अभिराज म्हणाला,
"ऋतू, उद्या मी आरतीला घेऊन तुम्हाला सगळ्यांना जॉईन होतो. आरतीची खरेदी होऊन जाईल. पंकज त्याचं त्याचं बघून घेईल. आई तिच्यासाठी आणि शीतल साठी सुरतला खरेदी करुन घेईल. राहिला प्रश्न आपल्या दोघांचा तर उद्या ज्या दुकानात आपण जाऊ, तिथलं कलेक्शन चेक करु. काही आवडलं तर तेथून खरेदी करु नाहीतर दुसरीकडे बघू. एकदा बघायला सुरुवात केली की, काहीतरी सुचेल. तसं इंटरनेटवर काही डिझाइन्स शोधून ठेवतो. तुही शोधून ठेव."
"ऋतू, उद्या मी आरतीला घेऊन तुम्हाला सगळ्यांना जॉईन होतो. आरतीची खरेदी होऊन जाईल. पंकज त्याचं त्याचं बघून घेईल. आई तिच्यासाठी आणि शीतल साठी सुरतला खरेदी करुन घेईल. राहिला प्रश्न आपल्या दोघांचा तर उद्या ज्या दुकानात आपण जाऊ, तिथलं कलेक्शन चेक करु. काही आवडलं तर तेथून खरेदी करु नाहीतर दुसरीकडे बघू. एकदा बघायला सुरुवात केली की, काहीतरी सुचेल. तसं इंटरनेटवर काही डिझाइन्स शोधून ठेवतो. तुही शोधून ठेव."
"या गडबडीत फ्लॅटचं काम बाजूला राहिलं." ऋतुजा म्हणाली.
"उद्या संध्याकाळी वेळ मिळाला तर जाऊयात, नाहीतर परवा हक्काचा रविवार आहेच." अभिराज म्हणाला.
"चालेल. मी आपल्याला कोणत्या कार्यक्रमाला कोणते कपडे घालायचे? यावर विचार करते. आपण दोघांनी शॉपिंगमध्ये इंटरेस्ट दाखवल्यावर आई-बाबांना जरा बरं वाटेल." ऋतुजा म्हणाली.
"चल मीही आता घरी जातो. उद्या सकाळचं प्लॅनिंग कसं ठरतंय? ते मॅसेज करुन सांग." अभिराजने सांगितले.
"हो. बाबांना विचारुन सांगते. बरं ऐक ना, काल आपल्याला तुझा तो मित्र रोहन भेटला होता. तो नेमकं काम काय करतो? आज रश्मी व तो त्याबद्दल बोलत होते, पण मला काही कळलं नाही. रश्मीला माझा राग आला होता, म्हणून तिने काहीच सांगितले नाही." ऋतुजाने विचारले.
"ऐक ना ऋतू, तू मला रश्मीचा फोन नंबर मॅसेज कर. रोहन बरा मुलगा नाहीये. तो कितीही चांगला वाटला, तरी तो आतून कसा आहे? हे फक्त मला माहिती आहे. रश्मीला खोटं सांगून जाळ्यात ओढण्याची त्याची तयारी सुरु असेल. मी रश्मीला बरोबर समजावतो." अभिराजने सांगितले.
"मी तुला तिचा नंबर सेंड करते. तू एकदा तिच्याशी बोलून घे. तुझं ती ऐकेल." ऋतुजा म्हणाली.
यावर अभिराज म्हणाला,
"तिला माझं ऐकावंच लागेल. बाकी दुसरा पर्याय तिच्यापुढे नाहीये. आता बराच उशीर झाला आहे. मला घरी पोहोचायला उशीर होईल. तू नंबर पाठवून ठेव. मी तिच्याशी बोलतो."
"तिला माझं ऐकावंच लागेल. बाकी दुसरा पर्याय तिच्यापुढे नाहीये. आता बराच उशीर झाला आहे. मला घरी पोहोचायला उशीर होईल. तू नंबर पाठवून ठेव. मी तिच्याशी बोलतो."
अभिराजने फोन कट केला. ऋतुजाने त्याला लगेच रश्मीचा फोन नंबर मॅसेज केला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
