अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७३
मागील भागाचा सारांश: ऋतुजा व तिच्या घरचे कपड्यांची खरेदी करण्यासाठी गेले होते. अभिराज व आरतीनेही त्यांना जॉईन केलं होतं.
आता बघूया पुढे….
खरेदी करुन सगळेच दमले असल्याने जेवायला बाहेर हॉटेलमध्ये जायचं असं ठरलं होतं. रणजीत आल्यावर एका जवळच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी सगळेजण गेले.
"आपण असे सगळेजण बऱ्याच दिवसांनी एकत्र आलो ना?" रणजीत म्हणाला.
"हो ना. आपापल्या कामांमध्ये एकत्र यायला वेळच मिळत नसतो. घरात लग्न किंवा इतर कार्यक्रम असला तरच आपण एकत्र येतो. लग्न म्हटलं की, जास्त मजा असते. विधी जास्त असतात, कामही बरीच असतात, त्यात मुलीचं लग्न म्हटलं की जबाबदाऱ्याही जास्त असतात." मनोहर काकांनी रणजीतच्या बोलण्याला दुजोरा देत सांगितले.
"काका, पण एकत्र यायला निमित्त कशाला हवं? आपण असही ठरवून एकत्र येऊच शकतो ना?" ऋतुजाने विचारले.
"येऊ शकतो, पण लग्नाच्या वेळी आपण आपली कारणं देऊ शकत नाही. इतरवेळी आज नको, उद्या नको असं होतं आणि शेवटी तो प्लॅन कॅन्सल होतो." ऋतुजाच्या बाबांनी सांगितले.
"बाबा, तुम्हाला बराच अनुभव दिसतो." रणजीत म्हणाला.
"आमच्या कॉलेजच्या मित्रांचं गेटटूगेदर बऱ्याचदा कॅन्सल झालंय. आता तर आम्ही काही ठरवतचं नाही." ऋतुजाच्या बाबांनी उत्तर दिले.
"बाबा, मित्र आणि नातेवाईकांसोबत केलेले प्लॅन कॅन्सल करणं एकवेळेस ठीक आहे, पण स्वतःच्या बायको आणि मुलासोबत केलेले प्लॅन कॅन्सल करणं, हे तुमच्या मुलाकडून शिकायला हवं.
संध्याकाळी फोन करुन रात्री बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करतील. आपण तयार होऊन वाट बघत बसायचं. अर्ध्या तासाने बाहेरुन येताना काहीतरी पार्सल घेऊन येणार आणि सांगणार की, "अर्पिता, मी जाम थकलो आहे. आपण बाहेर नंतर कधीतरी बाहेर जाऊयात."
तो नंतर कधीच उगत नाही. आता तर मी काहीच प्लॅन करत नाही." अर्पिताने सांगितले.
तो नंतर कधीच उगत नाही. आता तर मी काहीच प्लॅन करत नाही." अर्पिताने सांगितले.
"रणजीत, हे योग्य नाही बरं." बाबा म्हणाले.
"बाबा, ऐनवेळी काम वाढलं की थकायला होतं." रणजीतने स्पष्टीकरण दिले.
"वहिनींनी बरोबर विषय चालू असताना दादाची तक्रार केली." पियू हसत म्हणाली.
मग ऋतुजानेही रणजीत व अर्पिताला चिडवले.
"ये पोरींनो त्यांना चिडवू नका. रणजीत, तुला काम असतं, त्यामुळे तुला अर्पिता व आरवला वेळ देता येत नाही, हे मला मान्य आहे. पण एक लक्षात ठेव, गेलेली वेळ परत येत नाही. आरव आता पटकन मोठा होऊन जाईल. तू जर त्याला वेळ दिला नाहीस, तर त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम राहणार नाही. आता ही झाली एक बाजू. दुसरं तुमच्या दोघांमधील प्रेम टिकवून ठेवायचे असेल, तर एकमेकांसोबत वेळ घालवत चला.
आपण ऐशो आरामाचं आयुष्य जगण्यासाठी पैसे कमवण्यास प्राधान्य देतो. या सगळ्या गडबडीत आयुष्य जगतच नाही. फ्लॅट, गाडी घेतो, पण एकमेकांसाठी वेळ देत नाही. घर कसं आहे? याला महत्व नसतं, तर घरातील माणसांमध्ये किती प्रेम आहे? याला जास्त महत्व असतं.
आम्ही ज्या चुका केल्या त्या तू करु नकोस." मनोहर काकांनी रणजीतला सल्ला दिला.
"नक्कीच काका. मी तुमचं हे बोलणं कायम लक्षात ठेवेल." रणजीत म्हणाला.
इकडच्या तिकडच्या हसत खेळत गप्पा मारत जेवण झालं.
दुसऱ्या दिवशी अभिराज ऋतुजाला घ्यायला येणार असल्याने ऋतुजा लवकर उठून तयार झाली होती. पियू, सुलभा मावशी व मनोहर काकांना त्यांच्या घरी जायचे असल्याने तेही लवकर उठून तयार झाले होते.
ऋतुजाच्या घराजवळ आल्यावर अभिराजने तिला फोन करुन खाली बोलावून घेतले.
"तू वर का आला नाहीस? आई विचारत होती." ऋतुजाने अभिराजला विचारले.
"वरती आलो असतो, तर गप्पा मारण्यात टाईमपास झाला असता, मग ठरवलेली सगळी कामं आज पूर्ण झाली नसती. आता आपण पहिले डिझायनर कडे जाऊयात. तेथील काम झाल्यावर फोटोग्राफरची भेट घेऊन प्रीवेडिंग शूटची चर्चा करुयात. सगळं झाल्यावर वेळ मिळालाच तर एकदा फ्लॅट बघायला जाऊयात." अभिराज म्हणाला.
"अरे बापरे! कामांची तर लिस्ट खूपच मोठी आहे." ऋतुजा म्हणाली.
"पटकन गाडीवर बस. आपल्याकडे वेळ खूप कमी आहेत आणि कामं खूप बाकी आहेत." अभिराज गाडी चालू करता करता म्हणाला.
ऋतुजा व अभिराज ब्युटीकच्या दिशेने मार्गस्थ झाले. ब्युटीक मध्ये गेल्यावर डिझायनरने ऋतुजा व अभिराजला आवडतील असेच कपड्यांचे डिझाईन दाखवले. सिलेक्टिव्ह आणि उत्तम प्रतीचे कलेक्शन असल्याने पाहताक्षणीच ऋतुजा व अभिराज आवडले. हळद, लग्न व रिसेप्शनला काय घालायचं हे ठरवून झालं होतं.
कपड्यांच्या डिझाइन मध्ये हवे ते बदल करण्यास ऋतुजा व अभिराजने सांगितले. ब्युटीकमध्ये जवळपास अडीच ते तीन तास निघून गेले. ब्युटीक मधून बाहेर पडताना ऋतुजा म्हणाली,
"बरं झालं, कपडे फायनल करायला आपण दोघेच आलो होतो. आपल्या घरचे आपल्या सोबत असते, तर पूर्ण दिवस इथेच गेला असता."
"बरं झालं, कपडे फायनल करायला आपण दोघेच आलो होतो. आपल्या घरचे आपल्या सोबत असते, तर पूर्ण दिवस इथेच गेला असता."
"हो, म्हणूनच आपण दोघेच येऊयात हे मी ठरवलं होतं. बरं तुला भूक लागली आहे का? मला वाटतंय की, आपण काहीतरी खाऊन घेऊ, मग फोटोग्राफरकडे जाऊयात." अभिराज म्हणाला.
ऋतुजाने मान हलवून होकार दर्शवला.
जवळच असणाऱ्या कॅफेमध्ये ऋतुजा व अभिराज गेले. ऑर्डर दिल्यावर अभिराजने ऋतुजाला प्रीवेडिंग फोटोशूटच्या काही आयडिया सांगितल्या, तसेच ऋतुजानेही तिच्या डोक्यातील काही कल्पना सुचवल्या.
"काल आरती दीदी आमच्या सोबत बोअर झाल्या होत्या का?" ऋतुजाने विचारले.
अभिराज म्हणाला,
"नाही, पण तुला असं का वाटलं?"
"नाही, पण तुला असं का वाटलं?"
"चेहऱ्यावरुन त्या एवढ्या फ्रेश वाटत नव्हत्या. चेहरा वेगळच काहीतरी सांगत होता. सगळेच सोबत असल्याने मला त्यांना डायरेक्ट विचारताही आलं नाही." ऋतुजाने सांगितले.
"ऑफिसच्या कामाचा प्रेशर असेल. पहिल्यांदा नोकरी करतेय म्हटल्यावर तसं वाटेलच ना. एवढ्यात तिच्यासोबत माझं जास्त काही बोलणंच झालं नाहीये." अभिराज म्हणाला.
"असेल कदाचित. मला वेळ मिळाला की, मी त्यांना फोन करुन चौकशी करते." ऋतुजा म्हणाली.
"तेच बेटर राहील." अभिराजने सांगितले.
खाऊन झाल्यावर अभिराज व ऋतुजा कॅफेच्या बाहेर पडले. फोटोग्राफरची भेट घेऊन प्रीवेडिंग शूट बद्दल सविस्तरपणे चर्चा झाली. कपडे, तारीख, लोकेशन सगळ काही फिक्स झालं.
"अभी, आपण फ्लॅट बघायला उद्या संध्याकाळी जाऊयात का? आता मी खूप थकले आहे. उद्या मी कॅबने ऑफीसला जाते. तू संध्याकाळी मला ऑफिसला घ्यायला ये. फ्लॅट बघून झाल्यावर मला घरी सोडव." ऋतुजा म्हणाली.
"ठीक आहे, आता तुच नाही म्हणते आहेस तर तसं करु. तसाही आता बराच उशीर झाला आहे. मलाही गाडी चालवायला कंटाळा आला आहे." अभिराज म्हणाला.
अभिराजने ऋतुजाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या घरी निघून गेला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा