अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७५
मागील भागाचा सारांश: आरतीचा चेहरा उदास का वाटत होता? हे जाणून घेण्यासाठी ऋतुजाने आरतीला फोन केला. त्यामागील कारण समजल्यावर ऋतुजाने आरतीला समजावून सांगितले. पुढच्या आठवड्यात नवीन घरात शिफ्ट होण्याचा विचार रणजीत व बाबांचा आहे, असे आईने ऋतुजाला सांगितले.
आता बघूया पुढे….
रात्री नऊच्या दरम्यान ऋतुजाला रश्मीचा फोन आला.
"रश्मी, एवढ्या उशीरा फोन का केलास?" ऋतुजाने फोन उचलल्याबरोबर विचारले.
"ऋतू, नऊ तर वाजले आहे. कुठे एवढा उशीर झालाय. अरे माझ्या आत्ताशी लक्षात आले. ही वेळ तुझी अभिराज सोबत फोनवर बोलण्याची असेल ना? सॉरी मॅडम, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही." रश्मी ऋतुजाला चिडवत म्हणाली.
"तुझं चिडवून झालं असेल, तर मुद्द्यावर येशील तर बरं होईल." ऋतुजा म्हणाली.
"अभिराजने सांगितल्या प्रमाणे रोहनचा पत्ता हळूहळू कट होत आहे. रोहनचं खरं रुप अभिराजमुळे माझ्यासमोर आलं. नाहीतर मी पुरती फसले गेले असते." रश्मीने सांगितले.
"आपल्याला माणसांची पारख नाहीये, शिवाय माझ्या सारखं कोणी सांगत असेल, तर तेही ऐकायचं नसतं. सोनाराने कान टोचावे लागतात ही म्हण तुझ्या बाबतीत अगदी खरी आहे." ऋतुजा म्हणाली.
"ऋतू, माझं चुकलं ग. आता कितीवेळा तेवढंच ऐकवणार आहेस. तुझा आवाज खूप लो वाटत आहे. तब्येत बरी नाहीये का?"रश्मीने काळजीने विचारले.
"मी बरी आहे. काल आणि आज शॉपिंगमध्ये गेला, म्हणून जरा थकले आहे. पुढच्या आठवड्यात घराचं शिफ्टिंग होणार आहे. आता तो ताण वेगळाच राहणार आहे." ऋतुजाने सांगितले.
"हम्मम, आता तू आराम कर. ऑफिसमध्ये या विषयावर बोलता आलं नसतं म्हणून आत्ताच फोन करुन बोलले. बाय." एवढं बोलून रश्मीने फोन कट केला.
रश्मीचा फोन कट झाल्यावर ऋतुजाच्या बाबांनी रुमच्या दरवाजावर नॉक विचारले,
"ऋतू, आत येऊ का?"
"ऋतू, आत येऊ का?"
दरवाजाकडे बघून ऋतुजा म्हणाली,
"बाबा, परमिशन कसली घेताय? या ना."
"बाबा, परमिशन कसली घेताय? या ना."
"कोणाच्याही रुममध्ये जाण्याआधी परवानगी घ्यायची असते. ते जाऊदेत, मी जे बोलायला आलो होतो, ते राहूनच जाईल. तुला तुझ्या आईने कल्पना दिली असेलचं की, पुढच्या आठवड्यात आपल्याला नवीन घरात शिफ्ट व्हायचं आहे म्हणून." ऋतुजाचे बाबा म्हणाले.
"बाबा, खूपच घाई होईल. कपाटातील कपड्यांकडे आणि रुममधील सामानाकडे बघितलं, तरी हे कसं आवरुन न्यायचं, याच दडपण आलंय." ऋतुजाने सांगितले.
"दडपण घेण्याची आवश्यकता नाहीये. जे सामान, कपडे दररोज लागणारं असेल, तेवढं सामान आणि कपडे सध्या तिकडे घेऊन जायचे. तुझं लग्न होईपर्यंत हे घर भाड्याने देणार नाही, त्यामुळे काही सामान इकडे राहिलं तरी काही फरक पडत नाही. तुला हेच सांगायला आलो होतो." ऋतुजाचे बाबा म्हणाले.
ऋतुजा काही बोलणार एवढ्यात तिचा मोबाईल वाजला.
"अभिराजचा फोन असेल ना, घे. मी जातो." एवढं बोलून तिचे बाबा रुममधून बाहेर पडले.
बाबा गेल्यावर ऋतुजाने फोन उचलला.
"हॅलो ऋतू, बिजी आहेस का?" अभिराजने विचारले.
"नाही, बोल ना." ऋतुजाने उत्तर दिले.
"मग फोन उचलायला एवढा वेळ का लावलास?" अभिराजचा पुढील प्रश्न.
"रुममध्ये बाबा होते, त्यांच्या सोबत बोलत होते. ते रुममधून बाहेर पडल्यावर फोन उचलला." ऋतुजाने सांगितले.
"बरं, तुझा आवाज एवढा लो का आहे?" अभिराजने लागोपाठ तिसरा प्रश्न विचारला.
"अभी, किती प्रश्न विचारशील? आता सगळं ऐकून घे, म्हणजे तुझा जीव शांत होईल. पुढच्या आठवड्यात नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याचा विचार बाबा आणि रणजीत दादा करत आहेत. आई नाही म्हणतेय, पण ते दोघेजण काही ऐकणार नाहीत. आता तिकडे शिफ्ट व्हायचं म्हटल्यावर इकडचं पॅकिंग म्हणजे डोक्याला ताप आहे. शिवाय या घरासोबत इमोशनल अटॅचमेंट आहे, तो त्रास वेगळाच होईल." ऋतुजाने भरलेल्या आवाजात सांगितले.
"अच्छा, असं आहे तर. तसंही लग्न झाल्यावर तुला दोन्ही घरं सोडून माझ्या घरी यावेच लागणार आहे." अभिराज म्हणाला.
"अभी, तेव्हा मनाची तयारी असते. ते जाऊदेत, आपला उद्याचा प्लॅन फिक्स आहे ना?" ऋतुजाने विचारले.
"अग, मी तेच सांगायला फोन केला होता. उद्या दुपारी हर्षलचा भाऊ त्याचं सामान घेऊन जायला येणार आहे. मी ते विसरुनचं गेलो होतो. आता काही वेळापूर्वी त्याचा फोन आला होता, तेव्हा मला आठवलं. उद्या आपल्याला फ्लॅटवर जाणं शक्य होणार नाही." अभिराजने सांगितले.
"ओके, चालेल. आपल्या प्रीवेडिंग फोटोशूटची तारीख फिक्स करायची राहून गेलीय." ऋतुजा म्हणाली.
"हो. तुमच्या घराचं शिफ्टिंग कसं होणार आहे? शिवाय पुजा वगैरे कधी असणार आहे? याबद्दल एकदा दादा आणि बाबांना विचारुन घे. मग आपण तेही ठरवून टाकूयात." अभिराजने सुचवले.
"हो, चालेल. हर्षलच्या भावाला उलटसुलट प्रश्न विचारत बसू नकोस." ऋतुजाने सांगितले.
"नाही ग. तेवढं मलाही कळतं. शेवटी त्याचाही भाऊ गेला आहे. हर्षल शुद्धीत आल्यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला? हे फक्त मला जाणून घ्यायचे आहे." अभिराज म्हणाला.
"तुला तो प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, पण भावनेच्या भरात अति काहीतरी बोलून जाशील, म्हणून सांगितलं." ऋतुजा म्हणाली.
यावर अभिराज म्हणाला,
"हो ग. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळाला आहे. डोन्ट वरी मी जास्त काही बोलणार नाही. तू आरतीला फोन केला होतास का?"
"हो ग. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळाला आहे. डोन्ट वरी मी जास्त काही बोलणार नाही. तू आरतीला फोन केला होतास का?"
"हो, केला होता. फार काही विशेष नाहीये. त्यांच्या भूतकाळातील विचार त्यांच्या डोक्यात डोकवत राहतात. मी त्यांना समजावून सांगितलं आहे." ऋतुजाने सांगितले.
"हम्मम, तू तिच्याशी बोललीस हे बरं केलंस." अभिराज म्हणाला.
"बरं चल, मी फोन ठेवते. उद्या कोणता ड्रेस घालायचा आहे? हे ठरवून त्याला इस्त्री करुन ठेवायची आहे." ऋतुजाने बोलून फोन कट केला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
