अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७६
मागील भागाचा सारांश: रोहनचा पत्ता कट करण्यात चैतालीला हळूहळू यश येत आहे, हे तिने ऋतुजाला फोन करुन सांगितले. हर्षलचा भाऊ येणार असल्याने ऋतुजाला घेऊन फ्लॅटवर जाण्याचा प्लॅन अभिराजने कॅन्सल केला.
आता बघूया पुढे….
"पंकज, आज सकाळी लवकर उठून कुठे जाण्याची तयारी सुरु आहे?" पंकज घाईघाईने पायात सॉक्स घालत असताना अभिराजने विचारले.
"दादा, आज एका एम एन सी कंपनीत इंटरव्ह्यू आहे. क्लासच्या सरांनी माझी तिथे शिफारस केली आहे. लेखी एक्साम मी क्लिअर केली आहे. आज इंटरव्ह्यू क्लिअर झाला म्हणजे मिळवलं." पंकजने हातात फाईल घेऊन चेक करता करता सांगितले.
"अरे वा, हे तर भारीच झालं. तू आजचा इंटरव्ह्यू नक्कीच क्लिअर करशील. ऑल द वेरी बेस्ट." अभिराजने पंकजच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
"पंकज, काही खाऊन जाशील का?" आरतीने किचन मधून बाहेर येऊन विचारले.
"नाही, नको ताई. तिथे वेळेत पोहोचायला हवं. वेळ मिळाला तर त्या कंपनीतील कॅन्टीन मध्ये मी खाऊन घेईल." पंकजने घाईघाईत उत्तर दिले.
"आरती, पंकजला दही साखर दे. आज आपल्या भावाला नोकरी लागणार आहे. रात्री मस्त सेलिब्रेट करु." अभिराज म्हणाला.
आरती दही साखर घेण्यासाठी किचनमध्ये गेली.
"दादा, माझ्याकडून अतिअपेक्षा ठेवू नकोस. मला आधीच इंटरव्ह्यूचे टेन्शन आले आहे, त्यात तुझ्या अपेक्षा ऐकून अजून टेन्शन येत आहे." पंकज म्हणाला.
पंकजच्या हातावर दही साखर देत आरती म्हणाली,
"पंकज, तू आजचा इंटरव्ह्यू नक्की क्लिअर करशील. तुला ही नोकरी मिळणार म्हणजे मिळणारचं."
"पंकज, तू आजचा इंटरव्ह्यू नक्की क्लिअर करशील. तुला ही नोकरी मिळणार म्हणजे मिळणारचं."
"पंकज, इंटरव्ह्यूला जाण्याआधी कोपऱ्यावरील मंदिरात जाऊन दर्शन घे. कुठलंही शुभ काम करण्याआधी देवाचा आशिर्वाद घ्यावा, असे आपले आई-बाबा म्हणतात." अभिराजने सांगितले.
पंकजने मान हलवून होकार दर्शवला.
पाठीवर बॅग घेऊन पायात शूज घालून पंकज निघणार एवढ्यात त्याच्या डोक्यात काहीतरी आले, म्हणून त्याने शूज काढून ठेवले. अभिराज जवळ जाऊन तो त्याच्या पाया पडून म्हणाला,
"दादा, आज देवाच्या आशिर्वादाची गरज आहेच, पण तुझ्या आशिर्वादाची त्यापेक्षा जास्त गरज आहे."
पाठीवर बॅग घेऊन पायात शूज घालून पंकज निघणार एवढ्यात त्याच्या डोक्यात काहीतरी आले, म्हणून त्याने शूज काढून ठेवले. अभिराज जवळ जाऊन तो त्याच्या पाया पडून म्हणाला,
"दादा, आज देवाच्या आशिर्वादाची गरज आहेच, पण तुझ्या आशिर्वादाची त्यापेक्षा जास्त गरज आहे."
पंकजच्या पाठीवर जोरात थाप मारुन अभिराज म्हणाला,
"भावा, माझा आशिर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. यशस्वी भव."
"भावा, माझा आशिर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. यशस्वी भव."
आरती तिथेच उभी होती. पंकजने आरतीच्या पायावर डोकं टेकवून तिचाही आशिर्वाद घेतला. मगच तो घराबाहेर पडला. पंकज बाहेर गेल्यावर अभिराज आरतीकडे बघून म्हणाला,
"पंकज, मोठा झाल्यासारखा वाटतो ना?"
"पंकज, मोठा झाल्यासारखा वाटतो ना?"
"हो, बऱ्यापैकी त्याच्यात समजदारी आली आहे. अजय सोबत तुझं काही बोलणं झालं का?" आरतीने विचारले.
"नाही, त्याचाही फोन आला नाही आणि मीही केला नाही." अभिराजने उत्तर दिले.
"दादा, तू मोठा आहेस. तुच मोठया मनाने त्याला फोन करायला पाहिजे." आरती म्हणाली.
"आरती, सध्या माझ्या डोक्यात बऱ्याच बाकीच्या गोष्टी चालू आहेत. अजयला फोन करेल, पण लगेच नाही." अभिराजने सांगितले.
"दादा, काही टेन्शन आहे का? तू हल्ली फारसं काही बोलतही नाही." आरतीने काळजीने विचारले.
"आरती, टेन्शन असं नाही, पण दोन महिन्यांनी माझं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीच टेन्शन आहेच, शिवाय फ्लॅटचं इंटेरिअर करुन झालं पाहिजे. एक मुलगी माझ्यावर विश्वास ठेवून या घरात येणार आहे. तिचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. ती माझ्यावर नाराज झाली नाही पाहिजे.
ऋतू समजदार आहे, पण तिच्याही काही अपेक्षा असतीलच ना? मला त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. ऋतूला खुश ठेवायचं आहे. पैश्यांची जुळवाजुळव करुन ठेवावी लागेल. त्यात आज हर्षलचा भाऊ भेटणार आहे, त्यामुळे थोडं मन नाराज आहे." अभिराजने सांगितले.
"दादा, तू सगळं काही व्यवस्थित करशील. हर्षलची आठवण येणं हे स्वाभाविक आहे, पण जास्त विचार करु नकोस. बरं चल मी पटकन आवरते. आपल्या दोघांनाही उशीर व्हायला नको." आरती बोलून किचनमध्ये निघून गेली.
अभिराज आपलं आवरण्यासाठी रुममध्ये निघून गेला.
अभिराजने ऑफिसमध्ये हाफ डे सुट्टी टाकली होती. दुपारपर्यंत काम करुन ऑफिस मधून तो हर्षलच्या रुमवर डायरेक्ट गेला होता. हर्षलचा भाऊ एव्हाना रुमवर येऊन सामानाची आवरासावर करत होता. अभिराजने पार्किंगमध्ये गाडी लावली, तेव्हा त्याचं लक्ष हर्षलची गाडी ज्या ठिकाणी लावायचा त्या जागेवर गेली. पार्किंग मध्ये बसून हर्षल व अभिराज तासनतास गप्पा मारत होते. सगळं काही अभिराजच्या डोळ्यासमोरुन झरकन गेलं.
अभिराज मध्ये पायऱ्या चढून हर्षलच्या रुममध्ये जाण्याचे बळ नव्हते. तिथे गेलं की, हर्षलच्या आठवणी अजून उफाळून येणार होत्या. हर्षलचा भाऊ आलाय, म्हणून त्याला जाणे अनिवार्य होते. एकेक पाऊल टाकत जड पावलाने अभिराज हर्षलच्या रुमच्या दिशेने जात होता.
"दादा, सगळं आवरुन झालं का?" अभिराजने आतमध्ये जात विचारले.
"हे काय आवरतोच आहे. आता ह्या वस्तूंचं काय करावं? हेही कळत नाहीये. अश्याच इथे सोडूही शकत नाही आणि घरी घेऊन गेल्यावर वस्तूंकडे बघून त्याची आठवण येत जाईल." हर्षलच्या भावाला बोलता बोलता भरुन आले होते.
अभिराजने रुममध्ये चौफेर नजर टाकली. सगळं सामान बघून त्यालाही भरुन आले होते. अभिराजने एक खोल श्वास घेऊन आवंढा गिळला. तो हर्षलच्या भावाजवळ गेला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून अभिराज म्हणाला,
"दादा, असं इमोशनल होऊन कसं चालेल? हर्षल आपल्यात नाहीये, हे कटू सत्य आपण स्विकारायला हवं. तू म्हणालास म्हणून मी इकडे आलो, नाहीतर माझे पाय इकडे वळत सुद्धा नव्हते."
"दादा, असं इमोशनल होऊन कसं चालेल? हर्षल आपल्यात नाहीये, हे कटू सत्य आपण स्विकारायला हवं. तू म्हणालास म्हणून मी इकडे आलो, नाहीतर माझे पाय इकडे वळत सुद्धा नव्हते."
"अभिराज, तो गेलाय याचं वाईट वाटण्यापेक्षा तो माझ्यामुळे गेला, याचं जास्त वाईट वाटत असतं. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. मीच माझ्या भावाला मारलं." हर्षलचा भाऊ ढसाढसा रडायला लागला.
अभिराजला हर्षलच्या भावाच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. अभिराज त्याच्याकडे आ वासून बघत होता.
हर्षलचा भाऊ असा का बोलतो आहे? हे बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
