अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८४
मागील भागाचा सारांश: ऋतुजा शरयूच्या आईकडे केळवणासाठी गेली असता दोघींमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. रश्मीकडेही ऋतुजा केळवणाला गेली होती.
आता बघूया पुढे….
संध्याकाळी ऑफिस मधील काम आटोपून ऋतुजा पार्किंग मध्ये आली, तर तिच्या गाडीच्या बाजूला अभिराज उभा होता. अभिराजला अचानक समोर बघून तिला आश्चर्य वाटले.
"अभी, तू इथे काय करतो आहेस?" ऋतुजाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
"आपण बाजूच्या कॅफेत जाऊन बोलू शकतो ना." अभिराज म्हणाला.
ऋतुजाने मान हलवून होकार दर्शवला. अभिराज त्याची गाडी चालू करून पुढे निघून गेला. ऋतुजाही आपली गाडी घेऊन त्याच्या मागोमाग कॅफेच्या दिशेने गेली. कॅफेत गेल्यावर ऋतुजा व अभिराजने कॉफी ऑर्डर केली.
"अभी, असा अचानक का आलास? सगळं काही ठीक आहे ना?" ऋतुजाने विचारले.
"ऋतू, सगळं ठीक आहे. असंच तुला भेटावं वाटलं, म्हणून आलो." अभिराजने उत्तर दिले.
"मला वाटलं काहीतरी घडलं आहे की काय म्हणून. तुझा चेहरा बघून तरी असंच वाटतंय." ऋतुजा म्हणाली.
"कामाचा थकवा चेहऱ्यावर दिसत आहे. बाकी काही नाही." अभिराजने सांगितले.
"सुरतला कधी जाणार आहेस?" ऋतुजाने विचारले.
"परवा जाईल. काही नातेवाईकांकडे मला स्वतः जाऊन आमंत्रण द्यावे लागणार आहे. आमच्याकडे तशी पद्धतचं आहे." अभिराजने उत्तर दिले.
"तू सगळ्यांकडे जा, पण तब्येतीची काळजी घे. ऐन लग्नाच्या वेळी तब्येत बिघडायला नको." ऋतुजा काळजीने म्हणाली.
"हो. लग्नाच्या घाईगडबडीत तब्येतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लग्नासोबत आपलं हनिमून सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे." अभिराज मिश्किल हसून म्हणाला.
"आपण हनिमूनला कुठे जाणार आहोत? ते तू सांगितलंच नाहीस." ऋतुजाने विचारले.
"ते तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे." अभिराजने उत्तर दिले.
"भारतात जाणार आहोत की भारताबाहेर हे तर सांग. माझ्या हातात फक्त तू कपड्यांची लिस्ट टेकवली आहेस. कुठे जाणार आहोत? ते सांगितलं सुद्धा नाही." ऋतुजा नाक फुगवून म्हणाली.
"ऋतू, तू कितीही रुसण्याचं नाटक केलं, तरी मी सरप्राईज सांगणार नाही. ही आपली शेवटची डेट असणार आहे." अभिराज म्हणाला.
"शेवटची म्हणजे?" ऋतुजाला प्रश्न पडला होता.
"म्हणजे लग्नाआधीची शेवटची. परवा सुरतला जाणार आहे, तर आपली भेट डायरेक्ट हळदीला होईल. त्यानंतर आपण जेव्हाही कधी बाहेर जेवायला किंवा कॅफेत जाऊ तेव्हा नवरा-बायको म्हणून जाऊ.
त्यावेळी आपल्यात गप्पा वेगळ्या होतील. आज भाजी काय करायची? किराणा संपला आहे. घरी जाताना दूध घेऊन जायचं आहे. यासारखे वेगळे विचार डोक्यात असतील." अभिराज हसून म्हणाला.
"अच्छा. तू या अर्थाने बोलतो आहेस तर… आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलणार आहे. आपलं लग्न होण्यासोबतचं आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तेव्हा सगळंच काही वेगळं असेल." बोलताना ऋतुजाच्या चेहऱ्यावर स्माईल होती.
"मिस ऋतुजा प्रमोद सोनवणे लग्नानंतर मिसेस ऋतुजा अभिराज काळे होणार आहेत. ऋतू, हा एका मुलीच्या आयुष्यातील किती मोठा बदल असतो ना? तुम्हा मुलींना तुमचं नाव बदलावं लागतं. तुमचं घर बदलतं. तुमचा पत्ता बदलतो. आम्हा मुलांचं एवढं काही बदलत नाही." अभिराज म्हणाला.
"मुलावर अजून एका व्यक्तीची जबाबदारी पडते. एका मुलीला आयुष्यभर सांभाळावे लागते. आई आणि बायकोमध्ये दुवा बनावे लागते. थोडक्यात काय तर आपल्या दोघांचं सगळंच काही बदलणार आहे." ऋतुजा म्हणाली.
कॉफी पिऊन झाल्यावर ऋतुजा म्हणाली,
"अभी, आता आपण निघूयात का? घरी जायला उशीर होईल."
"अभी, आता आपण निघूयात का? घरी जायला उशीर होईल."
"हो, जाऊयात ना. पण त्याआधी एक छानसा फोटो काढूयात. पुढे जाऊन हे फोटो बघताना जाम भारी वाटेल." अभिराज म्हणाला.
ऋतुजा व अभिराजने सेल्फी काढला. कॅफेतून बाहेर पडल्यावर ऋतुजा व अभिराज आपापल्या घराच्या दिशेने निघून गेले.
बघता बघता दिवस भुर्रकन निघून गेले होते. हळदीच्या दिवशी अभिराज, त्याच्या घराचे व काही नातेवाईक एका ट्रॅव्हल्सने पुण्याला यायला निघाले होते. ऋतुजाच्या घरीही लगीनघाई सुरु होतीच. हॉलवर जाण्याच्या तयारीत सगळेजण होते. ऋतुजा तिची सामानाची बॅग भरत होती.
"ऋतू, आठवणीने सगळं बॅगमध्ये भरलं आहे ना?" अर्पिताने रुममध्ये येऊन विचारले.
"हो वहिनी. जवळपास सगळंच सामान आठवण करुन भरलं आहे. तुम्ही माझ्यासोबत करवली म्हणून येणार आहात ना? तुमचीही बॅग भरावी लागली असेल." ऋतुजा म्हणाली.
"हो, मी आणि पियू तुमच्या सोबत सुरतला येणार आहोत. आमचं सामान इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण तुमचं व्हायला नको." अर्पिताने सांगितले.
ऋतुजा व अर्पिताच्या गप्पा सुरु असताना ऋतुजाची आई रुममध्ये येऊन म्हणाली,
"ऋतू, घरातून निघताना देवाच्या पाया पडून निघ. अर्पिता, इथे गप्पा मारत बसू नकोस. सुलभा मावशीला जाऊन मदत कर."
"ऋतू, घरातून निघताना देवाच्या पाया पडून निघ. अर्पिता, इथे गप्पा मारत बसू नकोस. सुलभा मावशीला जाऊन मदत कर."
अर्पिता घाईने बाहेर निघून गेली. ऋतुजाची आई तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाली,
"ऋतू, आपल्याला ह्या दोन दिवस निवांत बोलता येणार नाही. उद्या लग्न झाल्यावर तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील, तेव्हा तुझ्या मनात बरेच विचार येत राहतील. तिकडे गेल्यावर गांगरून जायचं नाही. ते आता तुझंही घर असणार आहे. सगळ्या पाहुण्यांशी हसून बोलायचं. घाबरायचं नाही.
"ऋतू, आपल्याला ह्या दोन दिवस निवांत बोलता येणार नाही. उद्या लग्न झाल्यावर तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील, तेव्हा तुझ्या मनात बरेच विचार येत राहतील. तिकडे गेल्यावर गांगरून जायचं नाही. ते आता तुझंही घर असणार आहे. सगळ्या पाहुण्यांशी हसून बोलायचं. घाबरायचं नाही.
उद्यापासून तुझं आयुष्य बदलणार आहे. बायको, सून, वहिनी, काकू, मामी ही नाती तुझ्या आयुष्यात ऍड होतील. एकाचवेळी अनेक नाती निभवावी लागणार आहे. इकडे पुण्यात आल्यावर तुझा एवढा गोंधळ उडणार नाही, पण तिकडे दोन दिवस असताना तुला बऱ्याच नातेवाईकांना सामोरे जावे लागणार आहेत. मनात असणारा गोंधळ चेहऱ्यावर दाखवू नकोस. कॉन्फिडन्ट रहायचं."
"हो, आई. सगळं माझ्या लक्षात आलं आहे." ऋतुजा म्हणाली.
"बरं चल, बाहेर काय सुरु आहे? ते बघून येते." आई बोलून बाहेर निघून गेली.
"डोळ्यातील पाणी माझ्यापुढे दाखवायचं नव्हतं, म्हणून कामाचं कारण सांगून निघून गेलीस."ऋतुजा मनातल्या मनात म्हणाली.
पुढील काही वेळाने ऋतुजा व तिच्या घरचे कार्यालयात पोहोचले होते. सुरत वरुन ट्रॅव्हलही कार्यालयात येऊन पोहोचली होती. हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु झाली होती.
'आधी हळद लागली अभीला,
उष्टी हळद लागली ऋतूला,
दोघांच्या गाली चढली लाली,
लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.'
उष्टी हळद लागली ऋतूला,
दोघांच्या गाली चढली लाली,
लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.'
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
