अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८५(अंतिम)
मागील भागाचा सारांश: ऋतुजा व अभिराजला हळद लागली होती.
आता बघूया पुढे…..
हळदीचा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांची जेवणं झाली. ऋतुजा व अभिराजचं फोटोशूट झालं होतं. सगळेजण एकत्र एका ठिकाणी जमा झालेले होते. पंकज उठून उभा राहिला, त्याने आपल्या हातात माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
"सगळ्यांनी प्लिज माझ्याकडे लक्ष द्या. मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, याला नेमकं काय सांगायचं असेल बरं?
मला थोडं माझ्या अभी दादा बद्दल बोलायचं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय असतो ना. आपल्या सगळ्यांच्या मनात घरातील एकमेकांबद्दल प्रेम असतं, पण आपण ते व्यक्त कधीच करत नाही. आज मला माझ्या दादाबद्दल काय वाटतं? हे सांगायचं आहे.
तुमच्यापैकी बरेचजण मला लहानपणापासून ओळखत आहात. मी एक मस्तीखोर मुलगा होता. मला शाळा, अभ्यास हे काहीच आवडत नव्हते. बाबांना घाबरुन मी शाळेत जायचो. मला दहावीला फक्त ३५% मार्क्स होते. ते मार्कशीट बघितल्यावर हा मुलगा पुढे काही शिकणार नाही, असं आई-बाबांचं मत पडलं.
मात्र त्यावेळी अभी दादाने आई-बाबांना व मला शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. दादाला माहीत होतं की, सुरतला राहून माझं शिक्षण होणार नाही. मला अकरावीला धुळ्याला ऍडमिशन घेऊन दिलं, तिथेच होस्टेलला राहून माझं अकरावी ते इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण झालं. शिकताना मला आलेली प्रत्येक अडचण दादाने सोडवली होती.
आज दादा नसता, तर हा पंकज इंजिनिअर झाला नसता आणि त्याला एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी लागली नसती. दादा, थँक् यू सो मच."
अभिराजने पंकजला जाऊन मिठी मारली.
पंकज कडील माईक आरतीने हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली,
"पंकजने अभी दादाबद्दल जवळपास सगळंच सांगितलं आहे. दादा आम्हा सगळ्या भावंडांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा की, आपला दादा तर खूप चांगला आहे, तो आपली नेहमीच काळजी घेत राहिलं. पुढे जाऊन दादाचं लग्न झाल्यावर वहिनीला आम्ही कोणीच आवडलो नाही, तर दादा व आमच्यात दुरावा येईल.
लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, हे काही खोटं नाही. दादा व ऋतू एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. आता काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ येऊन गेलं, त्या वादळात ऋतू जर माझ्यासोबत नसती, तर मी आज हातात माईक घेऊन बोलताना कोणीच बघू शकलं नसतं. माझं काय झालं असतं? हे मीही सांगू शकत नाही. ऋतू, तू बेस्ट वहिनी आहेस."
आरती नंतर अजय बोलला. अजय नंतर ऋतुजाचा भाऊ रणजीत, अर्पिता वहिनी, रश्मी, शरयू थोडं थोडं ऋतुजा बद्दल बोलल्या. सगळ्यांनी केलेलं कौतुक ऐकून अभिराज व ऋतुजाचे डोळे भरुन आले होते.
ऋतुजाने डोळे पुसून हातात माईक घेतला व ती म्हणाली,
"खरंतर माझ्याकडे बोलायला आज काही शब्दच नाहीयेत. रणजीत दादाने आमच्या लहानपणीच्या आठवणी आठवून मला त्या जगात तो घेऊन गेला. अर्पिता वहिनी सोबतचे पहिले दिवस आठवले. शरयू आणि रश्मीने आमच्या मैत्रीबद्दल सांगितलं.
"खरंतर माझ्याकडे बोलायला आज काही शब्दच नाहीयेत. रणजीत दादाने आमच्या लहानपणीच्या आठवणी आठवून मला त्या जगात तो घेऊन गेला. अर्पिता वहिनी सोबतचे पहिले दिवस आठवले. शरयू आणि रश्मीने आमच्या मैत्रीबद्दल सांगितलं.
सगळ्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. एवढं कौतुक कधी ऐकण्याची सवय नाहीये, त्यामुळे जास्त भरुन आलंय. सगळ्यांचे मनापासून आभार. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकणार नाही."
ऋतुजाने आपल्या हातातील माईक अभिराजच्या हातात दिला.
"मला सुद्धा जास्त काही बोललं जाणार नाहीये. पंकज, आरती, अजय जे बोलले की कायम त्यांच्या सोबत उभा असतो, तर मला एवढंच सांगायचं आहे की, ते माझं कर्तव्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते सगळेजण माझं ऐकतात, मला मोठ्या भावाचा मान देतात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
पंकजला मी मार्ग दाखवण्याचे काम केले, त्यावर त्याने कष्ट केले आणि तो पुढे चालत राहिला. एरवी नॉनस्टॉप बडबड करणारा मी आज काय बोलावं? हेच मला सुचत नाहीये."
लग्नाचे विधी सकाळी लवकर सुरु होणार असल्याने वडीलधाऱ्या मंडळींनी झोपण्याचा हुकूम सोडला. ऋतुजाला लग्नाच्या विचारांनी झोप काही लागली नव्हती.
"लग्नघटिका समीप आली,
मनाची तगमग वाढली."
मनाची तगमग वाढली."
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेचजण झोपेतून लवकर उठले. ऋतुजाची पार्लरवाली लवकरच आली होती. ऋतुजाचे सौंदर्य हिरव्या शालूमध्ये अजूनच खुलून दिसत होते. पार्लरवालीने मेकअप सुद्धा साधा सोबर केला होता. ऋतुजाचे रुप खुलले होते.
अभिराज तयार होऊन मिरवण्यासाठी गेला होता. मिरवणूक झाल्यावर अभिराज ऋतुजाची वाट बघत कार्यालयाच्या गेटमध्ये उभा होता. ऋतुजाला बघून तो एका जागीच थबकला होता. ऋतुजा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली, तरी त्याचे लक्ष तिच्यावरुन बाजूला होत नव्हते.
"जिजू, दीदीकडे असेच बघत राहिलात, तर मुहूर्ताची वेळ टळून जाईल." पियू हसून बोलल्यावर अभिराज ध्यानावर आला होता.
ऋतुजाचा हातात हात घेऊन अभिराज स्टेजच्या दिशेने एकेक पाऊल टाकत होता.
"लग्न लागले,
मंगलाष्टके कानी पडले,
अक्षतांनी अंग भिजले,
ऋतुजा अभिराज एक झाले."
मंगलाष्टके कानी पडले,
अक्षतांनी अंग भिजले,
ऋतुजा अभिराज एक झाले."
लग्नाचे एकेक विधी पार पडत होते. अभिराज ऋतुजाच्या कानात हळूच म्हणाला,
"ऋतू, तू माझ्यासाठी जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहेस. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाहीये."
"ऋतू, तू माझ्यासाठी जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहेस. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाहीये."
ऋतुजाच्या भिरभिरणाऱ्या मनाला तेवढे शब्द पुरेसे होते.
अग्निभोवती हातात हात घेऊन ऋतुजा व अभिराजने सात वचनं घेतली होती. सप्तपदी झाल्यावर ऋतुजा व अभिराजला जेवणासाठी घेऊन जाण्यात आले.
ऋतुजा व अभिराजला एकमेकांना नाव घेऊन घास भरवायला सांगण्यात आले.
"लग्नाच्या पंगतीत घेतला उखाणा खास
अभिराजच्या घशात अडकला घास."
अभिराजच्या घशात अडकला घास."
आता नाव घेण्याची वेळ अभिराजची होती,
"पंचपक्वनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ऋतुजाचं नाव घ्यायला कसले आढेवेढे."
लग्नाचे सर्व विधी उरकल्यावर पाठवणीची वेळ झाली होती. डीजे वाल्याने बॅकग्राऊंडला 'बाबुल की दुवाये' ह्या गाण्याचं म्युजिक लावलं होतं. ते ऐकून ऋतुजा व तिच्या घरच्यांना जास्त भरुन येत होते.
ऋतुजा आई-बाबांच्या गळ्यात पडून खूप रडली होती. कधीही डोळयात पाणी न आणणारा तिचा रणजीत दादा ढसाढसा रडला होता.
रणजीतने ऋतुजाचा हात अभिराजच्या हातात दिला आणि दोन्ही हात जोडून माझ्या बहिणीला सांभाळा हे नजरेनेच सांगितले.
ऋतुजा अभिराजचा हात धरुन त्याच्या गाडीत बसली.
ऋतुजा व अभिराजच्या सहजीवनाची सुरुवात झाली.
समाप्त.
ऋतुजा व अभिराजच्या अरेंज कम लव्ह मॅरेजचा प्रवास तर आपण बघितला. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट करुन कळवा. तसेच ऋतुजा व अभिराजचा पुढील प्रवास बघायला आवडेल का? तेही सांगा.
धन्यवाद.
धन्यवाद.
©®Dr Supriya Dighe
