अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग १५
मागील भागाचा सारांश: रश्मीच्या फोनने ऋतुजा झोपेतून जागी झाली. रश्मीला बघायला मुलगा येणार असल्याने तिला ऋतुजाच्या शुभेच्छांची गरज पडणार होती. अभिराजला घरी यायला दोन तास आहेत, हे कळल्यावर ऋतुजाची धांदल उडाली होती.
आता बघूया पुढे….
ऋतुजा सगळ्या बॅग पुन्हा पुन्हा चेक करत होती. ऋतुजाची अवस्था बघून अर्पिताला हसायला येत होते.
"ऋतू, तुमचं काही सामान राहिलं, तरी मी किंवा रणजीत आणून देतील. त्या निमित्ताने तुम्हाला घरीही येता येईल. पुण्यातल्या पुण्यातच राहणार आहात. जास्त दूर जाणार नाहीयेत." अर्पिता न राहवून बोलली.
"वहिनी, हे सगळं मला कळतंय, पण नर्व्हस झाल्यासारखं वाटतंय. भीती आणि आनंद ह्या सगळ्यांचं मिश्रण झाल्यासारखं वाटत आहे." ऋतुजाचा कंठ दाटून आला होता.
अर्पिता ऋतुजाला जवळ घेऊन म्हणाली,
"ऋतू, तुमच्या मनाची अवस्था मला समजते आहे. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीची स्थिती अशीच असते. आता जे काही स्पेशल क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत, ते जगून घ्या. हे क्षण पुन्हा येणार नाही."
"ऋतू, तुमच्या मनाची अवस्था मला समजते आहे. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीची स्थिती अशीच असते. आता जे काही स्पेशल क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत, ते जगून घ्या. हे क्षण पुन्हा येणार नाही."
ऋतुजाने मान हलवली.
"मी स्वयंपाक घरातून डोकावून येते. तुम्ही रिलॅक्स व्हा." अर्पिता बोलून रुममधून निघून गेली.
ऋतुजा मोबाईल घेऊन टाईमपास करत बसली होती. ऋतुजा कानात हेडफोन टाकून तिचे आवडते गाणे डोळे मिटून ऐकत बसली होती.
दरवाजावरील बेल वाजली. ऋतुजाच्या बाबांनी दरवाजा उघडला, तर अभिराज आला होता. ऋतुजाच्या बाबांनी त्याचे हसून स्वागत केले. अर्पिताने त्याला पाणी आणून दिले. अभिराजने आरवला उचलून घेतले. ऋतुजाच्या बाबांमध्ये व अभिराज मध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अभिराजचे काका कसे एक्सपायर झाले, याची चौकशी त्यांनी केली.
"अर्पिता, अग ऋतूला बोलावं. ती रूममध्ये काय करते आहे?" ऋतुजाचे बाबा म्हणाले.
अर्पिता रूममध्ये जायला निघणार तेवढ्यात अभिराज म्हणाला,
"मी जाऊ का?"
"मी जाऊ का?"
अर्पिताने हसून होकारार्थी मान हलवली.
ऋतुजा गाणं एकदम मन लावून ऐकत होती.
मुझे कहना-कहना तुझसे है कहना
रहना-रहना तेरे दिल मे रहना
जाने जान अब दर्द-ए-जुदाई
सहना-सहना मुझको नही सहना
रहना-रहना तेरे दिल मे रहना
जाने जान अब दर्द-ए-जुदाई
सहना-सहना मुझको नही सहना
कहना है, कहना है
आज तुझसे कहना है
रहना है, रहना है
तेरे दिल मे रहना है
बेकरार दिन है प्यासी रैना है
एक पल कही ना मुझको चैना है
आज तुझसे कहना है
रहना है, रहना है
तेरे दिल मे रहना है
बेकरार दिन है प्यासी रैना है
एक पल कही ना मुझको चैना है
किसने किया है जादू
होने लगी हूं बेकाबू
मै बन के दिवानी फिरती हूँ
क्यूँ, मैं तो ना जानू
कहना है, कहना है….
होने लगी हूं बेकाबू
मै बन के दिवानी फिरती हूँ
क्यूँ, मैं तो ना जानू
कहना है, कहना है….
ऋतुजा गाणं ऐकण्यात इतकी व्यस्त झाली होती की, अभिराज तिच्या समोर जाऊन उभा राहिला, तरी तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. ऋतुजाच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून अभिराजला खूप भारी वाटत होतं. तो तिच्याकडे एकटक बघत होता. तो हळूच ऋतुजाजवळ जाऊन तिच्या समोर बसला, तिने डोळे मिटलेले असल्याने तिच्या तो समोर बसलेला लक्षात आले नव्हते.
ऋतुजाकडे बघून अभिराज मनातल्या मनात म्हणाला,
'यार ही किती गोड दिसते आहे. मनात प्रेम, चेहऱ्यावर निरागस भाव. नक्कीच एखादं रोमॅंटिक गाणं ऐकत असेल. असंच हिच्याकडे बघत बसावं वाटतंय. मला हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद कायम टिकवून ठेवायचा आहे. अभी, तुझ्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे.'
'यार ही किती गोड दिसते आहे. मनात प्रेम, चेहऱ्यावर निरागस भाव. नक्कीच एखादं रोमॅंटिक गाणं ऐकत असेल. असंच हिच्याकडे बघत बसावं वाटतंय. मला हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद कायम टिकवून ठेवायचा आहे. अभी, तुझ्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे.'
अभिराजने हळूच तिचा हात हातात घेतला, ऋतुजाने दचकून पुढे बघितलं. अभिराजला समोर बघून तिचे ओठ आपसूकच रुंदावले गेले. अभिराजच्याही चेहऱ्यावर मोठी स्माईल आली होती. एकीकडे गाणं सुरूच होतं, त्याच आवेगात तिने त्याला घट्ट मिठी मारली.
ऋतुजाने त्याला स्वतःहून पहिल्यांदा मिठी मारली होती. तोही त्या मिठीने भारावून गेला होता. ऋतुजाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. कदाचित ह्याच मिठीसाठी, त्याच्या स्पर्शासाठी ती आसुसली होती.
गाणं संपल्यावर ऋतुजा भानावर आली. आपण स्वतःहून अभिराजला मिठी मारल्याचे तिला आठवले आणि ती पटकन बाजूला झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. ऋतुजाने कानातील हेडफोन बाजूला काढून ठेवले आणि मोबाईल मधील गाणं बंद केलं.
"ऋतू, आज एकदम वेगळ्याच मूडमध्ये होतीस ग." अभिराज म्हणाला तशी ऋतुजाने एका बाजूला मान वळवली व ती लाजली.
"ओहो, ह्याच लाजण्याने मला तू भुरळ पाडली आहेस." अभिराज ऋतुजाचा चेहरा हनुवटीला धरून आपल्या समोर फिरवत म्हणाला.
ऋतुजा खाली मान घालून हसत होती.
"तू कधी आलास?" ऋतुजाने विषय बदलण्यासाठी विचारले.
"तू जेव्हा गाणं ऐकण्यात बिजी होतीस, तेव्हाच आलो." अभिराजने उत्तर दिले.
अभिराजचा हात हातात घेऊन ऋतुजा म्हणाली,
"अभी, मी तुला खूप मिस केलं. तुझ्या आठवणीने जीव कासावीस होत होता."
"अभी, मी तुला खूप मिस केलं. तुझ्या आठवणीने जीव कासावीस होत होता."
"हो ग राणी. मलाही तुझी खूप आठवण येत होती. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, मीही हतबल झालो होतो. तुझ्या मनाची स्थिती तुझ्या एका मिठीने माझ्यापर्यंत पोहोचली आहे." अभिराजने आपले ओठ तिच्या हातावर टेकवले, तशी ती त्या स्पर्शाने मोहरून गेली.
तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. अभिराज व ऋतुजाने चमकून दरवाजाकडे बघितले, तर अर्पिता दरवाजात डोळ्यावर हात ठेवून उभी होती.
"मी काहीच बघितले नाही. आईंनी तुम्हाला दोघांना जेवायला बोलावले आहे. हाच निरोप सांगायला आले होते." एवढं बोलून अर्पिता हसत निघून गेली.
ऋतुजाने कपाळावर हात मारून घेतला.
"आता वहिनी मला नेहमी यावरून चिडवत राहतील." ऋतुजा.
"चिडवू देत ना, त्यामुळे हा स्पेशल क्षण तुझ्या आठवणीत राहील." अभिराज हसून म्हणाला.
"बरं चल आपण जेवण करुयात. जेवण झालं की लवकर घरी जाता येईल." ऋतुजा आपल्या जागेवरुन उठत म्हणाली.
"मॅडमला घरी जाण्याची खूपच घाई झालेली दिसतेय." अभिराज मिश्किल हसून म्हणाला.
"अभी, प्लिज आत्ता नको ना. माझ्या प्रत्येक बोलण्यावर असाच चिडवणार आहेस का? एकतर मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. माझ्या मनातील एकेक गोष्ट तुला सांगायची आहे. इथे राहून ते तर शक्य होणार नाही. मला तुझ्यासोबत एकांत हवा आहे." ऋतुजाने आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
अभिराज बेडवरून उठत म्हणाला,
"आपण जेवण करुयात आणि आपल्या घरी जाऊयात. ते घरही घरातील लक्ष्मीच्या आगमनासाठी व्याकुळ झालेलं आहे."
"आपण जेवण करुयात आणि आपल्या घरी जाऊयात. ते घरही घरातील लक्ष्मीच्या आगमनासाठी व्याकुळ झालेलं आहे."
अभिराज व ऋतुजा बाहेर जाऊन डायनिंग टेबलच्या इथे बसले. अर्पिताने त्यांना जेवायला वाढले. ऋतुजाचे बाबा, ऋतुजा व अभिराज असे तिघेजण जेवायला बसले होते.
"रणजीत दादा, घरी नाहीये का?" अभिराजने जेवण करता करता विचारले.
"त्यांना आज रेस्टॉरंट मध्ये अर्जंट काम होतं, म्हणून ते घरी थांबू शकले नाही." अर्पिताने उत्तर दिले.
सगळ्यांनी गप्पा मारत मारत जेवण केले.
अभिराज त्याच्या घरी ऋतुजाचे स्वागत कसे करतो? बघूया पुढील भागात…..
©®Dr Supriya Dighe
