**गौरीचे आगमन**
उंबऱ्यातून घरात येते, गौरीचे रूप उजळ,
पायांचे धुतले पाणी-दूध, स्वस्तिक त्यावर साजिरं।
लक्ष्मीचे ठसे उमटवित, साजरे स्वागत तिचे,
घंटा-ताट वाजवून, घरी नांदले ऐश्वर्याचे दिवे।

तेरड्याच्या रोपांची प्रतिमा, मातीच्या मुखवट्यात साकार,
साडी दागिन्यांत सजलेली, गौरी ती भक्तांच्या हृदयात भार।
पहिल्या दिवशी नैवेद्य, भाकरी-भाजीचा साज,
आवाहन करून सांगतात, समृद्धी नांदो आज।

ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा, फराळाचा नैवेद्य खास,
रव्याचा लाडू, करंजी, चकली, जेवणाचा गोड सुवास।
संध्याकाळी आरती, पुरणपोळीचा नैवेद्य साज,
सोळा भाज्या, चटणी, पंचामृताचा खास अंदाज।

विसर्जनाच्या दिवशी तिचा निरोप,
सुताच्या गाठींनी बांधला आशीर्वादाचा धागा,
पाण्यात विसर्जन, परतीला वाळूचा थोडा वास,
घरभर टाकून समृद्धीची छाया, नांदो कधी न होवो त्रास।

दोरकाची पूजा, गळ्यात बांधला सोनेरी धागा,
नवीन पीक येईपर्यंत, महालक्ष्मीचाच भास।
ही परंपरा, ही श्रद्धा,
गौरीमुळे नांदते जीवन समृद्धतेचा साक्षात्कार।

-जान्हवी साळवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा