कवितेचे शीर्षक - अर्थ प्रेमातला
प्रेम हे प्रेम असते,
प्रेमात आपलेपणाची भावना असते,
प्रेमाला बंधन नसते,
प्रेम जातपात जाणत नसते,
प्रेम सर्वांना देण्यासाठी असते,
प्रेमात समर्पणाची वृत्ती असते,
प्रेमात एक अद्भुत शक्ती असते,
प्रेमामुळे जीवनाची बाग बहरत असते,
प्रेमामुळे जीवनात विविध रंगाची छटा असते,
थोरामोठ्यांचे प्रेम हे एक आशिर्वाद असते,
जे जीवनात यशस्वी होताना,आनंद द्विगुणीत करते.
रुपाली थोरात