निधी आणि विवेक प्रवास करून घरी पोहोचले. लॉकडाऊन मुळे गेले ५-६ महिने ते मुंबईतच राहिले होते.
खर तर जसा लॉकडाऊन चालू झाला तस विवेक च्या आईने गावी या म्हणून सपाटा लावला होता. पण हे दोघेही नोकरीस होते. निधीच्या कंपनीने लवकर घरातून काम करायची परवानगी दिली पण विवेकच्या कंपनीने खूप उशिरा परवानगी दिली. जेव्हा परवानगी दिली तेव्हा सगळीकडे गावी जाण्याची गर्दी होती.
या अश्या गर्दीतून जाण्यापेक्षा जिथे आहोत तिथेच आत्ताच्या परिस्थितीत नीट राहावं असा त्यांनी विचार केला.
सासूबाईंचा मात्र सतत येण्यासाठी तगादा चालू होता.
शेवटी आता ते गावी आले.
आईला आपल्या मुलाला बघून खूप आनंद झाला. सुनेला बघून पण झाला पण तो नंतर.
सून आली म्हणजे आता आपण तिच्यावर थोड काम टाकून आराम करू शकू असा विचार त्यांना सुखावून गेला.
निधी आणि विवेक घरी आले. आधी अंघोळी करून फ्रेश झाले. सगळं सनितीझ करून मग सगळे जण जेवायला बसले.
जेवण झाली तस् सासू लगेच हात धुवून आपल्या खोलीत गेली. मुलाला ही लगेच हाक मारून घेतल.
झालं म्हणजे सगळं आता आवरणार कोण तर निधी.
निधी तशी समजूतदार होती. खर तर प्रवासाचा शिण होता तरी तिने विचार केला., इतक्या दिवसाने भेटत आहे आईं आणि मुलगा.. बसू देत. आपण आवरून घेऊया.
निधी सासूबाईंना आईं सारखा मान देत असे.
दोन दिवस दोघानी घेतलेली सुट्टी संपली आणि आता खरी तारेवरची कसरत चालू झाली.
दोघेही सकाळी उटले की ८.३० वाजल्या पासून लॅपटॉप घेऊन कामाला बसत ते संध्याकाळी ८.३० ला उठत.
निधी मात्र त्यातून ही आईनं मदत करायसाठी अधून मधून वेळ काढून उठायची.
एकट्या आईं काय काय करतील या विचाराने ती थोडा वेळ काढून शक्य होतील तितके सगळी कामं करायची.
विवेक मात्र आपल्या कामात असायचा. आणि शिवाय त्याने घरकामात मदत केलेलं आईना चालायचं पण नाही.
एकदा असच निधी वेळ काढून घरकाम करत असताना सासूबाई आल्या आणि विवेक कडे बघून म्हणल्या,"
किती ग बाई माझे लेकरू काम करत. जरा सुध्दा वेळ मिळत नाही त्याला."
हे ऐकून माधुरीला आश्चर्य पण वाटले आणि थोड वाईटही.ती मनात म्हणली," हे बर आहे, वेळ तर मलाही नाहीय. पण यांना मदत व्हावी म्हणून मी वेळात वेळ काढून मदत करत आहे तर यांना वाटतं मी रिकामीच आहे."
तिन पटापट काम आवरून परत लॅपटॉप घेऊन ऑफिस काम करत बसली.
दुपारी चहाच्या वेळी निधी काम करत होती.तीच लक्ष न्हवत किती वाजले याकडे. सासूबाईंनी वाट बघून शेवटी चहा केला.
एक चहाचा कप घेऊन त्या आल्या आणि विवेकला दिल्या आणि निधीला म्हणाल्या," तुझा चहा आत ठेवला आहे. घे जा"
आता मात्र निधिला वाईट वाटले. खर त्तर त्या तिच्यासाठी चहा घेऊन येऊ शकल्या असत्या. या जागी आपली आईं असते तर तिने नक्कीच आपल्याला चहा आणून दिला असता.
ती थोडवेळ विचार करून परत आपल्या कामाला लागली. रात्री ची जेवण आवरून जेव्हा झोपू लागली तेव्हा तिला परत परत या घटना आठवू लागल्या. तिला वाईट वाटलं आणि त्रास ही होऊ लागला. शेवटी उशिरा का होईना झोप लागली.
सकाळी लवकर उठली आणि परत दिनक्रम चालू झाला. पण आज ही तिच्या डोक्यातून कालच्या घटना जाईना.
भरीत भर म्हणजे रात्री झोपायच्या पूर्वी दूध घेत असताना सासूबाईंनी लेकाला मोठा ग्लास भरून दूध दिलं आणि हिला छोट्या भांड्यातून.
आता तर तिला जास्तच वाईट वाटलं, अस भेदभाव तर तिच्या घरच्यांनी ही कधी तिच्यात आणि तिच्या भावात केला नव्हता.
दूध पिताना तिला आठवलं, सासू सासरे जेव्हा मुंबईला यांच्या कडे राहायला आले होते तेव्हा आपण त्यांना अस कधी वागवलं न्हवत. उलट वयस्कर व्यक्तींना जेवण जात नाही म्हणून आपण त्यांना भरपूर दूध द्यायच्याचो. आणि आज या आपल्याशी अस वागत आहेत.
निधी आणि विवेक त्यांच्या बेडरूम मध्ये आले.विवेक झोपला पण नीधीला झोप लागेना.
सतत तिला विचार येऊ लागला , का वागल्या त्या अश्या आपल्याशी. पण काही केल्या तिला उत्तर मिळेना. शेवटी तिने विचार केला या गोष्टीचा आपल्याला इतका का त्रास होत आहे?
कारण, आपण त्यांना आईं मानलं आणि जेवढ त्यांच्यासाठी करता येईल तेवढं केलं, पण त्यांनी आपल्याला मुलगी नाही मानलं.
आपल्याला त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपण एकद्याला आपल्या जवळच समजतो, सगळं करतो त्याच्यासाठी पण तो मात्र आपला फक्त फायदा घेतो. त्याच्या लेखी आपली काही किंमत नसते.
शेवटी तिने एक निर्णय घेतला, आपण आता कोणासाठी अती काही करायचं नाही.. जेवड्यास तेव्हढ.. सहज जाता जाता होईल इतकेच करायचं. म्हणजे मग कोण आपल्यासाठी काही करो वा ना करो त्याचा आपल्याला त्रास होणार नाही.
जो जसं वागेल त्याच्याशी तसच वागायचं. म्हणजे आपल्याला आपला फायदा घेतला जातोय अस वाटणार नाही आणि कोणाच्या वागण्याचा त्रासही होणार नाही.
तिला तिच्या प्रश्नाचे मुळ मिळाले होते आणि त्यावरचं उत्तरही. आता तिला शांत झोप लागली.
निधीसारखा विचार आपण सगळ्यांनी केला तर कोणाच्या, कश्याही वागण्याचा आपल्याला कधी त्रास होणार नाही.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा