असं सासर नको ग बाई...भाग 1
©® ऋतुजा वैरागडकर
वसुंधरा, मनोहर, मुलगा प्रदीप आणि मुलगी सुकन्या असं चौकोनी सुखी कुटुंब.
मनोहर रिटायर झाले होते, मुलांची शिक्षण पूर्ण झालेली होती. प्रदीप इंजिनियर झाला होता आणि सुकन्या सीए झाली होती. दोघेही त्यांच्या मार्गी लागलेले होते. त्यामुळे आता घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला.
प्रदीपला त्याच्याच ऑफिसची मुलगी आवडायची. दोघांनीही आपल्या घरी सांगितलं. मुलीच्या घरून आणि इकडूनही काहीच विरोध नव्हता.
प्रदीपला त्याच्याच ऑफिसची मुलगी आवडायची. दोघांनीही आपल्या घरी सांगितलं. मुलीच्या घरून आणि इकडूनही काहीच विरोध नव्हता.
त्यामुळे प्रदीपच लग्न लवकरात लवकर थाटामाटात करण्यात आलं. प्रदीपची बायको पारुल त्याच्याच ऑफिसमध्ये जॉबला होती. स्वभावाने अतिशय शांत, सुंदर, सुशिक्षित.
पारुलने काही दिवसातच घरच्यांची मन जिंकली. सुकन्या आणि तिची तर अगदी घट्ट मैत्री झाली होती. दोघी नणंद भावजय कमी मैत्रिणी जास्त झाल्या होत्या.
काही महिन्यातच पारुलला दिवस गेले. प्रेग्नेंसी मध्ये पारूलने ऑफिसला सुट्टी घेतली. ती घरी आराम करायची.
वसुंधरा ताई आणि सुकन्या दोघी तिची खूप काळजी घ्यायच्या. बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि पारुलने एका गोंडस बाळाला जन्म दिला. शिवराज च्या घरात आल्याने सगळीकडे आनंदी आनंद होता. सगळं छान चाललेलं होतं.
आता घरात सुकन्याच्या लग्नाचा विषय निघाला.
"सुकू तुझ्या मनात कोणी मुलगा असेल तर तसं सांगा मला म्हणजे आमचा शोधण्याचा त्रास वाचेल." प्रदीप तिला चिडवायला लागला.
"दादा प्लिज तू चिडवू नको. तुम्ही शोधा मुलगा."
"काय ग इतक्या वर्षापासून नोकरी करतेस, एज्युकेशन झालं, कॉलेजला गेलीस आणि एकही मुलगा तुला आवडला नाही. तु अगदी अभ्यासू किडा होतीस. तुझ्या डोक्यात फक्त अभ्यास अभ्यास राहायचा हो ना."
"दादा कॉलेज टाईम मध्ये फक्त अभ्यास होता आणि आता फक्त जॉबचा विचार असतो. तुम्ही शोधा मुलगा."
घरात छान वातावरण सुरू झालं. काही मुलांची स्थळ आली.
त्यातलं एक चांगलं स्थळ चालून आलं आणि सुकन्याचं लग्न पक्क झालं.
मुलगा बँकेत मॅनेजर होता, एकुलता एक होता, आई-वडील नोकरीतून निवृत्त झालेले होते. सगळे बघता फॅमिली चांगली होती म्हणून घरच्यांनी काही आडेवेडे न घेता सुकन्याचं लग्न लावून दिलं.
हसत खेळत सुकन्या तिच्या सासरी गेली.
नणंद बाईला सासर चांगल मिळाल म्हणून पारुलही खूप खुश होती. सगळे आनंदात होते.
नणंद बाईला सासर चांगल मिळाल म्हणून पारुलही खूप खुश होती. सगळे आनंदात होते.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा