असं सासर नको ग बाई... भाग 2
©® ऋतुजा वैरागडकर
नव्या नवलाईचे नऊ दिवस आनंदात गेले. सुकन्याने तिचा जॉब जॉईन केला. काही दिवस काही महिने खूप छान गेले पण नंतर हळूहळू सुकन्याच्या घरचे तिला त्रास द्यायला लागले.
तुला स्वयंपाकच येत नाही, तुला हे करता येत नाही, तुला ते करता येत नाही, नुसतं शिकून काय उपयोग घरकामही करता यायला हवं अशा एका ना अनेक गोष्टीवरून तिला टॉर्चर करायला लागली. तिला मानसिक त्रास द्यायला लागले.
सुकन्याने निखिलला एक-दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याला असं वाटायचं की ही निखिलला त्याच्या आई-वडिलांना विरुद्ध भडकवते आहे पण त्याच्या मागे घरात काय चाललेलं असतं याची त्याला कल्पना नव्हती.
एक दिवस सुकन्याने पारुलला फोन केला.
"काय म्हणता ननंद बाई, खूप दिवसानंतर आठवण आली आमची, आजकाल फोनवरही बोलण होत नाही.
"ऐकना पारुल मला तुला काही सांगायचंय."
"सुकू काय झालं? काही सिरीयस आहे का?"
"हो मला तुला भेटायचंय, तू येऊ शकशील का मला भेटायला?"
"अग तुझ्याकडे यायचं? त्यापेक्षा तू ये ना इकडे सगळ्यांचीच भेट होईल आणि माहेरी येण्याच सुख हे वेगळंच असतं ग. ये तू इकडे आपण धमाल करूया."
"नाही निखिलला नाही आवडणार."
"का निखिलरावांना का आवडणार नाही. हेही तुझ्या हक्काचचं घर आहे."
"पारूल प्लिज समजून घे ना तू, ये ना मला भेटायला. मी ऍड्रेस पाठवते तिथे ये तू."
"हो येते."
पारुल सुकन्याला भेटायला गेली.
सुकन्याने तिला होणारा त्रास पारुलला सांगितला.
"हे बघ सुकू, तुझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले. छोट्या छोट्या गोष्टी होणारच तू लक्ष देऊ नको आणि काही वाटल तर निखीलरावांशी स्पष्टपणे बोल.
"त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी पण ते ऐकायला तयार नाहीत."
"ओके मग एक काम कर, तुम्ही सगळेजण रात्रीचे मिळून जेवण करत असाल ना मग जेवताना हा विषय काढ. सगळ्यांसमोर बोललीस ना की काय खरं काय खोटं सगळ कळेल ."
पारुलने तिला समजावलं आणि तिच्या सासरी पाठवलं.
सुकन्याने निखिलला बऱ्याचदा सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग होत नव्हता. सगळे प्रयत्न करून झाले पण निखिल ऐकून घ्यायला तयार नव्हता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा