असाही पाहुणचार भाग १
" आरुष, या सोफ्यावर तू बसला आहेस की सोफा तुझ्या अंगावर बसलाय, हेच मला कळेनासं झालंय ! अरे, कमीत कमी तो रिकामा चहाचा कप तरी किचनमध्ये नेऊन ठेवशील का ? " वैदेहीचा आवाज स्वयंपाकघरातील भांड्यांच्या आवाजापेक्षाही मोठा होता.
पण आरुष ? तो तर आपल्याच धुंदीत होता. लॅपटॉप मांडीवर, पाठीला तीन-चार उशांचा आधार, आणि डोळ्यांत फेसबुकच्या रीलचा प्रकाश.
" हो गं वैदू, फक्त दोन मिनिटं... हे बघ ना, हा व्हिडिओ किती व्हायरल झालाय ! " त्याने निर्लज्जपणे उत्तर दिले.
वैदेही वैतागून बाहेर आली. तिने आज सकाळपासून घराचा कानाकोपरा स्वच्छ केला होता. आठवड्याचा किराणा डब्यात भरून ठेवला होता. हात किराणा भरून दुखत होती, आणि इकडे स्वारी डिजिटल जगात रमली होती. आरुषने हॉलचा पार कचरा डेपो केला होता. ऑफिसची बॅग एका बाजूला, कालचा न धुतलेला टिफिन बॉक्स दुसऱ्या कोपऱ्यात, आणि उशांची तर त्याने जणू भिंतच उभारली होती.
" तुला खरंच काही वाटत नाही का रे ? मी इथे मरमर मरतेय आणि तू साधं बोटही हलवत नाहीयेस. ऑफिसचं काम आहे असं म्हणालास म्हणून मी गप्प बसले, पण तू तर चक्क फेसबुक बघतोयस ! " वैदेहीने चिडून विचारले.
" अगं वैदू, डोकं शांत करतोय गं. शनिवार आहे, थोडा रिलॅक्स होऊ दे की ! " आरुषने डोळे मिचकावत म्हटले आणि पुन्हा स्क्रीनमध्ये डोकं घातलं.
वैदेहीने ठरवलं, आता सरळ बोटाने तूप निघणार नाही. ती बाल्कनीत गेली. रागाने लाल झालेली वैदेही स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर स्मृतीचं नाव चमकलं.
स्मृती - वैदेहीची चुलत बहीण. दिसायला अत्यंत स्टायलिश, मॉडर्न आणि आरुषच्या मते जगातील सर्वात मोठी जजमेंटल व्यक्ती.
आरुषला नेहमीच वाटायचं की स्मृतीच्या नजरेत आपण एक परफेक्ट, हँडसम आणि केअरिंग हसबंड असावं.
आरुषला नेहमीच वाटायचं की स्मृतीच्या नजरेत आपण एक परफेक्ट, हँडसम आणि केअरिंग हसबंड असावं.
वैदेहीच्या डोक्यात एक लख्ख प्रकाश पडला. तिने फोन उचलला आणि मुद्दाम हॉलमध्ये येत, आरुषच्या अगदी जवळ उभी राहून मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
" काय ? स्मृती ! अगं तू पुण्यात शिफ्ट झालीस आणि मला आता सांगतेयस ? आणि काय म्हणालीस... तू आत्ता आमच्या घराच्या जवळच आहेस ? वीस मिनिटांत पोहोचतेयस ? "
आरुषच्या हातातील लॅपटॉप थोडा हलला. त्याने कान टवकारले.
आरुषच्या हातातील लॅपटॉप थोडा हलला. त्याने कान टवकारले.
" अगं पण स्मृती... नको गं आज ! नको येऊ प्लीज ! " वैदेही मुद्दाम गयावया करत होती.
" घराची अवस्था बघशील तर तुला वाटेल आपण कुठं आहोत ? नाकाला रुमाल लावून उभी राहशील. आरुषने इतका पसारा केलाय की बसायला जागा नाहीये. आणि मला तर इतका थकवा आलाय की मी तुझा साधा पाहुणचार करण्यासाठी देखील उठू शकणार नाही. जेवण तर लांबच राहिलं... नको येऊ गं बाई, माझी इज्जत जाईल ! "
इज्जत हा शब्द आरुषच्या कानात गरम शिशासारखा शिरला. त्याने लॅपटॉप झटकन बंद केला. स्मृती येणार ? आणि ती हा पसारा बघणार ? मग ती नक्कीच आपल्या फॅमिली ग्रुपवर सांगणार की आरुष किती आळशी आहे. आपली मिस्टर कूल ही इमेज मातीला मिळणार !
वैदेहीने फोन ठेवला आणि ती चेहऱ्यावर रडवेला भाव आणून आरुषला म्हणाली,
वैदेहीने फोन ठेवला आणि ती चेहऱ्यावर रडवेला भाव आणून आरुषला म्हणाली,
" आरुष, ती स्मृती येतेय गं. आता काय करू ? मला तर उभं राहायचीही ताकद नाहीये."
आरुष एखाद्या 'सुपरमॅनला लाजवेल असा सोफ्यावरून उडी मारून उठला.
" वैदू ! तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना ! तू जा, मस्त गरम पाण्याने अंघोळ कर, फ्रेश हो. तोपर्यंत बघ मी काय मॅजिक करतो ते." वैदेहीने आश्चर्याचा खोटा आव आणला.
" पण तुला जमेल का रे ? तू तर काम करत होतास नाn? "
" काही काम नाही, सगळं झालंय ! तू फक्त फ्रेश व्हायला जा." आरुषने तिला अक्षरशः बाथरूमच्या दिशेने ढकललं.
वैदेही बाथरूममध्ये शिरली आणि तिने तोंड दाबून हसायला सुरुवात केली. बाहेर आरुषच्या कामाचा वेग एखाद्या तुफान सारखा होता. त्याने सगळ्यात आधी सोफ्यावरच्या उशा नीट लावल्या. लॅपटॉप आणि ऑफिस बॅग जागेवर ठेवली. कचरा उचलला. तो रिकामा चहाचा कप धुवून टाकला. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वतःही पाच मिनिटांत अंघोळ उरकली आणि किचनमध्ये शिरला.
आरुषला माहीत होतं की , स्मृतीला पास्ता खूप आवडतो. त्याने फ्रिजमधून ढोबळी मिरची, कॉर्न आणि मशरूम काढले. ऐकी कडे पास्ता उकळायला ठेवला. व्हाईट सॉस बनवताना त्याने चक्क युट्यूबवर रेसिपी लावली होती. उगीच काही चुकायला नको !
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा