Login

असला नवरा नको गं बाई. (भाग १)

लग्न करून टाका म्हणजे नवरा सुधारेल या अंधश्रद्धेने अनेक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

असला नवरा नको गं बाई !!.
(भाग १)


सुमतीबाई आणि दिवाकर यांची एकुलती एक मुलगी सुनंदा. सुमतीबाई लोकांच्या घरी जेवण बनवायचे काम करायच्या तर दिवाकर एका कंपनीत शिपाई होते. सुनंदा गरीब घरातली होती. बारावी उत्तीर्ण झाली होती. दिसायला छान, घरची सर्व काम करून एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. आता वीस वर्षे पूर्ण झाले म्हणून तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी काही नातेवाईकांना तिच्यासाठी मुलगा शोधायला सांगितलेही होते.

काही दिवसांनी तिच्या दूरचा काकांनी स्थळ आणले. मालतीबाई आणि अशोकराव यांचा मुलगा विजय.

काकाने त्यांना सांगितले "विजय खूप शिकलेला आणि मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. चांगला पगार आहे. शिवाय तो निर्व्यसनी आणि कर्तबगार आहे. घरची प्रॉपर्टी ही खूप आहे." त्यातल्या त्यात तो एकुलता एक होता. त्यात महत्वाचे त्यांना सुनंदा पसंत होती. विजय दिसायला ही देखणा होता. सुनंदाच्या घरच्यांना हे स्थळ पसंत पडले. त्यांनी जुजबी चौकशी केलीही कुठेच खोट काढायला जागा नव्हती. सुनंदलाही मुलगा पसंत पडला. मग लगेच दोन्ही कुटुंबाची बोलणी होऊन लगेच महिनीभरात लग्नही ठरले.

मालतीबाई आणि अशोकराव यांची एकच अपेक्षा होती की मुलगी घर आणि नवऱ्याला सांभाळणारी हवी. हीच अट त्यांनी घातली. लग्नात मुलाच्या पालकांना हुंडा नको होता. फक्त लग्न मुलीकडच्या लोकांनी लावून द्यावे. वराला वर दक्षिणा म्हणून तोळाभराची चैन आणि अंगठी घालावी. वराच्या लोकांचे मानपान करावे आणि मुलीला मनाला वाटेल तितके स्त्रीधन द्यावे. दोन्ही कडील बस्ता बांधून द्यावा. या क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर यापेक्षा त्यांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या.

सुनंदाच्या आईवडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि सुनंदाच्या सासरच्यांना साजेसं लग्न लावून दिले. त्यांच्या मानपानात काहीच उणीव ठेवली नाही. ही गोष्ट वेगळी की या लग्नासाठी त्यांना राहतं घर गहाण ठेवावं लागलं पण मुलीच्या चांगल्यासाठी आईवडिलांना एवढी तर तडजोड कारवी लागतेच ना.

लग्न होऊन सुनंदा तिच्या सासरी आली. तिच्यासाठी चार दिवस चांगले गेले. पाचव्या दिवशी विजय रात्री उशिरा आला तो मद्यधुंद अवस्थेतच. सुनंदाला हे धक्कादायक होते कारण लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या काकांनी सांगितले होते की, "मुलगा निर्व्यसनी आहे."

सुनीता समजून गेली, लग्न जुळवणाऱ्या काकांनी तिला चुना लावला आणि नको ते ध्यान गळ्यात बांधले. तिने त्या काकांना मनातल्या मनात खूप शिव्या आणि तळतळाट दिले.

इकडे नवरा रोजसारखा दारू पिऊन तर्राट होऊन आला, त्याला जेवायचेही भान नव्हते. तिने कसेतरी त्याला जेवण भरवले आणि बेडरूम मध्ये घेऊन गेली. बेडवर मात्र विजयचा अजून एक विकृत चेहरा तिला दिसला. एखाद्या जनावराने लचके तोडावे तसे तिच्या शरीराचे तो तिचे लचके तोडू लागला.

सुनंदाला हे सर्व कळण्याच्या पलीकडचे होते.


क्रमशः
संतोष उदमले
0

🎭 Series Post

View all