असेही प्रेम हे ( भाग २ रा)
© आर्या पाटील
' किती भित्री होतीस अगं. मला मात्र तुला कणखर झालेलं पाहायचं होतं. अगदी माझ्यासारखं.' तो विचारांत रमला.
त्याला विचारात हरवलेलं पाहून तिने लागलीच त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली. तसा तो भानावर आला.
" अरे बापरे ! खूप प्रगती आहे. चुटकी वाजवायला शिकलीस तर." तो आश्चर्याने म्हणाला.
होकारार्थी मान हलवत आता तिच भूतकाळात हरवली.
होकारार्थी मान हलवत आता तिच भूतकाळात हरवली.
' तू असाच डोळ्यांसमोर चुटकी वाजवायचास. सुरवातीला घाबरले; पण नंतर भारी वाटू लागले. तुझी स्टाईल होती ती. कसला गोड दिसायचास दादागिरी करतांना.' आता ती मात्र विचारांच्या प्रवाहात उतरली.
तिला असे विचार करतांना पाहून तो पुन्हा तिच्यात हरवला.
तिला असे विचार करतांना पाहून तो पुन्हा तिच्यात हरवला.
"एक्सक्यूज मी, जरा एक फोटो घेता का ?" कोणी एक जोडपं मोबाईल पुढ्यात धरत अनिकेतला म्हणालं.
त्यांच्या बोलण्याने दोघेही भानावर आले.
त्यांच्या बोलण्याने दोघेही भानावर आले.
मानेनेच होकार देत तो उठला. तलावाच्याकाठी त्या जोडप्याने आपले फोटो काढून घेतले.
" खूप खूप धन्यवाद. वहिनींसोबत तुमचा फोटो काढायचा आहे का ? मी काढतो, द्या मोबाईल." तरुणाने असे म्हणताच त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
'वहिनी' हा शब्द ऐकताच त्याला मात्र तो दिवस आठवला.
पेपर सुरु असतांना पुरवणी घेण्यासाठी गेलेल्या वैदेहीला कोणी एकाने वहिनी म्हणून संबोधले.
पेपर सुरु असतांना पुरवणी घेण्यासाठी गेलेल्या वैदेहीला कोणी एकाने वहिनी म्हणून संबोधले.
" वहिनी, किती पुरवणी घेता ? आमच्या दादाचा तरी विचार करा." म्हणत तिला अनिकेतच्या नावाने चिडवले.
त्या शब्दांनी तिला मात्र भरून आले. जाग्यावर बसत तिने पेपर लिहायला सुरवात केली खरी; पण डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंनी समोरची अक्षरे ओली झाली. कागद भिजला. तिला असं रडतांना पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्या मुलाला बेदम चोप द्यावा असं क्षणभर वाटलं ;पण पेपर सुरू असल्याने स्वतःच्या भावना आवरल्या. तिला समजवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पूर्ण पेपर तिने रडतच लिहिला.
आताही तिचा तो रडका चेहरा आठवून तो भावनिक झाला.
आताही तिचा तो रडका चेहरा आठवून तो भावनिक झाला.
" ओ दादा, देता ना फोन ?" त्या तरुणाने पुन्हा फोन मागताच अनिकेत भानावर आला.
" आम्ही नवरा बायको नाहीत. कॉलेजचे मित्र मैत्रिणी आहोत." प्रसंग सांभाळत तो उत्तरला.
" सॉरी हा." असे म्हणत माफी मागून ते जोडपं निघून गेलं.
अनिकेत पुन्हा तिच्याशेजारी येऊन बसला. ती मात्र गालातच हसत होती. तिच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू त्याला मात्र सुगंधित करत होते.
" आज चक्क हसतेस ?" त्याने प्रश्न केला.
" मघाशी थोडी घाबरलेच होते. तू त्या तरुणाला मारू नये म्हणून देवाला मनोमन प्रार्थना करत होते. त्यादिवशी कॉलेजमध्ये ज्याप्रकारे तू त्या मुलाला मारलं होतस ते आठवून आजही स्पेशलवाली फिलिंग येते." ती अनाहूतपणे उत्तरली.
"काय ?" तो विस्मयाने म्हणाला.
" म्हणजे..ते...त्या मुलाने हात जोडून माझी माफी मागितली तेव्हा भारी वाटलं." ती विषय सांभाळत म्हणाली.
' खरं तर तुझ्या अश्या वागण्याने त्या दिवशी खूप भारी वाटले मला.
एका वेगळ्याच जगात हरवल्या सारखं वाटत होतं. हवंहवसं एक जग तयार होत होतं. आरसा बोलका झाला होता, फुलांना कविता सुचत होत्या, पायांनी ताल धरला होता, मन आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत होते.
या अनोख्या जगाची मी सुंदर राणी बनले होते.' ती स्वगत झाली.
ती विचारांत असतांना त्याची नजर पुन्हा तिच्यावर खिळली.

" वैदेही, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यांत पाणी होते त्यादिवशी." त्याने असे म्हणताच ती भानावर आली.
" नाही रे. त्या माझ्या भावना होत्या,डोळ्यांतून बरसणाऱ्या." ती पुन्हा गुढतेने म्हणाली.
" म्हणजे ?" तो पुढचं काही म्हणणार तोच ती गोंधळली. आपली बॅग चाचपडत ती उठून उभी राहिली.
" चावी गाडीलाच राहिली वाटतं. मी आले लगेच." म्हणत ती लागलीच गाडीच्या दिशेने निघून गेली.
त्याला मात्र तो दिवस आठवला,जेव्हा तो वर्गात स्वतः च्या बाईकची चावी विसरून गेला होता. पेपर देऊन तो जरा घाईतच निघाला. बाईकची चावी मात्र बेंचमध्येच खाली राहिली. तो निघून गेल्यावर त्याच्यापासून अंतर ठेवून बसलेली वैदेही निवांत झाली. एरवी अंग चोरून बसणारी ती आता मात्र आरामशीर बसून पेपर लिहू लागली. तोच तो आला. तिच्या अगदीच जवळ येत त्याने बेंचवर खाली ठेवलेली आपली चावी उचलली. त्याच्या ओझरत्या, नकळपणे झालेल्या स्पर्शाने मात्र ती चांगलीच गोंधळली. बेन्चवरून उठून उभी राहत तात्काळ बाजूला झाली.हातातली चावी दाखवत तो मात्र तेथून लगेच निघून गेला.
तिचा तो नकळपणे झालेला स्पर्श आजही ओला होता. आठवणीने तो आजही शहारला. प्राजक्तापरी त्या गोड आठवणीने अंर्तमन गंधाळले.

चाहूल गोड नात्याची
घेऊन नवा प्रहर आला.
बेडर या गुलमोहराला
प्रीतीचा मग बहर आला..
घेऊन नवा प्रहर आला.
बेडर या गुलमोहराला
प्रीतीचा मग बहर आला..
मनात स्फुरलेली ती कविता आजही नकळपणे ओठांवर आली.
तो रमलेला असतांना ती चावी घेऊन आली आणि त्याच्या बाजूला बसली.
तो रमलेला असतांना ती चावी घेऊन आली आणि त्याच्या बाजूला बसली.
" चावी विसरण्याची तुझी सवय आता मला लागली आहे." बॅगेत ती ठेवत वैदेही म्हणाली.
" वैदेही, त्या दिवसासाठी मनापासून सॉरी." तो मात्र मान खाली घालत म्हणाला.
" अरे, सॉरी का म्हणत आहेस ? तू मुद्दामहून काहीच केले नव्हतेस. तुझ्या अचानक येण्याने मी गोंधळले आणि त्यामुळेच उठून उभे राहिले. तेवढं मी तुला ओळखायला लागले होते. दुसऱ्या दिवशीही कितीवेळा तू माझी माफी मागितलीस." तिने अगदीच सहजपणे सांगितले.
" मला खूप अपराधी वाटत होते." तो पुन्हा म्हणाला.
" त्या अपराधी वाटण्यासारखे काहीच नव्हते. चुकून झालेला स्पर्श होता तो. त्याला वासनेचा लवलेशही नव्हता." तिने असे म्हणताच त्याला हायसे वाटले.
तिला मात्र त्या दिवशीचा,विरुद्ध टोकाचा तो आठवला.ऐरवी दादागिरी करणारा तो, तिला सॉरी म्हणत होता. त्याचं हे रूप तिच्यासाठी नवं आणि तेवढच सुखावह होतं. नकळत झालेल्या स्पर्शाने अपराधीपणा ल्यालेला तो कधीही चुकीचं वागणार नाही याची शाश्वती तिला पटली. छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त प्रतिमा त्याने गाडीवर कोरली नव्हती, तर त्यांचे विचारही मनात बिंबवले होते. हिच सुरक्षितता तर हवी असते एका अनोळखी नात्यात. सुरक्षितपणाची भावना भेटली आणि ती निर्धास्त झाली. तेव्हापासून दोघांमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली उचलत तिने ती खाली ठेवली.
त्या आठवणीने तिला आजही शांत वाटले.
त्या आठवणीने तिला आजही शांत वाटले.
क्रमश:
© आर्या पाटील
गोड आठवणींत रमलेले ते, या आठवणींना असेच हृदयात जपून ठेवणार की आपल्या अव्यक्त नात्याचा स्विकार करणार कळेल पुढच्या भागात.
गोड आठवणींत रमलेले ते, या आठवणींना असेच हृदयात जपून ठेवणार की आपल्या अव्यक्त नात्याचा स्विकार करणार कळेल पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा