Login

अशा सांजवेळी

चित्रकाव्य

*अशा सांजवेळी*


अशा सांजवेळी
सागराच्या किनारी
तुझी आठवे
रंग गंधील रानी।।

अशा सांजवेळी
मनाच्या कपारी
तुझी सावली
डोळ्यांत ओथंबुनी।।

अशा सांजवेळी
मनाच्या तळाशी
तुझी आर्जवे
मंद आंदोलती।।

अशा सांजवेळी
दिवे लागणीला
तुझी गलबते
दिसू लागती ।।

अशा सांजवेळी
घुमें रानी पावा
तुझी मुग्ध गीते
आर्त हाकारती ।।

अशा सांजवेळी
उगा या अवेळी
मौनात साऱ्या
ताल झंकारती।।


- शर्वरी