" तुमाला एकदा सांगितलं ना...हिथुन जा म्हणून..आणि कळलंच ना चार दिसांनी कसला तो बिझनेस...." तो तिच्या डोळ्यांत पाहताच भानावर येतो आणि परत तोच चिडका स्वर लावुन बोलतो...
" अरे तुमी दोघं हिथं काय गप्पा हाणत हायती...चला मोठे लोक तुमास्नी कवाचे शोधत्यात.... खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , आणि आपले थोरले बंधुराज .....पृथ्वीराज चव्हाण आलेत तुम्हांला आशिर्वाद द्यायला....( नाव वापरलं असलं तरी त्यांचा कसलाही संबंध नाही...) " असं बोलून किशा युवाचा एक हात पकडतो आणि दुसरा हात तिचा पकडून ओढतच सगळे जमले होते तिथे आणतो...
पृथ्वीराज सरांशी गप्पा मारून ,त्यांचे आशिर्वाद घेऊन परत युवा दुसरीकडे जातो तर हि सुद्धा आपल्या खोलीत निघून जाते...तिला या पार्टीत कसलाच रस वाटत नसतो...त्याच पार्टीत ही वारसदार झाली त्यांच्या चव्हाण व सरपोतदार यांच्या नव्या बिझनेस ची असं अनाऊंस ही तिच्या च अनुपस्थित केलं जातं...तो मात्र एकावर एक शॉट निर्वीकार चेहर्याने घेत असतो...घरातले मात्र सर्व अशें वागत असतात जणु त्यांना खुप मोठं घबाड अचानक सापडले आहे...
त्याला मात्र त्या दिवशीचा दिवस आठवतो जेव्हा घरचे त्याला तिच्याशी लग्नासाठी बोलणी करायला त्याच्याकडे आले होते....तो त्यातच हरवला होता...
" हे बगा युवा ...तुमची ना या वेळी चालणार नाय... मार्केट मदे जर आपल्याला टिकायचे असेल तर तुमास्नी आमी ज्या मुलीशी लग्न करा म्हणतोय तिच्या शी तुमास्नी गपगुमान लगिन करावच लागेल..." बापु त्याला रागे भरत होते कारण तो नकार देत होता या लग्नाला... सकाळपासुन घरातील वातावरण रणभुमी झाली होती...
" बापु ...पण त्याच का...?? हे बगा..तिचं वागणं बोलणं राहणं आपल्यापायी लय ईगळा हाय...त्या आपल्यात कवाच टिकणार नाय...." तो मात्र त्यांची समजुत काढत होता...
" हे बगा...तुमी आम्हांला काय करायच ते शिकवु नका चिरंजीव...गेल्या पंचवीस वरसानंतर आपल्याला वारसदार म्हणून किताब या बिझनेस साठी मिळत हाय...आणि त्यांच्याशी लगीन केलं तर चं आणि तरच आपल्याकडं टिकेल...अस तुमच्या आत्तीच बी केहनं हाय..." जवळ जवळ तंबी चं देत दौलत मामा बोलतात..
" आणि त्यांच्याशी लगीन केलं तर चं आणि तरच आपल्याकडं टिकेल...अस तुमच्या आत्तीच बी केहनं हाय..." जवळ जवळ तंबी चं देत दौलत मामा बोलतात..." आण मला एक कळेना चिरंजीव...तुमाला एवढा मोठा ईश्यु काय हाय त्यांच्याशी लगीन कराया...त्या तुमच्या आत्तीच्या कन्यारत्न हायती... लहानपणापासून तुमी बी त्यांना पाहिलेल हायसा मग हाय तरी काय प्रोब्लेम ...." दौलत मामा रागातच विचारतात...
" अहो नाना....लहानपणापासुन त्यांना पायलयं म्हणून तर प्रोब्लेम हाय ना...त्या तशा शहरात वाढल्यात...त्या गावात आणं त्ये बी आपल्या सारख्या घरात राहतील का...??" तो ही आपल्या नानांशी वाद घालत होता..( वडिलांना ,दौलत मामाला तो व गावातले सर्वच नाना म्हणुनच संबोधयाचे...)
" हे बगा उगा वाद घालायचा सकाळच्या पारी म्हणून घालू नगा...आणं अशी काय कमी हाय आपल्या घरात...??" आता ईतका वेळ शांत बसुन ऐकत असलेले बापु ही रागात त्याला बोलतात.." आपल्या घराण्याला गावात काय इज्जत हाय त्ये तुमाला बी माहित हाय युवा... त्यामुळे उगाच ईरोध करायचा म्हणून करू नका..." बापु फॉर्म मध्ये होते...आज त्याला कोणत्याही परिस्थितीत लग्नाला तयार करण्यासाठी...
" व्हयं माहित हाय ना गावात किती इज्जत हाय आपल्याला...एक वेळ डॉन परवडेल पण आपली दहशत नगं असं वाटतय गाववाल्यांना....म्या नुसतं गाडीने निघालो तरी चालणारी लोक थरथर कापतात...आणं एका जागी च स्तब्ध उभे राहतात ....आण मला माहित नाय का ....आपल्या कोणच्या बिझनेस साठी... ह्या लगीनाला एवढी मोठी रिस्क असुन बी तुमी घेत हायसा त्ये...." पण तो ही हट्टाला पेटला होता आज नाहीच घरच्यांकडून वदवुन घ्यायला...
" तुमाला नक्की काय म्हणायचं हाय..क्लिअर बोला माननीय उपसरपंच युवा जी....." नाना ( दौलत मामा) बोलतात...
" ह्ये ह्येच उपसरपंच ,आणं माननीय कायी कर्तुत्व नसताना बी का माज्या नावाला ...अगदी कपडे शरिराला चिकटल्याप्रमाणे हायसा ना ते का हाय हे मला बी माहित हाय.... जेव्हा पासुन मोठे चुलत बंधू....ते बी दुर दुर चे... मुख्यमंत्री झालेत तवापासुन म्या पाहतोय आपल्या घरातला बदल...वारसदार म्हंजे काय ह्ये बी म्या सोदुन काढलया...गेल्या चार वर्षापुर्वी चं आण तवापासुन चं म्या हे माझं प्रिय गाव सोडलं..." त्याचा आवाज चढला होता...कधी ही आवाज न वाढवणारा ,शांत नावाची किर्ती दुर दुर पर्यंत असलेला युवा आज मात्र आपली सीमा ओलांडत होता...
" हे वारसदार...तुमाला कसं कळालं...." दौलत मामाची मात्र आता बोबडी वळली होती...घरात ते प्रकर्षाने हे नाव घेणं टाळत होते जे तो मात्र बिनधास्त घेत होता....घराण्याचा पारंपारिक तो व्यापार चव्हाट्यावर मांडत होता ते ही बिनधास्त...
" तुमीच तर उड्या मारत मारत आत्ती ला फोन करून माजं लगीनाचा घाट घालायचा परयत्न करत व्हता ना नाना..चार वरसापुर्वी ...तवाच मला कळालं हाय...आणं म्या त्यात भाग घेणार नाय...मला कलेक्टर व्हायचं हाय...म्या पुर्वतयारी केली बी हाय...परिक्षा महिन्याने हाय...तवा म्या सगळं काळं धंदे बंद करणार हायती...आणं त्ये माजं सपान हाय...." तो ही जोशात होता आपलं स्वप्न सांगताना..
" माननीय उपसरपंच...." दौलत मामा त्याला उलट्या हाताने गालावर खाडकन मारणार तोच बापु त्यांचा हात हवेतच पकडतात...
" दौलतराव..तरण्या ताठ्या मुलावर हात उगरण शोबत नाय...तुमी जा तुमच्या कामाला म्या बघतो..काय करायचं त्ये...आदी गोंदळ घातलयसा....आमी आहोतच निस्ताराया..." बापु त्यांना सुनावतात...तसं दौलत मामा काही न बोलता चुपचाप निघून जातात...चुक आपलीच हाय असं मनात पुटपुटत....
" ह्ये बगा युवा...तुमाला जे बनायचं हाय त्ये बना...आमची ना नाय पण तुमी आमी सांगल त्या पोरीशी लगिन करा...." काहीतरी मनाशीच ठरवत बापु दौलत मामा गेल्यानंतर बराच वेळाने आपलं तोंड उघडतात...
" अवो बापु...पण माजं संसारात जीव नाय रमनार...आणं माझं सपान पुरं करू...कि संसार च बगत बसु..." तो ही आता मधल्या शांततेने बराच शांत झाला होता...
" अवो सरकार...आमी तुमच्या सपान मदे आडवं येतच नाय...तुमी करा कि तुमचं सपान पुरं...आमी नाय कदी मणालो...आमचं म्हणणं हाय कि तुमी बस आमी सांगु त्या पोरीशी लगिन करा...बस एवढंच म्हणणं हाय आमचं...आण संसाराच मणाल तर ती पोरं घरात आल्यावर त्यांना बी कुठं येळ असणार हाय संसार मांडायला...त्यांना बी आपला धंदा जोमात चालु करायचा हायच कि...." बापु खुप छान समजावुन सांगत असतात...
" व्हय त्ये तुमी म्हणता त्ये सगळं खरं हाय...पण बापु ..आपलं सगळं चांगलं चाललंय कि ...मग हे वारिसदाराचं खुळ कशापायी....?? कशापायी त्या निरागस पोरीला यात अडकवत हाय...??" युवा ला मात्र यावेळी ईतका वेळ लपवत असलेली आपली काळजी आखिर बोलुन दाखवतोच...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा