" हा आता कसं..." बापु हसत आपल्या मांड्यावर हात मारत बोलतात, " आत्ता चोर सापडला...तर ये लगिन का करणार नाय याच खरं कारण ह्ये हाय तर...ह्ये बगा तुमी जे समजत आहात वारसदार बद्दल तो तुमचा ग्रह हायसा फकस्त...वारसदार ही एक पदवी हाय आपल्या गावची...ज्याच्याकडं ती आसलं...त्योच या गावचा खरा सावकार थोडक्यात ...तुमच्या चं भाषेत सांगायचं तर....नुसतं यात हाणामारी चं नाय चालत तर गावचा विकास बी कसा करल हे गावातील आपल्या त्या पाच पांडवावर अंकुश ठेवायच काम बी हाच वारसदार घराण करतं..." ते त्याला वारसदार यांचा खरा अर्थ समजुन सांगतात...तो त्यांच्या बोलण्यात यायला ही लागतो...
" ठिक हाय म्या तयार हाय...लगीन कराया..." तो बराच वेळ बापुंशी बोलून विचार करून उत्तरं देतो...
" नाय बा...आता नुसतं तोंडी आमाला नगं...सांच्याला आमी कागदपत्र करून आणतो यांचा त्यावर बस तुमी तुमचा अंगुठा उमटवा..." बापु मनातुन खुश असतात पण तरी वरून कठोर पणे बोलतात..तो मात्र बरं म्हणून निघून जातो...सांच्याला बापु कागदपत्र आणतात आणि त्यावर साईन पण त्याची करून घेतात...त्यात एक कोरा कागद ही असतो ..... पण ते त्याला सांगतात कि ते फक्त त्याची गम्मत करत होते...कि तो खरच तयार होतो का हे पाहण्यासाठी आणि हसुन सर्व कागद ते फाडून ही टाकतात...बापुंच हे वागणं मात्र त्याला बुचकळ्यात पाडतं...पण आपल्यावर बापुंचा तसंही पहिल्यापासुन विश्वास आहे त्यामुळे ते खरंच गम्मत करत असतील असा विचार करून तो सर्व सोडून देतो...
पण आता ... वर्तमानकाळात त्याला काही गोष्टींचा उलगडा होत असतो कि हा वारसदार नक्की काय प्रकार आहे ते...जेव्हा ही पार्टी , पृथ्वीराज चव्हाण .. कार्यकर्ते त्यांना भेटायला येऊन शुभेच्छा देऊन गेले होते....तो आपल्याच भुतकाळात रमलेला असताना कानावर काही माणसांचे बोलणं त्याच्या कानावर पडतं... ज्यामुळे त्याचा संशय भितीत निर्माण होतो...कारण आता त्याला कळत कि वारसदार म्हणजे हा मोठ्या डॉन लोकांमधलं एक सत्ताधारी पक्ष आहे...जिथे फक्त नि फक्त गरिबांच्या लुटामारावर चं चालणारा हा कारभार चालविण्यासाठी असलेली एक गादी.....ज्यावर आता आपली च होणारी बायको याने कि मिताली बसणार होती...
यावेळी कायदा या सत्तेसाठी ही आला होता कि यावेळी वारसदार गादीवर फक्त नुकतंच विवाहित असलेल्या स्त्रिया निवडणुकीला उभ्या राहणार आणि त्यातुनच एखादी लोक निवडली जाणार...जी निवडणुक पाच दिवसावर होणार होती आणि म्हणूनच हे या दोघांचं लग्न इतक्या घाईत आणि ते ही आदल्या दिवशी लावत होते मोठे ....त्या दोघांच्या स्वप्नांचा विचार न करता....
" आरं खुळ्या कवापासुन तुला नाना बापु हाका मारत्याती....तु हितं कोणत्या जिंदगीत रमत बसलायसा...." किशा च्या आवाजाने तो वास्तवात आला आणि हातातील दारूचा तो शेवटचा पेग आपल्या घशात ओतला...आणि मान झटकून त्याच्याकडे सुन्नपणे पहायला लागला...
" आरं चल कि बिगीबिगी...तिकडं वहिनीसा ताटकळली हाय तुजी वाट बगुन बगुन..." किशा त्याचा हात पकडत बोलतो...तसं तो ही गपगुमान चालायला लागतो...
" किशा..." तो जाता जाता बोलतो...
" हा बोल कि मर्दा...बाईवानी एवढुसा आवाज का काढाया लागलया..." किशा त्याच्या पाठीत धपका घालत बोलतो...
" किशा हे जे चाललंय ते तुला बी पटतय का...??" तो मध्येच थांबत त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो..
" आरं आसं काय ईपरित घडतंय...?? मोठ्या लोकांना तुमचं लगीन ठरलं म्हणून आनंद झालाय आणं म्हणूनच तर ही पार्टी हाय ना...मग एवढं तोंड पाडाया काय झालय...जणु कायतरी आक्रित घडल्यावानी..." किशा मात्र यापासुन अंजान असतो...त्याला घरात काय चाललंय हे काही माहित नव्हतं...
" किशा...खरं सांगु.. मला हे लगिनच करावसं वाटतं नाही बग..." तो दुरवर असलेल्या मिताली कडे पाहत बोलला...
" आरं असं का करतोयेस मर्दा तु....मला चांगलंच माहित हाय तुला मिता किती आवडत्येय त्ये... लहानपणापासुन तु तिचा दिवाना हाय हे मला काय माहित नाय का..." किशा डोळा मारत म्हणतो...
" व्हय रं...तु बोलतुयास ते शबुद न शबुद खरं हाय...मला ती आवडत नाय असं म्या म्हणतच नाय...पण त्या पोरीची माज्याशी लगीन केल्यामुळे जी वाताहत व्हणार हाय त्ये काय मला बगवनार नाय बा..." तो आपली नजर तिच्यावर ची हटवत उदास चेहरा करत बोलतो...
" आरं...वाताहत कसली...??" पण किशा ला मात्र एक शब्द त्याच्या बोलण्यातला कळत नव्हता..." युवा जे काय बी आसलं ते नीट सांग...उगा कोड्यात बोलू नगं...कारण म्या काय तुजी मिता नाय जी तुज्या त वरून ताक वळखायला..." किशा मात्र अजुन वेगळ्याच मुड मध्ये होता...त्याला हे संभाषण ईतकं सिरियस आहे आणि का तेच समजत नव्हतं...
" किशा...जाऊ द्ये..तुज्या डोस्क्याबाहरच हाय....आपण जाऊ मोठी लोक बसली हाय तिथं...नायतर तुला वरडा खावा लागायचा....ईनाकारण..." तो त्याच्या खांद्यावर हात ठेवत चालू लागतो...किशा ही हा येडाच हाय...मितासारखी मुलगी बायको म्हणून मिळतेय तरी खुळ्यागत करतंय असं मनात बोलत त्याच्या बरोबर चालु लागतो...
" कसला विचार करतोयस एवढा युवा...?? " तिच्याबरोबर डांसला पाठवुन मोठ्याने दिल्याने दोघे एका कोपर्यात उगी मोठ्या लोकांसमोर खुश असल्याचं नाटक करत गेले दहा मिनिटे दोघं डान्स करत होते...पण त्याची हरवलेली नजर एव्हाना तिच्याही लक्षात आल्याने ती बोलायला लागते...ती ही या लग्नासाठी खुश होती अशातला प्रकार नव्हता पण तिने आता आहे ती परिस्थिती स्विकारून सामोरं जायची आपली मनस्थिती केली होती...पण तो मात्र तिच्याकडे एकदा ही पाहत नव्हता याच तिला कसतरी चं वाटलं आणि ती बोलायला लागली..
" हे बघ युवा...आता जे होतंय ते आपल्याला स्विकाराव तर लागणार आहे...तुला किती ही मनात नसलं तरी माझ्याशी लग्न करावच लागणार आहे...तर मग उगाच मोठ्यांना निराश न करता आनंदाने स्विकारू ना हे नातं....हे बघ आता मी तरी हे नातं मनापासुन स्विकारणार आहे...थोडं जड जाईल पण वेळ हळूहळू गेल्यावर कदाचित हा त्यांचा निर्णय आपल्याला पुढे योग्य वाटेल कदाचित...कि..." ती बोलता बोलता त्याच्या डोळ्यांत पाहत असते...तिचं ते मधाळ बोलणं आज त्याच त्याच्याही नकळत हृदय चोरत होतं.... तो तिच्या बोलण्याकडे कमी तर तिच्या कडे चं नजर लावून पाहत होता पण आताच कि मात्र तिचा चेहरा एकदम गंभीर झाल्याने तो ही भानावर आला...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा