" मिताली चला...मुहुर्ताची वेळ झाली आहे..." तिचे बाबा तिला घ्यायला आले होते सोबत तिची मॉम ही होती...दोघांचे चेहरे रडवले झाले होते...पोरं आता आपल्याला पोरकी होणार ही भावनाच त्यांच्या मनाला छळत होती...शेवटी आई बाबा होते तिचे ईतकी वर्षे पोरीला वाढवले,शिकवले....पण जेव्हा कन्यादानाची वेळ येते तेव्हा त्या प्रत्येक मुलीचा बाप हा हळवाच होतो...तसंच काहीस अनिल रावांच झालं होतं...
" बाप्या मी काही आज नाही चालले...लग्न परवा आहे म्हटलं..." डोळ्यांतील आपल्या बाप्याचे अश्रू पुसत ती त्यांना लहान मुलाप्रमाणे बिलगत बोलते..
" माहित आहे गं पण..दोन दिवस अशे भुरकन उडून जातील कळणार ही नाही... मुंबई वरून येताना आपण तिघे आलो होतो तेव्हा वाटलं नव्हतं कि यावेळी जाताना आम्ही परवा दोघेच जाऊ माघारी ...." ते ही तिच्या डोक्यावरुन मायेने फिरवत बोलतात...
" परवा...?? परवा लग्न आहे ना माझं...मग तुम्ही कशे काय...??" तिला त्यांच्या बोलण्याच आश्चर्य वाटतं...
" अगं लग्न लावुन जेवुन चं रात्रीच्या ट्रेन ने जाणार आहोत आम्ही..." मॉम बोलते..
" पण इतकी घाई कशाला..?? चार पाच दिवस राहून जा कि आता...मामा किंवा बापु थोडीच काही बोलणार आहेत तुम्हांला राहिलात तर...त्यांना तर आनंदच होईल ना..." ती..
" हो गं त्यांना आनंदच होईल..पण बेटा आता हे माझं फक्त माहेरच नाही राहिलं तर माझ्या मुलीचं सासर पण आहे... त्यामुळे मुलीच्या सासरी आई बाबांनी रहायचं नसतं असं...अगं पुर्वी तर पाणी ही पीत नव्हते..." आई तिची समजुत काढत बोलते...
" मॉम ..ते जुने रूढी परंपरा मला नको सांगु...तुम्ही दोघांनी अजुन चार पाच दिवस राहुनच जा..." ती आता आपल्या मॉमच्या कुशीत शिरत लहान मुलीने हट्ट करावा तशी बोलत म्हणते...
" नाही गं बाळा...आता कसं समजावु तुला..." मॉम काळजीने म्हणते, " हे बघ हे आपलेच मामा मामी आहेत ...ते काही तुला परके नाहीत...तसं तुला ह्या घरात ईतकं सुख मिळेल कि आम्हां दोघांची आठवण ही यायची नाही...आणि जरी आली तरी मुंबई कुठे लांब आहे...एका रात्रीचा प्रवास ...आठवण आली कि अशी रात्रीच्या ट्रेन ने बस दुसर्या दिवशी मुंबईला...आपल्या घरी.." त्या तिला समजावत असतात...
" हम्म..." ती फक्त रडवेल्या आवाजात हुंकार भरते...
" आत्ती बाहेर समदी ताटकळलेयेत...तुमास्नी बोलवलया...." सुविधा वहिनी त्यांच्या जवळ येत बोलते तसं हो आलोच म्हणून तिला व मिताली च्या बाबांना पुढे पिटाळत या दोघी मायलेक बोलत येतात...
" हे बघ मितु...मामाच घर असलं तरी आता हे तुझं सासर आहे... त्यामुळे बोलताना जरा जपुन बोलत जा...त्यांचा त्यांना मान देऊनच वागत जा...आता या घरची तु नुसती भाच्ची नाहीस तर मोठी सुनबाई सुद्धा आहे...तर जरा रागावर कंट्रोल ठेवा...जीभेवर साखर ठेवा कायम म्हणजे सगळं बरोबर होईल...आणि हो बापुंना आधी सारखं उलट उत्तर देत जाऊ नको या पुढे..." त्या आपलं चालताना ही तिला ईन्स्ट्रक्शन देत होत्या...आणि ती फक्त हो ला हो करत होती...
" हो गं मॉम...तुमची मान खाली जाईल अशी या आधी तरी मी कधी वागली आहे का कि आता वागेल..?? माझी या लग्नाला किती ईच्छा होती हे तुला ही माहित आहे कि पण तरी तुमच्या खुशी साठी मी तयार झाले आहे हे तुला तर चांगलच माहित आहे...मला तर हे सुद्धा माहित नाही कि आपला आणि मामांचा कसला पुर्वपरंपरा असलेला बिझनेस आहे ज्यासाठी तुम्ही दोघं ही आतुरतेने वाट पाहत आहात या लग्नाची..." ती आपला घागरा संभाळतच चालत बोलत असते..
" शु...आता याबद्ल सध्या चर्चा नको...स्टेज आलाय जवळ ...तु जा ...युवा आधीच येऊन थांबलेत तुम्ही ही जा त्यांच्याबरोबर ....आणि हो मी दिलेले संस्कार कायम लक्षात ठेव..." त्या तिला दटावत डोळ्यांनी च वर जा म्हणून खुणावतात तशी ती काही न बोलता गुपचुप वर जाते आणि त्याच्या जवळ जाऊन बसते...पुढे मग गुरूजी सांगतिल तसं दोघ करत होते...
युवा मात्र मनातुन बिलकुल खुश नव्हता...त्याची नाराजगी त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती...पण आता ती पाहुन ही न पाहिल्यासारखी वागत होती...कारण आसपास बरेच लोक होते...आणि असं बेधडक बुर्ली सारख्या छोट्या गावात चाललं नसतं म्हणून ती ही शांत आपलं गुरूजी जे बोलत आहे ते ऐकुन करत होती...अंगठी घालायची वेळ झाली...जसा तो क्षण जवळ आला आणि तिचा हात त्याच्या हातात आला ...अंगठी घालण्यासाठी ...तसे त्याचे डोळे आनंदाने चमकले...
" ज्या क्षणांसाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो इतकी वर्ष तो आखिर आलाच म्हणायचं..." तो मनातल्या मनात बोलला, " पण अजुनही मला पळून जावस वाटत आहे..." त्याच्या या मनाच्या द्विधा स्थितीत तो आताच्या या वर्तमानाकाळातील महत्वाच्या क्षणी ही अडकला होता...अंगठी अजुन त्याने नीट घातली ही नव्हती...आपल्या बोटांत घट्ट पकडून होता...तर तिच्याबरोबर आत्ता सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते कि तो का घालत नाही अंगठी म्हणून...
" दाजी ...अंगठी..." मागे त्याच्यासाठी अंगठी घेऊन उभा असलेला तिचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ विवेक बोलतो...विवेक लंडनला आपलं पोस्ट ग्रेड्युॲशन पुर्ण करत होता... महिनाभरापूर्वी चं तिचं लग्न ठरलेलं त्याला माहित होतं... त्यामुळे खास सुट्ट्या घेऊनच तो भारतात नुकताच अर्ध्या तासापुर्वी तिला सरप्राइज करण्यासाठी आला होता...आपल्या भावाला पाहुन तिला खुप आनंद होतो कि आपला साखरपुडा आहे हे ही विसरून जाते आणि विवेक कडे पळत जाते...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा