" भैय्या..." म्हणत त्याला आनंदाने आलिंगन देते..डोळ्यांत आसवांचा पुर आला होता...जवळ जवळ पाच वर्षांनी त्याला पाहिलं होतं तिने...त्याच्या ही नकळत डोळे पाणावले होते...आणि त्या दोघांमधलं प्रेम पाहुन पाहुण्यांचे ही...
" मितु..." पाच मिनिटांनी शेवटी तिचे बाबा च तिला तिच्या भैय्या पासुन वेगळे करतात आणि युवासमोर उभे करतात...भैय्याला ही खरंतर हे लग्न असं अचानक मान्य नव्हतं पण मोठ्या लोकांसमोर तोंड उघडायची त्याचीही हिम्मत नव्हती..तसं तो युवा ला चांगलं ओळखत होता..आणि युवा किती परफेक्ट आहे आपल्या बहिणीसाठी हे माहित असल्याने ही तो काही बोलत नव्हता..
" ते तिचा भैय्या पाच वर्षांनी आला ना ... त्यामुळे ती जरा भावुक झाली..आपल्या भैय्याची एकुलती एक बहिण आहे ना शेवटी...सॉरी तिच्यावतीने..." बाबा गुरूजींची माफी मागत त्यांना आपल्या मुलांबद्दल असलेलं प्रेम समजावुन सांगतात, तसं गुरूजी हातानेच असु द्या हसत म्हणतात...तसं बाबांचं ही मनातलं टेंशन दुर होतं..." जावईबापु अंगठी घालताय ना..." ते युवाला आठवण करून देतात तसं तो ही मग काही न बोलता शांततेने तिच्या बोटात अंगठी घालतो...बाबा मग तिला त्याच्या बोटात अंगठी घालायला देतात...ती आपल्या भावाकडे एकदा बघते तसं भाऊ घाल बिनधास्त असं नजरेनेच सांगतो...तशी ती युवाच्या बोटात अंगठी घालते...पण घालून झाल्यावर युवाच्या हाताला दुसर्या हाताने घट्ट पकडून विश्वास ही देण्याचा प्रयत्न करते ..." जास्त काळजी करू नको...आपण दोघं व्यवस्थित आपलं भविष्य सुरळीत करू.." ती कुणाच लक्ष नाही पाहुन हळुच त्याच्या कानात सांगते...
साखरपुडा पार पडतो निर्विघ्नपणे...आणि बघता बघता लग्नाचा दिवस ही आला....आता मात्र युवा ही बराच सावरला होता...जे होईल ते बघता येईल असा विचार करत चं तो आज मांडवात उभा राहिला होता....ती ही आता त्याची बायको म्हणून वावरायला समाजात तयार झाली होती मनाने ही ...आणि त्यात तो आपल्यावर किती प्रेम करतो याचा अंदाज तिचा दिर आणि एकेकाळचा चांगला मित्र किशा तिला सांगत होता मध्ये मध्ये.... त्यामुळे आता आपल्या नशिबासोबत आपल्या आईवडिलांबद्ल ही मनात तिच्या प्राऊड फिल होतं होता...
लग्न लागलं...दोघं ही त्या नव्या नात्यात बांधले गेले..तो तिचा किंचितसा स्पर्श हवाहवासा वाटणारा युवाला मनाला गुदगुल्या तर करून जात होताच पण अजुनही भविष्याच सावट काही मनातुन दुर जात नव्हतं...पुजा देवदेव ही त्यांनी व्यवस्थित पार पाडले...ती त्याला मनापासुन दिलासा देत होती कि ती कायम त्याच्याबरोबर किती ही मोठं संकट आलं तरी असणार आहे...अगदी सावली प्रमाणे....त्याला ही तिच्या त्या आश्वासक डोळ्यांत प्रेमाबरोबर विश्वास ही दिसत होता....पण तो अजुन तिच्याबरोबर व्यक्त असा होत नव्हता...कारण कोण ना कोण तरी त्या दोघांबरोबर कायम असायचं त्यामुळे बोलता येत नव्हतं असं निर्धास्त पणे...त्यात जरा युवा बायकांबाबत बुजरा चं होता पहिल्यापासुन...तिचे आई-वडील व भाऊ ही लग्न लागताच त्याच दिवशी रात्रीच्या ट्रेन ने मुंबईला माघारी गेले होते...
" युवा तुम्हांला नाही वाटत कि आपल्या बायकोबरोबर जरा बसावं ,बोलावं..." पुजा झाल्यावर रात्री तिला त्याच्या खोलीत झोपायला मोठ्यांकडून परावनगी मिळाली तसं ती आपल्या खोलीत स्वयंपाक घरातलं आवरून आली होती आणि तिथंच काहीतरी हिशोब मांडत असलेल्या आपल्या नवर्याला ,युवाला बोलली...आता पहिल्यासारखे ती त्याला अरे तुरे न करता अहो जाओ करायला लागली होती...त्याला ते ऐकुन जरा बरं वाटलं होतं...
" त्यात काय बोलायचं असतय..." तो आपली वही तिथल्याच एका टेबलवर ठेवुन बल्ब विझवुन परत बेडवर झोपत बोलला, " हे बघा मला लय कटाळा आलाय ...आणं उद्या कोल्हापुरला बी जायचं हाय...परिक्षा हाय माझी परवा... त्यामुळे मित्राच्या रूमवर दोन दिस जाणार हाय...तर मला आता झोपु द्या गपगुमान आणं तुमी बी आता झोपा..सकाळपासुन सयपाक घरात राबुन पार भुट्टा पडला असाल तुमचा..." तो अंगावर चादर ओढून बोलतो आणि डोळे बंद करून लगेच घोरायला ही लागतो...
त्याचं असं बोलणं आणि असं अरसिक मात्र तिला मनात दुःखी बनुन जातं...ती तशीच तिच्या पहिल्या रात्री ...त्याच्याकडे पाहत रात्रभर जागी च राहते ...मनात अनेक विचार तिच्या गुंजी घालत असतात....पहाटे पहाटे तिला कधीतरी डोळा लागतो...सकाळी याला नेहमी प्रमाणे लवकर जाग येते....ही तशीच बेडला टेकून झोपलेली त्याला दिसते...त्याच्या चेहर्यावर आपुसकचं एक गोड अशी स्माईल येते...
" झोपल्यावर चं तुमी लय ग्वाड दिसता बगा....मला लय बोलता बी येत असं तुमच्यावानी बिनधास्त...नायतर दिसभर हे तुमचे डोळे पिच्छा पुरवत असतात मला नाय नाय त्या सवालानं..." तो तिच्या केसांवरून हात फिरवत बोलतो...खाली वाकून तिच्या ओठांवर ओठ टेकवायचा त्याला खुप मोह होतो पण तो ते जाणीवपूर्वक टाळून तिच्या केसांवर आपले ओठ टेकवतो...पण त्याच्या या स्पर्शाने तिच्या चेहर्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं झोपेतही...तो मग सावकाश तिला खाली सरकुन डोक्याखाली उशी ठेवुन आपल्या रनिंग साठी निघून जातो...
सकाळी हिला उशीरा जाग येते...रात्रभर जागी राहिल्याने...आळोखे पाळोखे देत असतानाच ती शेजारी पाहते तर हा काही तिला जागेवर दिसत नाही...ती जवळच पडलेल्या मोबाईल वर वेळ पाहते...सात वाजलेले असतात...
" ओह शीट...आज तर हे लवकर कोल्हापूर ला जाणार होते..." ती बडबड करतच आपल्या केसांचा जुडा बांधते घाईघाईत च पांघरूण च्या घड्या घालते आणि लगेच बाहेर पडते...वाड्यात अजुन प्रत्येक खोलीला वेगळं बाथरूम ॲटेच्ड वैगेरे हा प्रकार नव्हता ...खाली दोन मोठी न्हानी घरं होतं जुन्या काळातील...ती आपले कपडे येतानाच घेऊन आली होती...गरम पाणी हवं असेल तर बाहेर एक चुल होती त्यावर गरम पाणी उकळायला ठेवलं जायचं...केस तिला धुवायचे होते म्हणून ती कपडे एका न्हाणीघरात ठेवुन पटकन बाहेर जाते...
" थोरल्या सुनबाई...हे ईतका येळ घरात बाईमाणसाने झोपुन राहिलेलं नाय चालणार..." बाहेरच उभा असलेला दौलत मामा गरजला तसं बाहेर अंगणात तिचं लक्ष गेलं...सर्व पुरूष , दोन्ही मामा, बापु व किशा तिथं उभे राहून ब्रश करत असतात...बायका घरातील मात्र कुठे दिसत नसतात...त्यांचं बोलणं ऐकुन ती घाबरून जाते आणि गरम पाणी घ्यायला गेलेली ती फक्त हो म्हणून मान हो मध्ये डोलावते आणि परत आत येऊन पुढच्या दहा मिनिटात अंघोळ करून येते...केस सुद्धा ती गार पाण्यानेच धुते...
खरतर पहिलाच अनुभव असा आई वडिलांशिवाय या वाड्यात असल्याने ती बावरून गेली होती आणि त्यात आज कधी नव्हे ते उशीरा ही उठली होती... त्यामुळे आपलीच चुक आहे असं स्वतः ची समजुत काढून ती शांत होती...नाहीतर तिने दौलत मामा ला कधीच उलट उत्तर देऊन गप्प बसवलं असतं...उगीच सकाळ सकाळ कुठे चिडचिड करतेस असा विचार करूनच... मुंबईत तिची लाईफ स्टाईल वेगळी होती...तिला आधी रनिंग करून आल्यावर पहिला चहा लागायचा...ते ही आयता मिळत होता आईच्या हातचा...पण हे तर खुप नोर्मल आहे... प्रत्येक मुलीला छोट्या मोठ्या अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात सासरी आल्यानंतर हे आईचे वाक्य मनात रूंजी घालत असल्याने ती पटापट पुढच्या दहा मिनिटात आवरून येते...पण ती नेहमीप्रमाणे तिचे शर्ट ...ते बाह्या फोल्ड केलेले आणि जीन्स घालुन येते...
" अहो जाऊबाई..." तिला किचनमध्ये आलेलं पाहुन सुविधा तिच्या पेहरावाकडे पाहत ओरडते...तसं स्वयंपाकघरात चहा घेत असलेले बापु व दौलत मामा चं लक्ष जातं...दौलत मामाचा आता रागाचा पारा सातव्या आस्मानांवर होता...
" थोरल्या सुनबाई..." ते कडाडतात, " हे असले पुरूषी पोशाख आता घालणं बंद करा पयल..." त्यांचा राग मात्र पाहुन ती ही आता थोडी चिडलीच होती...
" पण दौलत मामा...मी तर हे कपडे कालपर्यंत घालत होते...तेव्हा तर तुम्ही आक्षेप घेतला नाही.." तिने आता शेवटी तोंड उघडलेच...ते ऐकुन तिच्या मामीने ,जी ईतका वेळ शांततेने पाहत होती तिने तर हातचं मारून घेतला डोक्यावर ...
" थोरल्या सुनबाई... ताईसाहेबांनी तुमच्यावर चांगले संस्कार केलेच नाहीत हे परत दिसुन आलं आज ही ... मोठ्याने तेही आपल्या सासर्याच नाव घ्यायची पद्धत नसते एवढे पण ताईसाहेबांनी संस्कार केले नाहीत..." दौलत मामा कडाडला... डोळ्यांत रागाचे अंगारे दिसत होते.... त्यामुळे लाल भडक क्षणातच डोळे झाले होते..." पण आमचा ईश्वास व्हता दाजींवर कमीत कमी ते तरी तुमचं संगोपन नीट करतील...पण कशाच काय...आधी त्यांनाच द्यावे लागतायेत वाटत संस्कार..."
" पण मी तर तुम्हाला..." ती अजुन बोलतच असते कि तिची मामी मागुन च तिला शांत बस म्हणून डोळ्यांनी खुणावते...तशी ती गप्प बसते...
" दौलतराव..आवरा...का सकाळ सकाळ आपल्या ताईसाहेब व दाजींवर वरडताय...आणं पोरं लहान हाय...असं अचानक त्यांच लगीन झालं हाय...सगळं घरातलं समजुन घ्यायला येळ तर लागणारच ना त्यांना...आधी ह्या घरच्या त्या भाचीसाहेब होत्या.... त्यामुळे घरात चार दिस येऊन हसत खेळत वरसातुन एकदा येणार्या ...त्यांना आपले लगेच रितीरिवाज कसं माहित असणार..." बापु दौलत रावांवर आता आवाज चढवत बोलतात...बापु आपल्या या एकुलत्या एक नाती बाबत हळवे होते खुप...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा