" राणो ( तिला लाडाने ते एकटेच राणो म्हणायचे) जा कापडं बदला..आणं साड्या नेसा आता पासुन....आणं नसतील तर युवाच्या आई किंवा सुविधा ला घेऊन जावा कोल्हापुराला आणि घेऊन या आपल्याला हवी ती कापड...म्या युवाला सांगतो तुम्हा दोघींना न्यायला आजच..." बापु खुप शांततेत तिला बोलतात...
" बापु ...युवा घरात नायसा...सकाळच्यालाच त्ये बी कोल्हापुरात गेल्याती...आता उद्याचाला रातच्याला येणार हाय..." मामी हळूच बोलल्या...त्यांची मान खाली होती ...
" त्यांना घरातल्यांना सांगायची काय पद्धत बिद्धत शिकवली नाय का धाकल्या सुनबाई... दौलतराव तुमास्नी तरी सांगुन गेलेत ना युवा...??" आता बापुंच्या आवाजात जरब होती...
" नाय बा...सकाळच्याला म्या धारा काढाया गेल्तो ... त्यामुळे नाय दिसलं युवा ....आमास्नी..." त्यांनी एक जळजळीत कटाक्ष आपल्या बायकोकडे टाकला...आणि हळूच बोलले...
" बगितलत.... दौलतराव...हितं तुमी आपल्या ताईसाहेब चे संस्कार काढत व्हता पण तुमी तरी कुठं आपल्या प्वोराला संस्कार लावलेत...?? आण धाकल्या सुनबाई...तुमांला बी त्यांना अडवता आलं नाय का...?? अवो आजुन ओल्या हाळदीच आंग व्हतं त्यांचं...एवढं सादं बी ध्यानात येईना का आता..." बापुचा पारा चांगलाच चढला होता...मुलीलाच काय आता ह्या गावातच इतकी वर्षे वाढणार्या आपल्या धाकट्या मुलाला साधं आपला मुलगा कुठे आहे काय करतोय हे सांगण्याचे संस्कार शिकवावे लागत होते परत...
" बापु अवो त्याची ती एक्साम का काय हाय त्याला गेल्याती त्ये...आणिक तुमाला तर तुमचे नातु माहिती हायती कि कसं हायती त्ये..." दौलतमामा तोंड पाडून बोलतात...त्यांना खरच सध्या खुप राग आला होता...आत्ता जर युवा त्यांच्यासमोर असता तर नक्कीच त्याने ओल्या फांदीच्या फोकाने मार खाल्ला असता...
" बरं बरं आता काय बोलणार तुम्हास्नी आमी...जावा आता जरा शेतातली कामं पहा ...प्वोर नाय घरला तर त्याच दोन दिस तुमालाच काम बगाव लागलं..." बापु शांत होत बोलतात..." आणि प्वोर तु आणं सुगणा कोल्हापूर ला जावा आजच...आणिक घेऊन या हवं ते...म्या गाडी आण चालक मागवतो..." बापु मिताली ला बोलतात तसं मिताली मान घालून फक्त हो म्हणते आणि आपल्या खोलीत निघून जाते...
" शी बाबा ..काय ही कटकट ...आता रोज साडी नेसायची...?? मला तर एक तास संभाळण ही मुश्किल होऊन जातं आणि आता चोवीस तास , तिनशे पासष्ट दिवस तिला संभाळायचं..." ती आपल्या खोलीत येऊन बेडवर आपला मोबाईल फेकते आणि चिडचिड करत बोलते..
तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो ..ती मोबाईल बघते तर अननोन नंबर असतो...ती त्यामुळे तो घेत नाही...पण दोन तीन वेळा त्याच नंबर वरून सलग कॉल आल्याने वैतागुन ती कॉल उचलते...
" एवढी साधी गोष्ट कळत नाही का कि समोरची व्यक्ति जर कॉल उचलते नसेल तर ती कशात तरी बिझी असेल किंवा तिला कॉल घ्यायचा च नसेल म्हणून..." ती रागाच्या भरात च कॉल उचलताच बरसते...समोरची व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायची ही तिची ईच्छा नाही हे तिच्या अशा रूड बोलण्याने समोरच्या व्यक्तीला ही समजतं..पण तो कॉल कट न करता आणि नाही तिला काही अपोज करता बोलून देतो...
" आत्ता म्या बोलू..." समोरची व्यक्ती बोलते आणि तो आवाज ऐकुन इतका वेळ चिडलेला तिचा चेहरा आणि आवाज दोन्ही ही एकदम शांत होतात ...झटक्यात त्याच रूपांतर प्रेमात होतं...
" युवा...तुम्ही...??" ती स्वतः च्या अशा वागणुकीमुळे स्वतः च खजिल होत नम्रतेने विचारते..
" हम्म..म्याच..." तो हसत बोलतो, एव्हाना आता तिच्या बोलण्यावरून ती स्वतःच पश्चात्ताप करत असेल याची कल्पना त्याला ही समजायला लागली होती..गेल्या चार पाच दिवसांपासून तो फक्त तिचं तर निरीक्षण मन लावुन जे करत होता...शेवटी बचपण का प्यार था ...
" त्ये बापु ने कॉल केल्ता ..तुमच्या साड्या का काय आणायचं हाय ना.." तो ती काहीच बोलत नाही हे ऐकुन पुढे बोलायला लागतो...ती बोलत नसते कारण तो असं कधी तिला स्वतः हुन कॉल करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... त्यामुळे चेहरा आनंदाने मोहरुन गेला होता पण आत्ताचे त्याचे पुढचे शब्द तिच्या कानावर पडले आणि चेहरा पुर्ण फिका पडला..." मला वाटलं याला माझी आठवण आली म्हणून याने मी कशी आहे हे चौकशी करायला फोन केला आहे...पण मितु ह्याने..." ती स्वतः च्याच विचारांत इतकी हरवली कि त्याचा फोन सुरू आहे आणि आपण मोठ्याने बोलत आहोत ह्याचं ही भान तिला राहिलं नव्हतं...
" नाय तसं काय बी नाय..." तो बोलतो तिकडून तशी ती भानावर येते...
" अं काय नाही..." त्याच वाक्य मात्र तिच्या मनात गोंधळ निर्माण करतं...त्यानं आपलं बोलणं ऐकलं आहे हे ही तिच्या अजुन लक्षात आलं नव्हतं...
" नाय म्हंजे मला सय नाय आली तुमची...आभ्यास खुब है ना..." तो कसंबसं बोलला...जणु आपल्या भावना तो मनात दाबुन बोलत होता...
" हा का पण मी तर तसं काहीच बोलली नाही तुम्हांला..." ती अजुनही संभ्रमात...
" व्हयं..." त्याला समजतं कि तिला आपण काय बोलून गेलो ते माहित नाही त्यामुळे तो शांत होतो, " त्ये सब जाने दो...तुमी एक काम करता का ..तुमी एकट्याच तिथुन याल का..?? ...त्याच काय ना कि सुविधा वहिनींना त्यांच्या माहेरी जायचं हाय गौरी गणपतीला ..."
" ऑल राईट...मी येते एकटी ...बापुंना सांगुन गाडी आणि ड्रायव्हर ला बोलावुन घेते..." ती सुपर एक्सायटेड होतं बोलते...जे का तेच तिला कळत नाही...
" आरं त्याची बी तुमी काळजी नका करू...अलरेडी अर्ध्या तासातच बंड्या,माझा गावातला मित्र हाय त्यो आपली गाडी घेऊन वाड्याजवळ आला असेल..." तो माहिती देतो...
" बरं ..." ती बोलते " पण मी घालू काय...??" पुढे ती स्वतः शीच परत बोलते...
" त्ये कपाटात एक पॅकेट हाय त्ये बघा तुमाला व्हतय का...??" तिचा तो सवाल ऐकून तो गालातल्या गालात हसत बोलतो...त्याला समजतं कि शेवटचं वाक्य ती स्वतः शीच बोलली असणार पण ॲस युजवल मोठ्याने बोलली असणार...
" काय..?? तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट ठेवलंय..." ती मोठ्याने ओरडते...तिला विश्वास च बसत नव्हता कि युवाला ,तिच्या नवऱ्याला अशा ही आयडिया सुचत असतील...ती तर त्याला पुर्ण गावंढळ समजत होती...हे असं आपल्या प्रेयसी ला ,बायकोला रोमॅंटिक सरप्राइज गिफ्ट देणं गरजेचं असतं हे समजत असेल...असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं...
" एवढ सारख का वरडताय ...?? म्या आता तुमचा नवरा हाय... त्यामुळे तुमची काळजी घेणं माजी जिम्मेदारी हाय एवढ मला बी कळतंय कि..." तो एक हात आपल्या कानावर ठेवत बोलतो....
" हो हो .." ती अजुन च मोठ्याने आनंदाने बोलते, " बरं आता फोन ठेवते आणि गिफ्ट पाहते तुमचं.." म्हणत ती त्याला संधी ही देत नाही पुढं बोलून द्यायच आणि लगेच कॉल कट करून कपाटात ते गिफ्ट घेऊन ओपन ही करते...त्यात एक निळ्या रंगाची पैठणी असते...त्याच्यावर मॅंचिग असा ब्लाऊज ही असतो जो रेडिमेड शिवलेला होता..तिच्याच मापाचा...
" ब्युटीफूल ..." ती साडी ओपन करत उत्साहात बोलते...तिला ती साडी खुप आवडते...ती आरशात स्वतःच्या खांद्यावर टाकून स्वतः ला न्याहाळत असते, " पण मी नेसणार कशी...?? मला तर नेसता ही येत नाही ..." ती स्वतः शीच पण मोठ्याने बोलतो...
" वहिनी चला मी तुम्हांला साडी नेसुन देते...." शेजारची तिच्याच वयाची बनी नावाची मुलगी तिच्या खोलीत येत बोलते..." व्वाव वहिनी तुम्ही कसला भारी दिसताय...हा रंग खुलून दिसतोय तुम्हांला..."
" बनी ...तु आय मिन तुम्ही हिथं...?? आणि तुम्हांला या साडीबद्दल कसं कळालं...??" तिला असं अचानक पाहून ती गोंधळून जाते...
" ते मला भाई ने सांगितल....बरं ते सर्व जाऊ द्या ...आपल्या कडे वेळ खुप कमी आहे..बंड्या दादा येईल दहा मिनिटांत...." ती तिच्या हातात ब्लाऊज व परकर ठेवत बोलते...बनी ,बंड्या म्हणजेच युवाचा लहाणपणा पासुनचा मित्र ...आणि बनी त्याची सख्खी बहिण ...जी युवाला बहिण नसल्याने बंड्या बरोबर त्याला ही राखी बांधत होती...बनी तिला मस्त चोपुन साडी नेसून देते...खुप गोड दिसत असते...बनी आपल्या डोळ्यांच काजळ तिच्या गोर्या मानेला लावते ..तोच बंड्या आलेल कळतं आणि मिताली ही त्याच्या गाडीत जाऊन बसते...ओढ असते त्याला भेटण्याची...असं एकांतात ते आज पहिल्यांदाच भेटणार होते.
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा