Login

अशी ही एक लव्हस्टोरी पार्ट ३

एका तरुण कलेक्टर ची कहाणी
वर्तमान काळ

" आपली पहिली भेट ही अशीच गुश्शात झाली आणि शेवटची ही ...तुला आठवत असेन का रे युवा..." खुर्चीत डोळे मिटून भुतकाळ आठवत असलेली मिताली आपल्याच मनाशी बोलते व थोड्यावेळ तशीच रडून आपल्या रूममध्ये येते..


" अरे तु...?? तु हिथे काय करतोय.." बेडवर निवांत पहुडलेल्या  समोरच्या व्यक्तीला असं आपल्या रूममध्ये अचानक पाहुन तर तिला चांगलाच घाम फुटला होता...


" आता नवराच तुमच्या  रूममध्ये येणार ना.. कि तो तुमचा लुळापांगळा  बॉडीगार्ड आलोक येणार हाय ..." हातातलं मंगळसुत्र गोल फिरवत समोरची व्यक्ती बोलली..


" व्हय धनी तुमीच येणार ..पण असं अचानक का धाड मारावी..त्ये बी आमाला न सांगता.." ती त्याच्याजवळ जात बसत लाडिकपणे म्हणते...


" आता...ही रूम आमच्या कारभारीण ची, कारभारीण आमची मग आम्ही धाड मारू नायतर गुपचूप येऊ ...आपनास्नी काय..??" समोरची व्यक्ती ही लाडात आली होती..तिच्या दोन्ही  खांद्यावर आपले दोन्ही हात गुंफत मिताली च्या डोळ्यांत डोळे घालून बोलते...


" जास्त लाडात येऊ नका राज..." ती त्याच्या हातातलं आपलं मंगळसुत्र घेत बोलते...तो मात्र तिला ते घेऊन चं देत नसतो...


" द्या ना ओं..किती छळताय आपल्या बायकोला..." ती तो काही मंगळसुत्र देत नाही म्हटल्यावर थोडंसं नाराज होत म्हणते..


"एवढं च प्रिय व्हतं तर काडलच मग कशाला...?? " तो तिला रागवत बोलतो..


" अवो कार्यालयात जायचं होतं ,उगाच विषय नको म्हणून काढलं ना...आणि हे सर्व तुम्ही चं सांगितलं होतं ना ॲटो ग्राफ मागताना... तरी तुम्हीच बोलताय म्हणजे नवल चं आहे..." ती आरशासमोर उभा राहत म्हणाली..


" व्हय व्हय माहितेय कि ..किती ऐकतासा माजं त्ये..." तो तिच्या गळ्यात मंगळसुत्र घालतो व तिथंच ड्रेसिंग टेबलावरच कुंकू घेऊन तिच्या भांगेत लावतो...

" मगाशी काय आमास्नीच याद करत व्हता वाटतं...??" तो तिला आरशात बघत चं मागुन दोन्ही खांद्यावर हात ठेवत बोलला...


" तुम्हांला..?? तुमची का आठवण काढू आम्ही...?? मी माझ्या युवाची आठवण काढत होते.." ती आपलं गळ्यातल्या मंगळसुत्राशी खेळत थोडीशी लाजुन तर थोडी ॲटिट्युड दाखवत बोलते..


" युवा...त्यो येडा युवा..." तो मोठ्याने हसत बोलतो..


" ओ..." ती त्याच्याकडे तोंड करत आपले एक बोट दाखवत बोलते, " हे बघा..त्याला असं हसायचं नाही हं...तो माझ्या जीवाचा तुकडा आहे...परत जर असं हसलात ना...तर ..."


" तर ..तर काय कराल कारभारीण...??" तो अजुन हसतच आपल बोट तिच्या त्या बोटात गुंतवुन तिला एकदम आपल्या जवळ ओढतो...तशी ती त्याच्या अंगावर पडते...बेसावध जी असते...तर त्याचा ही तोल जातो आणि ते दोघं ही जवळच असलेल्या कॉटवर पडतात...तिचे हात त्याच्या छातीवर असतात...दोघे ही नजरेत कैद झालेले असतात एकमेकांच्या...तो हलकेच तिची पुढे आलेली बट  आपल्या राकट हाताने मागे घेतो...


" सांगा ना ..कारभारीण काय कराल ?? " तो हसत बोलतो...


" जे आता दात विचकत दाखवत आहात ना ते एकाच बूक्कीत पाडेल..." ती ही हसत  आपल्या हाताची मुठ दाखवत त्याला बोलते...


" अरे वाह...माज्या रावडी बाई आल्या वाटतं जोमात.." तो त्या मुठीवर आपले हलकेच ओठ टेकवून बोलतो तशी ती ही हसते...दोघे ही परत आपल्या नजरेत हरवुन जातात...


चार वर्षांपूर्वी भुतकाळ


" बाप्या ,तुला किती वेळा सांगितलं आहे कि आम्हाला घ्यायला तुच येत जा म्हणून..." मिताली घरात शिरताच ओरडतच आत येते... सरपोतदार तिला डोळ्यांनी च खुणवत असतात शांत रहा म्हणून...


" काय आहे ..?? असा का बघतोय तु बाप्या ...तुझ्या अशा नजरेने मी काही तुला माफ करणार नाही हं....आज तु खुप मोठी चुक केली आहे त्या रावड्याला पाठवुन..." ती रागातच बघत त्यांच्याकडे बोलते...


" ही काय पद्धत आहे मिताली‌‌....?? आपल्या वडिलांशी तुम्ही असे अरे तुरे बोलुच कशे शकता...." मागुन तिच्या एक भारदस्त आवाज ऐकु येतो ,तशी तिची घाबरगुंडी उडते...ती मिस्टर सरपोतदारांकडे पाहुन डोळे बारीक करून पाहत असते, कि मला यांच्या तावडीतुन वाचव म्हणून...ते मात्र शांत उभे असतात...


" अनिल राव,तुमास्नी आमुच्या सुनबाईंना काही शिस्त लावता आली नाय बगा...संस्कारांचा ही धुरळा उडवला हाय यास्नी..." तो भारदस्त आवाज आता सरपोतदारांच्या पुढे उभे राहुन,त्यांच्या एका खांद्यावर आपला तगडा हात ठेवत बोलतात...


" ओं आजोबा, जे काय बोलायचं आहे ते मला बोला...माझ्या संस्काराविषयी, माझ्या शिस्तीबद्दल बिलकुल माझ्या पप्पांना काही बोलायचं नाही...तुमच्या संस्कारापेक्षा ही माझ्यावर माझ्या आई वडिलांनी उत्तम केलेत ते... आणि हो अजुन एक ,मी तुमची सुनबाई नाही तर आधी नातीन ,तुमच्या लाडक्या लेकीची मुलगी पण आहे..." मिताली धाडधाड बोलायला लागते...


" मितु ,जरा शांत बसशील का...?? " तिच्या आई तिच्या कानात जरा भितभीतच बोलतात....


" आता कशापायी रागावताय ताईसाहेब ‌....आदी संस्कार लावायचे नायित आण आता..." ते त्या दोघींकडे पाहत बोलत असतात,


" तुमी सर्व शांत रहाल का ...?? चवाणांच्या वाड्यात येवढी कसली गडबड म्हणून बगायला जमाव का आख्ख गावं..." शेरशहा चव्हाण समोर येत म्हणतात..." मितु, ताईसाहेब...तुमी आताच आला आहात तर जा आत आण आराम करा थोड्यावेळ मग आपण बोलू...कारभारीण ,ओं कारभारीण..‌" ते हाक मारताच एक चाळीशी तील नऊवारी लुगडे नेसलेली महिला येते व या दोघींना आत घेऊन जाते...


           मला माहित आहे तुम्ही गोंधळून गेले असाल...काय चालले आहे कथेत असा प्रश्न पडला आहे ना तर चला ओळख करून देते कि चार वर्षांपूर्वी च्या संभाषणात कोण कोण सामिल होतं...मिताली तिच्या मामाच्या गावी आली आहे..सांगली तालुका असलेल ,बुर्ली नावाचं छोटंसं गाव वसलेलं...गाव तसं हजार दोन हजार लोकांच ईतकं लहान...या गावात चव्हाण हे कुटूंब गावातील एक प्रतिष्ठित असं घराणं...या घराण्यात बापु चव्हाण ,वयवर्ष ८० च्या आसपासचं...वय जास्त असुनही अजुनही हे तरूणांना ही लाजवेल अशें दिसत‌... एकेकाळी पैलवान होते गावाचे...त्यांना तीन मुल,दोन मुलं आणि एक मुलगी...मोठा मुलगा ,शेरशहा ,दुसरी मिताली ची आई..जिला ताईसाहेब म्हणत या गावात तर तिसरा मुलगा , दौलत...


        शेरशहा यांना एकच मुलगी राजश्री,जी सध्या आपल्या नवर्या बरोबर अमेरिकेत राहते... ताईसाहेब यांना दोन मुलं, मिताली व विवेक...तर दौलत रावांना दोन मुलं, युवा आणि किशा....मितालीच्या आजोबांची मिताली च्या लहानपणापासून खुप ईच्छा होती कि मिताली   ला आपली नातसुन बनवायची...तिच्या आजीची शेवटची ईच्छा म्हणा हवं तर...बापु...खुप शिस्तीचे...घरातील इकडची काडी तिकडे होता कामा नये हे संस्कार... रितीरिवाज ही कडक होते...अजुन ही या घरात शिवताशिवत मानत होते...महिन्यांच्या त्या पाच दिवसात अजुनही मिताली च्या दोन्ही मामी घराबाहेर बसत होत्या...कारण बापुंना पाणी ही त्याकाळी चालायचं नाही...पण मिताली च्या घरचं वातावरण वेगळं होतं कारण ते शहरात याने मुंबईत वाढलेले....शेरशहा मामा एकवेळ परवडेल,मवाळ असल्याने पण दौलत मामा सेम आपल्या वडिलांवर गेलेला... त्यामुळे चं तिला या घरात यायचं  नव्हतं...तिचं युवाबरोबर लहानपणीच आजोबांनी ठरवलेलं लग्न... तिच्या वडिलांची ही तशी इच्छा नव्हती या घरात तिला द्यायची पण...असो..कारण कळेलच पुढे...युवा ही आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणारा कि कसा आहे हे ही कळेल पुढे पुढे च...किशा, याच लग्न आधीच झालं होतं, जवळच्याच गावातील एका प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी सुविधा  नावाची सुन म्हणुन आणलेली...
0

🎭 Series Post

View all