तो दिवस त्यांनतर शांततेचं गेला...मिताली ला ही जाम प्रवासाचा कंटाळा आला होता त्यामुळे ती ही रात्रीच लवकर झोपुन गेली होती...तशी ही ती रात्री इतर तरूंणाप्रमाणे मोबाईलवर रात्र न रात्र मोबाईल वर वेळ काढत नसे कारण लवकरच पोलिस जे होणार होती... त्यामुळे ती सरावासाठी सकाळी साडे चारलाच उठून रनिंग,जीम करून मुंबईत नऊ वाजेपर्यंत घरी यायची...मग पप्पांच्या ईच्छेसाठी लंचपर्यंत ऑफिस आणि नंतर कॉलेज असा मुंबईत तिचा दिनक्रम असायचा...पण आता कॉलेज ही संपलेले असल्याने ती तशी निवांतच होती...रात्री लवकर झोपल्याने सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली आणि आपल्या जीमचे कपडे घालून बुर्ली गावच्या रोडवर धावायला म्हणून ती आपल्या रूमच्या बाहेर पडली...
" किशा...चल माझ्यासोबत.." समोरच दौलतरावांचा किशा ला पाहुन ती हसत त्याला बोलली...तसं त्याच्या बरोबर असलेली बायको सुविधा तिच्याकडे पाहतच राहिली...एकतर तिचा असा हा वेगळा पेहराव आणि त्यात आपल्या नवर्याला तिने मारलेली अशी एकेरी हाक सुविधाला काही पचनी पडली नव्हती...
" सुन बाई..." एक जोरात मागुन आवाज आला...तशी तिने गरकन मागे पाहिले तर मागे दौलत मामा..." अशी थेरं करूनिया कुठं चाललेया...गुमान आपली कापडं बदला आणं धाकल्या सुनबाई बरोबर त्यांस्नी कामात मदत करा..." दौलतराव कडाडले....
" पहिली गोष्ट मी अजुन या लग्नाला होकार दिला नाही.. त्यामुळे मी अजुन तुमची सुनबाई नाही दौलत मामा आणि मी हेच कपडे तिकडे वापरते...माझ्या मम्मा पप्पांनी कधी यावर आक्षेप घेतला नाही त्यामुळे मी कपडे बदलणार नाही आणि नाही मी आत जाणार...सध्या माझं ट्रेनिंग चालु आहे रनिंग चं त्यामुळे मी रनिंग ला बाहेर जाणारच..." ती ही मामाच्या च आवाजात ,न घाबरता डोळ्यांत डोळे घालून बोलते....त्यांचा हा गोंधळ ऐकुन सर्वच बाहेर आलेले असतात...
" ओं ,तुमच्या डोक्यात काय फॉल्ट हायसा का...?? नानांनी एकदा सांगितलं ना बाहेर नाय जायचं तर नाय जायचं..." युवा पुढे येत म्हणाला....शर्टलेस, पायजमा फक्त घातलेला...घामाने पुर्णपणे शरिर भरलेलं...बहुतेक नुकतच त्याने कवायत केली असावी अशा अवतारात रांगडा गडी , धिप्पाड असा युवा तिच्यासमोर उभा असतो...त्याच्या डोळ्यांत एक चमक असते ज्यात आपली हिरोईन मिताली हरवुन गेली होती काही सेंकदासाठी...
" माझ्यावर कोणी ही जबरदस्ती करू शकत नाही ....माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायला मी माझी समर्थ आहे..." भानावर येताच मिताली वाकडं तोंड करत युवा कडे तिरका कटाक्ष टाकत बोलते...
" हे बगा, त्ये निर्णय फिर्णय का काय हाय त्ये आपुण नंतर बगु ...आदी गुमान खोलीत जा आपल्या आण कापडं बदला ..." युवा अजुन आपल्याच थाटात बोलतो...
" ओं हे सांगणारे तुम्ही कोण..." म्हणतच मिताली त्याच्यावर धावुन जाते तसं तिचे मॉम पप्पा व बाकीचे ही सगळे जमतात...शेरशहा मामा त्या दोघांच्या मध्ये पडतात ..
" मम्मा,ह्याला सांग बरं.." म्हणत मितु तिच्या मम्मी जवळ जाते...
" मितु...पहिलं तु खोलीत जा . आणि सलवार कुडता घालून ये....." पप्पा ओरडतात...ती मम्मीकडे पाहते तर मम्मी ही तिला डोळ्यांनी च जायला सांगते आत तसं ती वाकडं तोंड करत चिडचिड करतच आत निघुन जाते...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा