" सॉरी... आमच्यामुळे तुम्हांला त्रास झाला...मी समजावते तिला..." मिताली ची मॉम दौलत मामा समोर हात जोडून बोलते व तडक मितालीच्या खोलीत जाते...सगळे पांगतात...युवा आपल्या कडक मिशीवर हात फिरवत गालातल्या गालात हसतो व परत कसरत करण्यासाठी निघुन जातो...
" हे ह्याच्यासाठी मला हिथे यायचं नव्हतं...पण तुम्हाला ..." ती आत खोलीत येताच मम्मीला मागेमागे आल्याचं पाहुन बोलते आणि हातातला मोबाइल खाली फरशीवर चं आपटते ज्यामुळे मोबाईल चे क्षणात पाच तुकडे होतात...
" हा दहावा मोबाईल ...गेल्या पंधरा दिवसांपासून चा..." आई आपल्या कपाळावर हात मारत निघुन जातात...मॅडम च्या समोर जाणं आता शक्य नाही हे कळत असल्याने...तिचा राग शांत झाल्याशिवाय काही बोलता येणार नव्हतं... म्हणून मॉम नंतर बोलुयात असा विचार करून निघून जातात...ती मात्र मनातल्या मनात धुमसत राहते....थोड्याच वेळात ती झोपी ही जाते...राग व भुक ह्या दोन्ही गोष्टी अनावर झाल्याने ती उठते तर दुपारचे बारा वाजलेले असतात...आपण जगलो कि मेलोय हे पहायला आपले मम्मी पप्पा ही आले नाहीत...हिथे आल्यावर ते ही बदललेच शेवटी असा विचार करतच मॅडम रागातच दारात उभी असलेली रॉयल ईन्फ्लिड घेऊन तडक शेताच्या वाटेकडे निघुन जाते...
" हे काय...या बाईने माझ्या बुलेट ला का हात लावला ..." मागुन आलेल्या युवाने तिला असं जाताना पाहुन चिडून डोक्यावर हात मारत बोलला व तडक दुसरी बुलेट घेऊन जाऊ लागला...
" एकतर मॅडम जोशात हायेत वर त्यात माजी बुलेट घेऊन गेलीया ....आता काय तिला जिंदा सोडत नाय " तोंडातल्या तोंडात बोलत तो ही रागात बाईक चालवत होता...समोर धाड आवाज आला तसं तो भानावर आला आणि पटकन त्या गाडीजवळ आला...रस्ता शेताचा असल्याने जास्त रहदारी नव्हती गाड्यांची पण पायी जाणारे शेतकरी मात्र तिथे अवघ्या दोन मिनिटात गोळा झाले होते...तो वाट काढून आत आला आणि समोरच दृश्य पाहुन जाम चिडला...त्याच्या आवडत्या गाडीचे चांगलेच हाल जे झाले होते...ब्रेक तुटले होते तर साईड आरसा ही....
" आता त्या गाडीकडे नुसते पाहणारच आहात कि मला हात ही देणार आहात...आऊच.." एक आवाज त्याच्या कानावर पडला तसं त्याचं लक्ष त्या बोलणार्या व्यक्ती कडे गेलं आणि त्याला हसायला आलं...तो पोटधरून हसत होता तर ती त्याच्याकडे रागाने पाहत होती...ती पडलीच होती विचित्र...तिचा पाय गाडीत अडकला होता...मार चांगलाच लागला होता...त्याच तसं हसण पाहुन शेवटी तीच वैतागाने गाडी बाजुला करण्याचा प्रयत्न करायला लागली खरी पण अजुन चं तिचा पाय त्याच्यात गुंतत राहिला...
" ऐ यु..." ती धुसमळतच त्याच्याकडे एक बोटं दाखवत बोलली , " तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच स्वागत तुम्ही अशा प्रकारे करता का...??"
" पाहुणी आणि तु..?? तु तर माझ्या राशीला आलेली नागिण आहे नागिण...ढसायला जी आली आहेस..." तो पुटपुटला, तसं
" काय बोललास ...?? परत बोल..." ती खुन्नसपणे बोलली,
" काही नाही...हात द्या .." तो आपला राग ,हसु सर्व कंट्रोल करत तिच्यासमोर हात धरत बोलला...तिने ही पटकन तो पकडला आणि ओढणार तर त्याने तो हात पटकन सोडून दिला... ती तशी रागात उठली...
" तुम्हास्नी काय वाटलं , ते तुमी मला असे वढाल आण म्या बी अंगावर पडेन तुमच्या ?? ते पिक्चर मदे दाखवतात तसं,हिरो हिरोईन ला हात देण्याच्या बहाण्याने त्यांच्या वर पडून ते परेम फिरेम दाखवेन..?? तसलं काय बी आपल्यात व्हणार नाय समजलं.." तो आपले हात झटकत म्हणाला...
" ऐ मी का पाडेन तुला...आणि ते फिल्म मध्ये दाखवतात तसं आपल्यात व्हायला आपण काय हिरो हिरोईन आहोत काय..." ती ही आपलं अंग झाडत म्हणाली...
" अंम, तुमचं आम्हांस्नी माहित नाय पण हा आपण तर मात्र या गावचे हिरो हाय...या गावचे उपसरपंच माननीय युवा चव्हाण..." तो आपल्या मिशीला पिळ देत म्हणाला...
" हा हा आलाय लागुन मोठा गावचा हिरो म्हणे...तोंड बघ आरशात..." असं बोलुन तिने गाडी ही सरळ केली आणि गाडीला किक मारून निघून ही गेली...
" अवो गाडीचा ब्रेक..." तो म्हणेपर्यंत तर मॅडम परत एकदा वीस पंचवीस पावलांच्या अंतरावर जाऊन झाडाला आदळल्या ही होत्या...तो पळतच तिथे आला... ॲक्चुअली रागात निघाल्याने समोर असलेलं झाड तिला दिसलंच नव्हतं आणि जेव्हा दिसलं तेव्हा ब्रेक मारायचा खुप प्रयत्न केला पण अलरेडी तो कामातुन गेला असल्याने तो लागलाच नाही आणि ती झाडावर जाऊन आदळली...
" चु चु चु..." तोंडाने आवाज काढत तिला अजुन चिडवायला लागला...तिने रागातच त्याच्याकडे पाहिल...व तशीच फणकारतच गाडी तिथेच टाकून चालत शेताकडे निघुन गेली..
" काय नागिण हाय राव ह्या...डोळ्यांत बी ते नागिणीचा फणकारा दिसुन येतया..." त्याने हसतच आपली गाडी उचलली, " पार वाट लावली माज्या सोनीची,सोने रडू नगस, आताच तुला घेऊन जातोया आमी अस्पताल मदे...चला उपसरपंच साहेब , आपल्या गाडीला अस्पताल ला घेऊन..." तो स्वतः शी बडबडतच गाडीला कुरवाळतच हातात धरून गॅरेज कडे निघाला...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा