Login

अशी ही एक लव्हस्टोरी भाग१

ती एक तरूण कलेक्टर ज्यात तिला मदत आपल्याच प्रिय व्यक्ती ने केली पण स्वप्न पुर्ण करताना तिला आलेली संकटे कशी ती पार करेल ही सांगणारी एक साधीशी अशी लव्हस्टोरी
" ऑटोग्राफ प्लीज.." एक तिशी चा तरूण,नव्यानेच झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तरूण कलेक्टर  मिताली चव्हाण यांना म्हणतो...त्याला पाहुन मिताली त्याच्याकडेच पाहत राहते...


" चला व्हा बाहेर ...गर्दी करू नका.." म्हणत तिचा बॉडीगार्ड त्याला बाहेर काढतो...


" मॅडम आत बसा .." म्हणत दुसरा बॉडीगार्ड तिला गाडीत बसायला लावतो...तशी ती भानावर येत आत बसते...तो तिशी तला तरूण मात्र अजुनही तिच्याकडेच पाहत असतो...


" राज आहे ना हा.." पुढे बसलेला तिचा बॉडीगार्ड तिला म्हणतो..

" हो पण तुला कसं कळालं आलोक..." ती आश्चर्य चकित होत म्हणते..


" तुझ्या डोळ्यातले भाव मला सर्व काही सांगुन जातात.." आलोक ( बॉडीगार्ड) मनात बोलतो, " ते असंच मला वाटलं..अंदाज अपना अपन...." तो हसत आपली कॉलर ताठ करत बोलतो...


" हम्म,बरोबर असतो पण आजकाल माझ्याबाबतीत तुझे अंदाज..." ती ही छोटंसं स्मित करत म्हणते..आणि बाहेर पहायला लागते...गेल्या चार वर्षांपासून चा भुतकाळ तिला एखाद्या मुव्हीप्रमाणे फ्लॅश व्हायला लागतात...


" तुला किती वेळा सांगितलं कि तो तुझा पास्ट आहे आणि त्यात तु आता गुंतू नये..." तिला असं शांत झालेलं पाहुन आलोक चिडून बोलतो तशी ती आपल्या पास्ट मेमरीतुन बाहेर येते...


" हो पण लगेच असं मी प्रेंझेट मध्ये नाही जगु शकत ना आलोक ...मी तु नाही ना कि तुझ्यासारखे मी माझ्या पास्ट ला माझ्या आयुष्यातुन खोडरबराने खोडून पान फेकून द्यावे..." ती वार्यावर उडणारी आपली एक खट्याळ बट कानामागे घेत बोलते..


" हे बघ सध्या आपण आपल्या कामावर लक्ष देऊयात ...आताच कुठे तु कलेक्टर झाली आहेस...यातुन बाहेर पडून ...मला तुला अशी च भरारी घेताना पाहायचे आहे ना की परत त्याच आठवणीत कुढताना..आणि आता हा विषय इथेच स्टॉप कर आपण ऑफिसमध्ये पोहचलो आहे..." तो नाराजीच्या स्वरात चं बोलतो...ती एकदा स्वतःला पर्स मध्ये असलेल्या आरशात पाहते व परत एकदा शेवटच टचअप करून खाली उतरते...तिने स्वतःच्या पोस्ट ला शोभेल अशी कम्फरटेबल साडी नेसलेली ,जिचा ब्लाऊज फुल होता पण मागुन नेक डीप होता...पण तिच्या गोर्या पाठीवर तो सोनेरी रंगाचा ब्लाऊज शोभुन दिसत होता...एकेरी पदर घेऊन तिने ती निळ्या पैठणीची शोभा अजुन वाढवली होती..


" छान दिसतेस तु...चल आता लवकर..." म्हणत तिला पुढे जवळजवळ ढकलतच आलोक तिच्या मागे चालु लागला....आज तिचं स्वागत आणि ओळख बस एवढ्यासाठीच एक मिटींग होती...पण ती खुप गरजेची होती कारण अनेक लोकांशी तिची पर्सनल ओळख जी होणार होती आणि माणसांत राहिली तरच ती तिचा भुतकाळ विसरेल असं आलोक ला वाटत होतं ... त्यामुळे चं तिची आता ईच्छा नसुनही तो तिला मिटींग अटेंड करण्यासाठी धडपडत होता...जे तिला ही त्याची धडपड कळत होती पण तरी ती मनातुन निराश झाली होती सकाळच्या त्या तिच्या अचानक समोर आलेल्या चार वर्षापुर्वी च्या भुतकाळामुळे...


          मिटींग चा हॉल बर्यापैकी मोठा होता,सर्व पोलिस खात्यातील लोकांची मिटींग भरवली गेली होती...आज फक्त पोलिस खात्याशी तिची ओळख परेड होती...तिची नजर पुर्ण हॉलभर फिरण्यात आली...आणि ती आलोक च्या सुरक्षितेत आपल्या ठराविक जागी जाऊन बसली...मिटींग सुरू झाली आणि तिचं लक्ष शेवटच्या बेंचवर बसलेल्या एका पोलिस वर नजर पडली...तशी तिची अस्वस्थता वाढायला लागली...ती व्यक्ती,तो पोलिस ही कंटिन्यू तिच्याकडेच एक बोटं आपल्या चिन वर ठेवून पाहत होता...


" तिकडे पाहु नकोस..." आलोक ने तिच्या कानात बजावले तशी ती परत समोर ईन्ट्रो देणार्या पोलिसांचा ईन्ट्रो ऐकायला लागली....पण अधुन मधुन तिचं लक्ष त्याच्याकडे जात होतं तेव्हा तिला ही समजतं होतं कि तो आपल्या कडेच पाहत आहे...पण आता त्याचे डोळे तिला निर्विकार वाटत होते...कसलेच भाव नाहीत असं वाटतं होतं... हळूहळू सगळ्यांचा ईन्ट्रो झाला...आता तो एकटाच राहिला होता...जसा तो आपला ईन्ट्रो द्यायला उठला तशी स्वतः ला सावरत मिताली बाहेर पडली...तिच्या अशा जाण्याने गोंधळ उडाला...


" मॅमची तब्येत अचानक बिघडली असल्याने आजची मिटींग येथेच संपली " असं सांगत आलोक बाहेर पडला...आणि त्याच्या मागोमाग ती व्यक्ती हि...


" मॅडम.." आवाज मागुन आला तसं तर तिला अजुनच गहिवरून आलं पण ती तशीच डोळ्यांतील पाणी लपविण्यासाठी डोळ्यांवर भारी गॉगल चढवत गाडीत बसली व आलोक ला ही इशारा करून त्याला हि आत बसायला सांगितले...तसंही तो ही त्या व्यक्तीला एक्सक्युज मी म्हणत गाडीत बसला आणि पाहता पाहता गाडी भरधाव वेगाने निघून ही गेली...


" अजुन किती दिवस असं आमच्यापासून दुर राहणार दी..?? आमचा काय गुन्हा होता.." ती व्यक्ती त्या जाणारया गाडीकडे निराशेने पाहत म्हणाला...आणि डोळ्यात इतकावेळ अडून ठेवलेलं पाण्याला बाहेर पडायला लावलं...किती वेळ ते तरी तो रोखुन ठेवणार होता...ती जशी मुंबई च्या एअर पोर्ट वर पोहचली होती तेव्हा पासुन तो तिची सुरक्षततेसाठी आला होता ...गेल्या दोन तासांपासुन तो तिला लपुन पाहत होता..सख्खी बहिण आणि ती ही मोठी असुनही त्याला तिच्या गळ्यात पडुन साधं कशी आहेस विचारता ही येत नव्हतं एकदाही...


" तु विवेकशी बोलली का नाहीस ..??"  गाडी थोडं पुढं जाताच आलोक तिला बोलला..


" हे बघ सध्या मला तुझ्याशी कोणत्याच ‌विषयावर बोलायची इच्छा नाही... त्यामुळे मला माझ्या हॉटेलवर पोहचवण्याची शक्य असेल तितक्या लवकर पोहचव..." ती ऑर्डर देत म्हणाली..


" येस मॅम.." म्हणत आलोक ही बाहेर बघायला लागला..अर्ध्या तासाच्या अंतरावर वर असलेलं तिचं हॉटेल येताच त्याने शांतता भंग करत तिला हॉटेल आल्याचं सांगितलं..तशी ती खाली उतरली तर तो तिच्याशी एक ही शब्द न बोलता आपल्या घरी निघून गेला..


        आलोक सहस्त्रबुद्धे, तिचा लहानपणीचा बेस्ट बडी, मित्र तर होताच शिवाय फॅमिली फ्रेंड ही...सर्व काही शेअर करायचे दोघं अगदी क्रशसुद्धा... बॉयफ्रेंड बनवणं तिच्या स्वभावात बसत नसल्याने तीची धाव फक्त क्रशपर्यंत चं असायची ,पण मग सर्व डिटेल्स त्याचे तिला देणे हे काम आलोक अगदी जीव ओतून करायचा तर ती ही त्याला नविन नविन गर्लफ्रेंड मिळवुन देण्याचे काम करायची..(गर्लफ्रेंड म्हणजे फक्त फिरणं,खाण पिणं एवढंच तो करायचा..) आणि बोअर झालं कि मग दुसरी...हे अशा कारनामात ही ती त्याला फुल सपोर्ट द्यायची ...एवढीच तर जिंदगी है,जी ले मेरे दोस्त म्हणतच...कारण तिला माहित असायचं कि तो कोणत्याही मुलीबरोबर वाईट वागणार नाही त्यामुळे ती बिनधास्त त्याला हा क्राईम करू द्यायची व स्वतःही सपोर्ट करायची...हे दोघे एकत्र आले कि क्राईम हा होणारच हे आता त्यांच्या घरच्यांना ही चांगलचं माहित होतं कि...

   
          दोघांच्या घरच्यांना वाटायचं कि पुढे जाऊन त्यांनी एकत्र यावं,लग्न करावं पण त्यांनी तिला याच्या लग्नाबद्दृल विचारलं कि तिचा एक नेहमीचा डायलॉग असायचा..." ई याच्याशी लग्न...?? पृथ्वी वर हा जरी एकटा राहिला ना तरी करणार नाही " तर तो ही त्याच्या घरच्यांनी हा विषय काढला कि टाळायचा..दोघांचे सिक्रेट दोघांना माहित होते..फक्त मधले काही चार  वर्षं तो जर्मनीला आपल्या कंपनीच्या कामानिमित्त गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता ..पण आता परत ते एकत्र आले होते...


           मिताली चं स्वप्न खुप च साधारण होतं, तिला एक पोलिस ऑफिसर व्हायचं होतं...नाव कमवायचे होते आणि त्या नंतर आई वडिल म्हणतील त्याच्याशी लग्न करून गृहिस्थी मांडण्याचा तिचा विचार ठरलेला..तर याच्या उलट आलोकची आपल्या पार्टनर विषयी कल्पना होती..त्याला कायम वाटायचं कि आपली होणारी बायको ही महत्वकांक्षी असावी,जिचे स्वतःचे अशें काही अस्तित्व असावे..तिने शेवटपर्यंत आपल्या कामात गुंतवून घ्यावे.... त्यामुळे या दोघांचं लग्न ,साक्षात ब्रम्हदेव म्हटले तरी होऊ शकणार नव्हते त्या काळी...पण आता चित्र बदललेले आलोकच्या मनातले...ईतके दिवस फक्त दोस्त या भावनेने पाहणारा आलोक तिला आपली बायको या साच्यात पाहु लागला होता...दोघंही शेवटी आपल्या भुतकाळाने होरपळलेली होती...आता कुठे त्याची प्रेमाची ट्रेन पटरीवर यायला लागली चं होती कि तिचा पास्ट दोघांसमोर असा उभा येऊन ठाकला होता..

🎭 Series Post

View all