Login

अशी ही एक लव्हस्टोरी भाग २

एका कलेक्टर ची कहानी...
हॉटेलवर जाताच फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते तोच तिला बेडवर तिचा आवडता पुष्पगुच्छ दिसतो,लाल रंगाचा गुलाब व रातराणीचा समावेश असलेला ती तो गुच्छ हातात घेऊन वास घेते...त्याचा तो सुगंध तिच्या मनापर्यंत दरवळतो तसं तिला फ्रेश वाटायला लागतं...


" नक्कीच त्याने दिला असेल..त्याला अजुनही माझ्या आवडीचा पुष्पगुच्छ आठवत असेल का..??" असा विचार करत करतच ती गुच्छाबरोबर असलेलं कार्ड वाचायला लागते...तसंतसं तिच्या चेहर्यावर आनंदाची लकेर उमटू लागते..

"डिअर स्वीट हार्ट,
    
        आज तुला पाहिले आणि मी स्वतःला रोखु शकलो नाही... जवळ जवळ चार वर्षांनी तुला पाहत होतो...तुला माझी आठवण येते का गं..??  तुला नसेल येत कारण खुप मोठी झाली आहेस आता तु कि कदाचित तुझ्या या स्वीटहार्ट ला तु विसरली ही असशील पण मी अजुनही तुझ्या प्रत्येक आठवणीला कैद करून ठेवले आहे...आज मला खुप तुझा अभिमान वाटतो कि तु एकेकाळी मी पाहिलेलं स्वप्न पुर्ण केलं..खुप खुप धन्यवाद त्याच्यासाठी मनापासुन...आणि माझे शुभेच्छा नाही मिळाल्या तर तुला खुप त्रास होतो हे मला चांगलच माहित असल्याने माझ्या ही तुझ्या या नविन आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा...

              तुझाच स्विटहार्ट ,
                राज.."

" कितीवेळा सांगितलं आहे कि अज्ञान लोकांकडून आलेलं पत्र असं घेत जातं जाऊ नकोस म्हणून..पण आमचं कधी ऐकशील काय माहित.." बडबड करत आलोक तो पुष्पगुच्छ घेऊन " मॅनेजर, मॅनेजर" ओरडत हॉटेल च्या रिसेप्शन ला पोहचतो...


     मॅनेजर ची चांगलीच खरडपट्टी काढून आलोक परत आपल्या घरी गेला तर मिताली ही आपल्या रूममध्ये आली... दिवसभर एवढं काम करून ही रात्रीची झोप मात्र तिला काही येत नव्हती गेल्या महिनाभरापासुन...आयुष्यात एवढं काही वाढलं होतं कि विचार करायला त्यावर ही तिला फक्त असा निवांतपणा रात्रीच मिळत असे....ती नेहमीप्रमाणे  रूमच्या गॅलरीत जाऊन एका खुर्चीत जाऊन बसते... मोबाईल पाहत असते ,तोच मोबाईल मधल्या एका फोटोंवर तिची नजर पडते....डोळ्यांत पाणी येतं ...ते पुसत पुसत चं ती आपल्या भुतकाळात जाते...


भुतकाळ  चार वर्षांपूर्वी

स्थळ  सांगली रेल्वेस्टेशन


" मितु...चल बाई लवकर बाबा खुप ओरडतील हां..." मितालीच्या आई आपलं सामान खाली उतरवत मिताली ला बोलतात..


" मॉम...यार मी नाही येणार त्या गावात ...कितीवेळा सांगितल तुम्हांला...मला नाही यायचं त्या फडतुस गावात..." अजुन सीटवरच रेटून बसलेली मिताली बोलते...मिताली सरपोतदार...शहरातील वाघिणच म्हणावं लागेल...दिसायला नाजुक परी ,पप्पांची परी असला प्रकार नाही...दिसायला चांगलीच धिप्पाड आणि वागायला बोलायला ही रफ ॲंड टफ चं...थोडक्यात टॉमबॉय...६.३  फुट उंची... .निमगोरा रंग ..हातात एक वॉच तर दुसर्या हातात कायम एक  ब्रेसलेट...नुकतंच कॉलेज संपलेल आणि आता पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल करून आलेली...कपड्यांच्या बाबत म्हणाल तर मॅडम ने अजुन शर्ट जीन्स शिवाय काही ही परिधान केलेलं नव्हतं आजपर्यंत ..भयंकर बाईक वेडी ...हर प्रकारच्या बाईक पार्किंग मध्ये , मुंबईत वडिलांचा चार बेडरूम चा फ्लॅट ...वडिल मिस्टर सरपोतदार ही तशेंच..बाप तेशी पोर हा प्रकार...वडिल बिझनेस मन... मुंबईतल्या टॉप फाईव्ह मधले...असा कोणता ही व्यवसाय नाही ज्यात तिचा बाप नाही... त्यामुळे आपली मुलगी ही आपल्या क्षेत्रात उतरावी ही खुप ईच्छा सरपोतदारांची त्यामुळे एम बी ए करायला लावलं होतं...तिने ही ते बळजबरीने शिक्षण पुर्ण केलं होतं...


" हे बघ मितु...तु किती ही नाही बोललीस तरी आपल्याला या गावात जायलाच लागणार हे तुला चांगलचं माहित आहे कि का ते... त्यामुळे उगीच माझ्याबरोबर वाद घालु नकोस आणि चुपचाप खाली उतर ...तुझ्या बापाला जर कळालं ना तर जिंदा सोडायचा नाय तुला ही ना मला ही..." मॉम दटावत बोलते...


" कळतच नाही यार मला..तो नक्की माझा बाप आहे कि त्याचा ....सदैव तो तो आणि तो हवाय त्याला ...किती वेळा सांगितलं कि मी त्या गावात ही येणार नाही आणि नाही त्याच्याबरोबर लग्न करणार..." ती चिडतच आपली बॅग खाली टाकत  बोलते...


" ओं मॅडम... समोरच दिसत नाय व्हय तुमास्नी ....आता आबाला बॅग लागली असती.." एक तिच्याच जवळपास उंचीचा ,दिसायला निमगोरा,हाताच्या बाह्या फोल्ड केलेल्या व चांगलीच भारी मिशी असलेला तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा असलेला तरूण तिच्यावर भडकत बोलला...


" ओं डोक्यात नका जाऊ हं...त्या तुमच्या आबांचे डोळे फुटलेत काय...त्यांना दिसलं नाय का मी बॅग टाकतेय ते..." ती ही आपल्या शर्टाच्या बाह्या मागे सरसावत बोलते...


" आत्या.?? तुमी.." म्हणत तो तरूण मागे उभा असलेल्या मितालीच्या आईला पाहत बोलला व लगेच त्यांच्या पायांना नमस्कार ही केला...


" तुम्ही मला ओळखता..??" आई मिताली कडे गोंधळत पाहत बोलते...


" अवो आत्या तुमी ओळखलं नाय वाटतं मला...अवो म्या तोच तुमचा लाडका युवा ‌.." तो तरूण आपली ओळख पटवत आईसमोर जात  बोलला...


" ऐ कोण तु ...?? आणि आम्हाला कसं काय ओळखतो...??" मिताली त्याच्या व  आईच्या मध्ये उभारत बोलते...


" युवा...?? युवा म्हणजे तु चव्हाणांचा का रे..." आई खुष होत बोलते...


" व्हय चव्हाणांचाच कि..चला मामांनी मला तुमास्नी गावी आणायची जिम्मेदारी दिली हाय..." असं म्हणत तो सोबत असलेल्या आबाला सामान घेऊन जायची डोळ्यांनी खुण करतो तसा तो आबा सर्व सामान घेऊन पुढे जातो...


" ओं आबा ,माझी बॅग पण न्या कि..." मिताली बोलतच असते पण आबा कधीच पुढे निघून गेलेला असतो...


" तुमची बॅग आमी का न्यायची...?? हात नाय वे तुमास्नी...?? चला वा पुढं.." रागातच युवा बोलला..


" ओं तुमच्या कडे आलेल्या पाहुण्यांची अशी खातिरदारी करतात का...?? " ती ही रागात बोलते...


" ओं बाई..." तो तिच्याकडे बोट करून काही बोलणार तोच,


" अरे बास बास...तुम्ही दोघं अजुन सुधारला नाहीत...युवा,ही आमची मुलगी,मिताली..." तिची मॉम युवाला ओळख करून देतात...त्यांच्या भांडणात मधोमध येऊन बोलते...


" फटाकडी...?? ही आपली फटाकडी हायसा...??" युवा आश्चर्य व्यक्त करत बोलला..


" मिताली, मिताली सरपोतदार नाव आहे माझं...मॉम ह्याला सांग माझं नाव मिताली आहे ते..," अजुन रागातच मिताली बोलते...


" असशील तु मिताली फिताली... पण माज्यासाठी तर अजुन ती फ्रोकमदली, ठेंगणुशी...अंगठा तोंडांत घालणारी व चरचरा बोलणारी फटाकडीच हायसा अजुन..." तो दात विचकवत म्हणाला...


" मॉम.." ती म्हणते खरी पण आई तिलाच शांत रहायला सांगते..तशी ती चिडून आपली बॅग आवरत पुढे निघुन जाते..


" ह्या कदीच नाय सुदरायच्या " युवा तिला तसं चिडून जाताना पाहत म्हणतो...तसं आई  व युवा ही मागुन हसायला लागतात...

🎭 Series Post

View all