वर्तमान काळ
"काय झालं राणी सरकार...आज आपल्या चेहर्यावरचं हसु काही कमी होता दिसेना...आणि ही लाली..." तो तिच्या गालाला उलट्या हाताने स्पर्श करत म्हणतो..
" काही नाही ओं...युवाची..." ती बोलतच असतो कि,
" परत युवा....या युवाच्या तर ना..." तो चिडून आपला हात रागात भिंतीवर आपटत बोलतो, " अहो तुमचा हिथं नवरा तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही अजुन युवा..एका परक्या पुरुषातच अडकला आहे..." तो थोडंसं चिडून बोलतो...ती मात्र त्याला असं फुगुन रागावलेल बघुन हसायला येत...
" आता काय करणार...आहेच आमचा युवा ईतका गोड कि क्षणाक्षणाला आम्हाला त्यांची आठवण तर येणार चं ना..." ती त्याचे दोन्ही गाल ओढत चिडवत म्हणते...तो तिच्याकडे रागाने फक्त बघतो आणि बेडवर जाऊन आडवा होतो...
" बरं बाबा..माफ करा मला...परत त्या युवाच नाव ही नाही काढणार ..." ती त्याच्याजवळ झोपत त्याला मागुन मिठी मारत म्हणते...पण हा मात्र गाल फुगवून बसला होता...
" अहो...सॉरी ना...हे बघा कानही पकडले..." ती त्याच तोंड आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत म्हणते....तसं तो हळुच तिच्याकडे पाहतो तर खरच तिने कान पकडले होते...आणि डोळ्यांत पाणी असं साचलेले कि कधीही ते बाहेर येतील...आणि तोंड तर....तोंड तर असं बारिक केलं होतं कि बास...
" हम्म बास झाली नाटकी..." तो तिला आपल्या मिठीत घेऊन बोलतो, " हिथे आम्हांला गेल्या चार वर्षांपासुन एक दिवस, एक रात्र ... तुमच्या विना जाईना...आणि तुम्हांला मात्र त्या फडतुस युवाची आठवत येतेय..." तो पण अजुनही गाल फुगवून चं असतो..
" मग सॉरी बोलतेय ना त्यासाठी...आणि आम्ही पण सुखात नव्हतो गेले चार वर्ष ...पण तुमचीच ईच्छा होती ना आम्ही कलेक्टर व्हावं...." ती ही तोंड पाडून चं बोलत असते...
" हो बाई मान्य आहे मला...माझीच ईच्छा होती.." तो तिचं जास्तवेळ असं पडलेलं तोंड पाहु शकत नव्हता त्यामुळे शेवटी स्वतः चं त्याने माघार घेतली आणि तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवत तो बोलतो..." आणि हे काय...तु मला परत अहो जाओ का बोलायला लागलीस...?? तुला कितीवेळा सांगितलं आहे मला राज बोलायचं आणि अरे तुरे करायचं...जसं त्या आलोक ला करतेस तसं..." तो आपली त्या आलोकवर असलेली जेलसी दाखवत म्हणतो...
" अहो ...तुम्ही माझे पती देव आहात ...आणि आता हा आलोक कुठून मध्येच आला आपल्यात...?? कि तुम्ही जेलसी फिल करता ..." ती हसतच शेवटचं वाक्य बोलते..
" जेलसी ...?? आणि त्या अंगुर साठी...?? ह्ये...मला चांगलंच माहित आहे...कि तु फक्त नि फक्त माझीच आहेस म्हणुन..." तो तिच्या नाकावर किस करत म्हणतो, " पण तु परत मला आता ते अहो जाओ करू नकोस..." कडक शब्दांत चं तिला बोलतो...
" ओके बाबा...आत्ता नाही म्हणणार हं..." ती हलकेच आपले ओठ त्याच्या छातीवर टेकवत म्हणते,तसं हलकं हसु त्याच्या ओठांवर येतं... " पण युवाला तर खुप आवडायचं माझं असं अहो जाओ केलेलं...." ती परत त्याला चिडवत म्हणते...
" आत्ता त्या युवाच्या...." तो जरा रागात..." आत्ता मी काय त्या युवाला सोडत नसतो...बघच उद्याच त्याचा हात तोडतो कि नाही ते..." तो दात ओठ खातच म्हणतो पुढे...
" किती तो जळकेपणा..." हसत म्हणत ती त्याच्या हाताला आपल्या हातात घेत त्यावर ओठ टेकवते...तिच्या स्पर्शाने तो ही मोहरून जात असतो खरतर...ती हलकेच त्याच्या कानात फुंकर मारते आणि त्याला आपल्या सर्वांगावर शहारे येतात...
" हे नाही हं ...असलं नाही करायचे..." म्हणत हसतच आपली मान मागे बेडला टेकवत बोलतो...तशी त्याच्या पोटावर बसत त्याच्या डोक्याला डोकं टेकवते...तो ही शांत होतो...आणि आपले दोन्ही हात तिच्या कमरेत गुंफतो.....दोघही एकमेकांना अनुभवत असतात...
" काय मग कारभारीन...बुर्लीचा चार्ज कधी घेणार आहात ..." तो आपल्या श्वासांना कंट्रोल करत चं बोलतो...कारण त्याला माहित असतं कि आत्ता जर आपला कंट्रोल घसरला तर आपल्याला सावरण कठीण होईल ...
" उद्याच घेणार आहे..." तिलाही कळत कि तो आपल्यापासुन दुर जायचा प्रयत्न करत आहे...तशी ती ही खाली बेडवर बसत बोलते..." तु आज काल विषय डायवर्ट करायला ही चांगलाच शिकला आहेस राज...आधी अशा परिस्थितीत तुला माझ्याशिवाय कुणीच समोर दिसायचं नाही..." ती उठून ड्रेसिंग टेबलाजवळ जात हाताला कोल्ड क्रीम लावत बोलते...
" तसं नाही सोन्या...पण तुलाही माहित आहे चांगलचं..." तो तिच्याकडे एका अंगावर होतं नाराजीतच बोलतो, " आपणं अजुन ही एकत्र आहे हे अजुन आपल्या घरच्यांना माहित नाही...आणि मला ही तोपर्यंत त्यांना कळू द्यायचं नाही जोपर्यंत घरात चाललेली कारस्थान थांबत नाही ...यु नो ना...बापु चं काय हाल झालेत...मला बघवेना गं..." तो खुप उदास होतो...
" हम्म..." ती आपले केस सावरत आरशात पाहतच, परफ्यूम मारते अंगाला आणि त्याच्याजवळ येऊन बोलते, " लवकरच सर्व नीट होईल ...गावाचं भलं व्हावं म्हणून चं मी कलेक्टर झाले ना..." ती त्याचा हात हातात घेऊन त्याला प्रेस करत म्हणते...
" हो गं...पण या चार वर्षांत गाववाल्यांनी खुप काही सोसलं आहे गं....आणि तो शोषक परिवार आपल्याच ओळखीचा आहे हे ऐकल्यापासुन तर माझ्या डोक्यात अशी रग गेली आहे ना कि काय सांगु....खरतर मलाच व्हायचं होतं कलेक्टर पण मला जमलं नाही..कारण ही तुला चांगलचं माहित आहे..." तो ही तिच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत उदासिन तेने बोलत असतो...
" सोड राज हा विषय .. आता मी आले आहे ना...सर्व नीट होईल...तुझं स्वप्न आपण दोघे मिळून पुर्ण करूयात...डोन्ट वरी..." ती त्याला धीर देत बोलते, " चार वर्ष नीट झोपला नसशील...ये झोप येथे..." ती त्याच डोकं आपल्या मांडीवर ठेवत बोलते...तो ही काही न बोलता तिच्या हाताच्या बोटांत आपली बोटं गुंतवत आठवणीत हरवत झोपी जातो...ती ही त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवते...आणि हळुच त्याच डोकं खाली ठेवुन त्याच्याखाली उशी ठेवुन स्वतः ही त्याच्या जवळ झोपते...
पण आज काही निद्रादेवी तिच्यावर प्रसन्न होत नसते...गेल्या चार वर्षापुर्वीचा भुतकाळ तिच्या मनात घोंघावत जे होता...याच दिवशी तिला तिच्या युवापासुन कायमच मुकाव लागलं होतं...आजचा दिवस कसा ती विसरली असती...?? गेल्या चार वर्षा पुर्वी ...तिच्या युवाला आपले प्राण द्यावे लागले होते आणि त्यावेळी ती काही च करू शकत नव्हती...ती फक्त उघड्या डोळ्यांनी त्याला असं मरताना..तडफताना पाहत होती...तिचे तिळतिळ तुटणारे हृदयाची धडधड कुणालाच ऐकु येत नव्हती...पुढच्या क्षणात तिच कपाळ पांढरं झालं...तिच्या अंगावरचा तिचा हिरवा शालु काढण्यात आला आणि त्या जागी पांढरी साडी तिला नेसवण्यात आलं...हातातल्या बांगड्या ही फोडल्या...लंकेची पार्वती झाली होती ती क्षणात ...पण का कशासाठी त्याने आत्महत्या केली याचं कारण तिला अजुनही समजलं नव्हतं...ती फक्त त्या उंच डोंगरावरून उडी घेतलेल्या आपल्या युवाकडे पाहत होती...डोळे ताणून कि तो आता परत वर येईल आणि असं काही झालं नाही म्हणत आपल्याला आपल्या बळकट बाहुपाशात घेऊन आपलं रडू थांबवेल...पण ..पण असं झालच नाही ..गेली चार वर्ष तो परत आलाच नाही....
" झोप आता मितु...किती त्या युवाच्या आठवणीत झुरणार...?? आणि किती दिवस...?? आता तो परत येणार नाही ...कधीच..." राज तिच्या अंगावर एक हात टाकतो आणि दुसर्या हाताने तिच्या कपाळावर थापटत थापटत झोपेतच बोलतो....तशी ती त्याच्याकडे पाहते...झोपेतही तो क्युट दिसत होता..त्याच्या त्या विस्कटलेल्या केसांना नीट करत ती त्याचा हात काढत त्याच्या मिठीत शिरते आणि गाठ झोपी जाते...
क्रमशः
©® चैत्राली यमगर डोंबाळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा