"अशी ही सुनबाई "
"तुझे विचारच वेगळे आहेत बाई!"
"सुनबाई काय करते?"
"सुनबाई काय लिहिते?" सासूबाई चा..
प्रश्न नेहमीच विचारनारा..मग त्याचं उत्तर असतं सुनबाई बदल..
"सुनबाई काय लिहिते?" सासूबाई चा..
प्रश्न नेहमीच विचारनारा..मग त्याचं उत्तर असतं सुनबाई बदल..
कारण ती गोंधळ करत नाही, आरोप करत नाही, उगाच रडत नाही... आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे – तिला वाद घालायचा कोणतही शौक नाही!
ती कुठल्या बाजूला नाही.
ना सासरच्या, ना माहेरच्या.
ती आहे "घराच्या" बाजूला.
ना सासरच्या, ना माहेरच्या.
ती आहे "घराच्या" बाजूला.
आजकाल लाखो लेख, पोस्ट्स, व्हिडिओज, कविता, स्टेटस वाचायला मिळतात – सासर किती वाईट, माहेर किती दूर, मुलींची घुसमट, सासूबाईंचा जाच, नवर्याचा तटस्थपणा!
आणि यात काही चुकीचं नाही. प्रत्येकाने आपलं दुःख बोलायलाच हवं.
पण...
हिचं वेगळेपण इथेच आहे – ही दुःख उगाळत नाही, ती ते समजून मोकळी होते.
आणि यात काही चुकीचं नाही. प्रत्येकाने आपलं दुःख बोलायलाच हवं.
पण...
हिचं वेगळेपण इथेच आहे – ही दुःख उगाळत नाही, ती ते समजून मोकळी होते.
अशी ही सुनबाई!
तिने स्वतःला ना कधी "बिचारी" म्हटलं, ना "सावत्र."
ती नाती "सांभाळते."
तिचं लिखाण म्हणजे – जसं जळत असताना एक फुंकर दिली की माणूस शांत होतो ना, तसंच.
ती नाती "सांभाळते."
तिचं लिखाण म्हणजे – जसं जळत असताना एक फुंकर दिली की माणूस शांत होतो ना, तसंच.
ती नात्यांचं भांडवल करत नाहीस.
नात्यांच्या नावावर दु:खाच्या साठवणी करत नाहीस.
कोणत्याच नात्याला बदनाम करत नाहीस…
आणि म्हणूनच, तुझं सोज्वळपणं मनाला भिडतं!
अशी सुनबाई.
आजच्या जगात, जेव्हा प्रत्येकजण आपल्या नात्यांमधल्या जखमा मोकळेपणाने सोशल मीडियावर मांडतो,
तिथे तू – शांतपणे नात्यांचा पंख्याने झुलणारा गारवा बनून राहतेस.
तिथे तू – शांतपणे नात्यांचा पंख्याने झुलणारा गारवा बनून राहतेस.
सासूबाई रागावल्या,
आईपण कधी भांबावली,
नवरा कधी गप्प बसला,
मुलं काही मागं लागली,
पण...
हिनं सगळं समजून घेतलं.
आईपण कधी भांबावली,
नवरा कधी गप्प बसला,
मुलं काही मागं लागली,
पण...
हिनं सगळं समजून घेतलं.
ती लिहिते – पण तक्रार म्हणून नाही, तर समजून घेण्यासाठी.
ती बोलते – पण "कुणाचं मन न दुखावता."
ती शांत राहते – पण "दबलेली नसते."
ती बोलते – पण "कुणाचं मन न दुखावता."
ती शांत राहते – पण "दबलेली नसते."
ती लिहतेस – पण कोणालाही दोष न देता.
ती लिहतेस – पण आपल्या घरातली वात्सल्याची उब जपून.
ती लिहतेस – जे वाचून कोणाचं मन दुखत नाही,
पण विचार मात्र निश्चितपणे जागे होतात!
ती लिहतेस – पण आपल्या घरातली वात्सल्याची उब जपून.
ती लिहतेस – जे वाचून कोणाचं मन दुखत नाही,
पण विचार मात्र निश्चितपणे जागे होतात!
तिचं माहेर तिच्यासाठी "पाठशाळा" आहे.
ती म्हणते –
"माहेर म्हणजे माझी मुळं... जिथून उगम झालाय."
आणि
सासर म्हणजे – "माझं फुलणं... इथे माझ्या फुलांचा सुगंध पसरतो."
ती म्हणते –
"माहेर म्हणजे माझी मुळं... जिथून उगम झालाय."
आणि
सासर म्हणजे – "माझं फुलणं... इथे माझ्या फुलांचा सुगंध पसरतो."
अशी सुनबाई.
म्हणूनच, ती कोणत्याच एकाच भूमिकेत अडकत नाही.
आईची लेक म्हणूनही ती तितकीच सुंदर आहे,
आणि सासूबाईंची सुन म्हणूनही.
आईची लेक म्हणूनही ती तितकीच सुंदर आहे,
आणि सासूबाईंची सुन म्हणूनही.
खरं सांगायचं तर,
तिच्यासारख्या सुनबाई खूपशा घरांचं "समतोल बिंदू" असतात.
त्या असतात म्हणून –
घरातल्या चहा पासून ते सणासुदीच्या फराळापर्यंत,
सगळं सुरळीत चाललेलं असतं.
तिच्यासारख्या सुनबाई खूपशा घरांचं "समतोल बिंदू" असतात.
त्या असतात म्हणून –
घरातल्या चहा पासून ते सणासुदीच्या फराळापर्यंत,
सगळं सुरळीत चाललेलं असतं.
ती आपलं दुःख 'फॉरवर्ड' करत नाही.
ती भावनिक मेसेजेस 'व्हायरल' करत नाही.
कारण – ती माहीत आहे, "समजूत म्हणजे समर्पण नव्हे."
ती भावनिक मेसेजेस 'व्हायरल' करत नाही.
कारण – ती माहीत आहे, "समजूत म्हणजे समर्पण नव्हे."
एका बाजूला समाज असतो – जो तिला नेहमी सांगतो
"तू जास्तच समजून घेतेस!"
तर दुसरीकडे ती असते –
जी म्हणते,
"समजून घेणं म्हणजे हरणं नसतं. ते तर जिंकण्याची पहिली पायरी असते."
तिची मैत्रीण म्हणते –
"बाई, तू सगळं कसं बॅलन्स करतेस गं?
कधी चिडतेस नाहीस, कधी फोडाफोड करत नाहीस?"
ती हसून उत्तर देते –
"माझा संसार म्हणजे माझी गणिताची वही आहे…
सगळं नीट मांडलं की उत्तर आपोआप सापडतं!"
"बाई, तू सगळं कसं बॅलन्स करतेस गं?
कधी चिडतेस नाहीस, कधी फोडाफोड करत नाहीस?"
ती हसून उत्तर देते –
"माझा संसार म्हणजे माझी गणिताची वही आहे…
सगळं नीट मांडलं की उत्तर आपोआप सापडतं!"
सासूबाईंनी तिची स्तुती केली,
आईने गुपचूप अभिमान केला,
नवऱ्याला ती एक समजूतदार जोडीदारीण वाटली,
मुलांनी तिला "आईची छाया" म्हटलं,
आणि शेजारीण म्हणाली –
"बाई, तुझं सगळं काही सोज्वळ आणि गोड आहे."
पण...
या सगळ्या मागे किती 'न बोललेले शब्द', 'रडलेल्या रात्री', आणि 'गिळलेले घोट' असतात, हे फक्त तिलाच माहीत असतं.
तिचं "वेगळेपण" हेच –
ती त्याचं प्रदर्शन करत नाही.
या सगळ्या मागे किती 'न बोललेले शब्द', 'रडलेल्या रात्री', आणि 'गिळलेले घोट' असतात, हे फक्त तिलाच माहीत असतं.
तिचं "वेगळेपण" हेच –
ती त्याचं प्रदर्शन करत नाही.
अशी सुनबाई
"अन्याय झाला… तर मी शांत बसत नाही!"
मी समजून घेते, सहन करते… पण मर्यादेपर्यंत.
कारण सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे.
अन्यायाच्या क्षणी –
मी स्पष्ट बोलते, आपल्या बाजूने उभी राहते.
वाद टाळते, पण न्याय मागायचं टाळत नाही.
माझ्या शब्दांत जर शांतता आहे,
तर त्यामागे सत्याची ताकद आहे.
अन्याय झाला,
तर मी आवाज उठवते…
आपली बाजू ठामपणे मांडते,
आणि न्याय मिळवते – आत्मसन्मान राखून!

आज ती लिहते – पण कोणावर बोट न ठेवता.
ती विचारते – पण कोणाची बाजू न घेता.
ती समजून घेते – पण स्वतःला विसरत नाही.
ती विचारते – पण कोणाची बाजू न घेता.
ती समजून घेते – पण स्वतःला विसरत नाही.
तुझी पद्धत वेगळी आहे.
तू नात्यांमध्ये तुटलेल्या काचेवर चालत नाहीस,
तर त्या तुटलेल्या काचेला हलकेच चिकटवून
त्यात पुन्हा प्रेमाचं प्रतिबिंब उमटवत असतेस.
तू नात्यांमध्ये तुटलेल्या काचेवर चालत नाहीस,
तर त्या तुटलेल्या काचेला हलकेच चिकटवून
त्यात पुन्हा प्रेमाचं प्रतिबिंब उमटवत असतेस.
तुझं लेखन म्हणजे – एक संवाद,
ज्यात प्रेम आहे, समजूत आहे,
आणि आहे 'आपणपणाची' वळकटी
ज्यात प्रेम आहे, समजूत आहे,
आणि आहे 'आपणपणाची' वळकटी
आजच्या स्त्रियांनी आपली वेदना मांडणं ही गरज आहे,
पण तिच्यासारख्यांनी प्रेम, समजूत आणि समतोलपणाही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
पण तिच्यासारख्यांनी प्रेम, समजूत आणि समतोलपणाही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
कारण,
"समाधानाचा आवाज कधीच मोठा नसतो,
तो आतून येतो... अगदी तिच्यासारखा."
"समाधानाचा आवाज कधीच मोठा नसतो,
तो आतून येतो... अगदी तिच्यासारखा."
अशी सुनबाई.
शेवटी एवढंच –
ही अशीच आहे… 'नाही म्हणणाऱ्या' गर्दीत,
एक 'हो' म्हणणारी बाई…
सगळं गोंधळ शांतपणे हाताळणारी,
नाती जपणारी… समजूतदार सुनबाई!
"तुझा हा सोज्वळपणा, तुझं सच्चेपण…
खरंच, जगाला शिकवणारा आहे बाई!"
खरंच, जगाला शिकवणारा आहे बाई!"
"तुझं लिहणं वेगळं आहे बाई...
कारण तुझं जगणंच इतकं सच्चं आहे!"
कारण तुझं जगणंच इतकं सच्चं आहे!"
अशी सुनबाई,
जी घरही सांभाळते आणि आवाजही उठवते…
सोज्वळतेतून सशक्तपणाचं उदाहरण बनते.
जी घरही सांभाळते आणि आवाजही उठवते…
सोज्वळतेतून सशक्तपणाचं उदाहरण बनते.
तुझी पद्धत वेगळी आहे.तुझे विचारच वेगळेच आहेत बाई!
सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
भिलाई छत्तीसगड